Daughter Property Rights : भारतात संपत्तीच्या कारणांवरून कुटुंबांमध्ये मोठे वाद-विवाद होतात. प्रामुख्याने भावंडांमध्ये संपत्तीवरून वादविवाद पाहायला मिळतात. अनेकदा मालमत्तेवरून सुरू झालेले हे वाद कोर्टात जातात. अनेक प्रकरणांमध्ये असे आढळून आले आहे की, भाऊ आपल्या बहिणीला वडिलांच्या संपत्तीतील हिस्सा देण्यास नकार दाखवतात.
यामुळे मग असे प्रकरण न्यायालयात जाते. खरेतर, कायद्याने मुलगा आणि मुलगी हे समान समजले गेले आहेत आणि मुलाला तथा मुलीला वडिलांच्या प्रॉपर्टी मध्ये समान हिस्सा देखील दिला जातो. पण, सर्वच प्रकरणांमध्ये वडिलांच्या मालमत्तेत मुलीला हिस्सा मिळत नाही.
यामुळे आज आपण मुलीला वडिलांच्या कोणत्या संपत्तीत हिस्सा मिळत नाहीत किंवा कोणत्या प्रकरणांमध्ये मुलीला आपल्या वडिलांच्या संपत्तीत अधिकार मिळत नाही याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
मुलीला कोणत्या प्रकरणांमध्ये आपल्या वडिलांच्या संपत्तीत अधिकार मिळत नाहीत ?
आम्ही आपणास सांगू इच्छितो की, संपत्तीवरील दावे आणि हक्कांच्या तरतुदीसाठी सन 1956 मध्ये हिंदू उत्तराधिकारी कायदा अस्तित्वात आला. या कायद्यामध्ये पुढे 2005 ला संशोधन देखील झाले आहे.
या कायद्यात मुलीला आपल्या वडिलांच्या संपत्तीत किती हिस्सा मिळतो याबाबत स्पष्ट तरतूद आहे. १९५६ च्या कायद्यानुसार, मुलींना आपल्या वडिलांच्या संपत्तीवर मुलांप्रमाणे समान अधिकार दिला गेला आहे.
पुढे 2005 मध्ये या कायद्यात दुरुस्ती करण्यात आली आणि मुलींच्या हक्काचे बळकटीकरण झाले. 2005 मध्ये झालेल्या सुधारणेनुसार मुलगी विवाहित असो किंवा अविवाहित असो तिला तिच्या वडिलांच्या संपत्तीत अधिकार मिळतोच असे स्पष्ट झाले.
म्हणजे मुलीच्या लग्नानंतरही तिला तिच्या वडिलांच्या संपत्तीवर मुलाप्रमाणेच अधिकार राहणार आहेत. मात्र, जर वडिलांनी स्वत:च्या पैशाने जमीन खरेदी केलेली असेल, घर बांधले असेल किंवा घर खरेदी केले असेल तर अशा मालमत्तेवर मुलीचा अधिकार राहत नाही.
म्हणजे वडिलांच्या स्वअर्जित प्रॉपर्टीवर मुलीचा अधिकार राहत नाही. अशी प्रॉपर्टी वडील आपल्या इच्छेनुसार कोणालाही देऊ शकतो. स्वत:च्या इच्छेनुसार अशी स्वतःच्या कष्टाने कमावलेली संपत्ती कोणालाही देण्याचा वडिलांचा कायदेशीर अधिकार आहे.
म्हणजेच अशा संपत्तीत वडिलांनी मुलीला हिस्सा देण्यास नकार दिला तर मुलगी काहीही करू शकत नाही. वडिलांनीं स्वतःचा पैशांनी कमावलेली या संपत्तीवर मुलाला देखील दावा ठोकता येत नाही.
जर वडिलांना मुलांना देखील अशी स्वतःच्या कष्टाने कमावलेली संपत्ती द्यायची नसेल तर ते अशी संपत्ती त्यांच्या मर्जीने कोणत्याही व्यक्तीला देऊ शकता अथवा दान करू शकतात.