Profitable Business Idea:- एखाद्या ठिकाणी नोकरी करण्यापेक्षा स्वतःचा व्यवसाय उभारून त्या व्यवसायाचे योग्य नियोजन करून स्वतःच्या मर्जीने आयुष्य जगणे व भरपूर पैसा कमावणे हे कधीही चांगले असते. परंतु व्यवसाय उभारण्यासाठी मात्र व्यवसायाची निवड ही खूप महत्त्वाचे ठरते.
यामध्ये तुम्ही निवड करत असलेल्या व्यवसायाला असलेली बाजारपेठेतील मागणी ही गोष्ट सगळ्यात अगोदर लक्षात घ्यावी लागते व त्यानंतर तुमच्याकडे असलेले भांडवल किंवा त्या व्यवसायाला लागणारे भांडवल या गोष्टींचा खूप महत्त्वाचा प्रभाव व्यवसाय उभारणीवर होत असतो.
व्यवसायाची यादी पाहिली तर ती भली मोठी अशी तयार होईल. यातील काही व्यवसायांना कमीत कमी भांडवल लागते. परंतु त्या माध्यमातून मिळणारा नफा हा प्रचंड प्रमाणात असतो. त्यामुळे बाजारातील मागणी आणि तुमच्याकडे असलेले भांडवल या गोष्टी विचारात घेऊनच व्यवसाय निवडणे गरजेचे असते.
त्यामुळे या लेखात आपण अशा एका व्यवसायाची माहिती घेणार आहोत जो तुम्ही कमी गुंतवणुकीत सुरू करून चांगला पैसा मिळवू शकतात. तो व्यवसाय म्हणजे फ्लाय ॲश ब्रिक्स म्हणजेच सिमेंटच्या विटा तयार करण्याचा व्यवसाय होय. हा व्यवसाय तुम्ही कमीत कमी गुंतवणुकीत सुरू करू शकतात व याकरिता तुमच्याकडे स्वतःची जमीन असेल तर खूप मोठा फायदा होतो.
सिमेंटच्या विटा म्हणजेच फ्लाय ॲश ब्रिक्स तयार करण्याचा व्यवसाय
जर तुमच्याकडे जमीन असेल आणि कमी गुंतवणुकीत स्वतःचा व्यवसाय करायचा तुमचा प्लानिंग असेल तर तुम्ही सिमेंटच्या विटा तयार करण्याचा व्यवसाय करू शकतात. साधारणपणे हा व्यवसाय करण्याकरिता तुमच्याकडे 100 फूट जमीन आणि कमीत कमी दोन लाख रुपयांचे भांडवल असणे गरजेचे आहे.
या दोन लाख रुपयांच्या भांडवलात तुम्ही उत्तम रीतीने व्यवसायाचे व्यवस्थापन जर केले तर प्रत्येक महिन्याला 50000 पासून तर 1 लाख रुपयांपर्यंत पैसे मिळू शकतात. आपल्याला माहित आहे की महाराष्ट्रामध्ये सध्या शहरीकरण मोठ्या प्रमाणावर होत असून ग्रामीण भागाचा विकास देखील तेवढ्याच वेगात होत आहे.
अशा प्रकारे आता अनेक बांधकाम व्यवसायिकांच्या माध्यमातून अशा प्रकारच्या फ्लाय ॲश ब्रिक्स म्हणजे सिमेंटच्या विटांचा वापर मोठ्या प्रमाणावर होताना दिसून येत असून या प्रकारच्या विटा तयार करण्यासाठी विज केंद्रामधून निघणारी राख तसेच सिमेंट आणि स्टोन डस्टच्या मिश्रणाचा वापर केला जातो.
जर आपण या व्यवसायातील गुंतवणूक बघितली तर यासाठी लागणारी यंत्रसामग्री मध्ये तुम्हाला जास्त पैसा गुंतवावा लागतो. या व्यवसायात तुम्ही मॅन्युअल मशीन घेतली तर या मशीनच्या माध्यमातून पाच ते सहा लोकांच्या मदतीने तुम्ही विटांचे उत्पादन घेऊ शकतात.
मॅन्युअल मशीनच्या माध्यमातून तुम्ही दिवसाला तीन हजार विटांचे उत्पादन मिळवू शकतात. ही जी काही गुंतवणूक सांगितलेली आहे त्यामध्ये मात्र कच्चामालासाठी येणारा जो खर्च आहे त्याचा समावेश केलेला नाही. समजा तुम्ही मॅन्युअल मशीन ऐवजी विटा तयार करणाऱ्या ऑटोमॅटिक मशीनचा वापर केला तर हे मशीन तुम्हाला दहा ते बारा लाख रुपयांपर्यंत मिळते.
या मशीनच्या सहाय्याने कच्च्या मालाच्या मिश्रणापासून तर वीट बनवण्यापर्यंत सर्व काम केले जाते व एक तासांमध्ये 1000 विटा या मशीनच्या माध्यमातून तयार होतात.म्हणजे ऑटोमॅटिक मशीनच्या सहाय्याने तुम्ही एका महिन्यामध्ये तीन ते चार लाख विटांचे उत्पादन घेऊ शकतात.
तुम्हाला देखील हा व्यवसाय सुरू करायचा असेल तर तुम्ही बँकेकडून कर्ज घेऊन सुरू करू शकता. याकरिता तुम्हाला शासनाची पंतप्रधान रोजगार योजना आणि मुख्यमंत्री युवा स्व रोजगार योजनेअंतर्गत कर्ज मिळू शकते व इतकेच नाहीतर मुद्रा लोनचा देखील पर्याय तुमच्यासाठी उपलब्ध आहे.