Property Right : वडिलांच्या मालमत्तेसाठी मुलगा आणि मुलगी यांच्यात अनेकदा वाद पाहायला मिळतात. हे वाद अनेकदा भांडणात परावर्तित होतात आणि अशी प्रकरणे न्यायालयात देखील जातात. विशेषतः एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला आणि अशा व्यक्तीने जर मृत्युपत्र लिहिलेले नसेल तर वादाची परिस्थिती तयार होण्याची शक्यता अधिक राहते.
विशेष म्हणजे इच्छापत्र लिहिलेले असतानाही अनेकदा वाद पाहायला मिळतात. यासाठी मात्र शासनाने काही कायदे केले आहेत. या कायद्याच्या मदतीने पात्र व्यक्तींना त्यांचा हक्क प्रोव्हाइड केला जातो.

मात्र अनेकदा मुलींना त्यांच्या हक्कापासून डावलले जाते. परंतु कायद्यात मुलींना मुलांप्रमाणेच समान हिस्सा देण्याचे प्रावधान आहे. यामुळे मुलींना जर आपला हक्क मिळत नसेल तर ते कायद्याचा वापर करून आपला हक्क मिळू शकतात.
मात्र, मुली आपल्या वडिलांच्या संपत्तीवर किंवा मालमत्तेवर केव्हा दावा करू शकतात? तसेच मुलींचा आपल्या वडिलांच्या संपत्तीवरील किंवा मालमत्तावरील हक्क केव्हा संपतो? याबाबत अनेकांना माहिती नसते. अशा परिस्थितीत आज आपण याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
हे पण वाचा :- राज्य कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! जुलै महिन्यात शिंदे सरकार घेणार ‘हा’ मोठा निर्णय, वेतनात होणार वाढ
आम्ही आपणास सांगू इच्छितो की आपल्या देशात मालमत्ता संदर्भात 1956 मध्ये हिंदू उत्तराधिकारी कायदा तयार करण्यात आला. या कायद्यात 2005 मध्ये मोठी सुधारणा झाली. या सुधारणेनुसार मुलींना वडिलांच्या संपत्तीत समान वाटा देण्याचा अधिकाराचा समावेश करण्यात आला.
म्हणजेच वडिलांच्या संपत्तीत जेवढा मुलांचा अधिकार आहे तेवढाच मुलीचा देखील आहे ही तरतूद 2005 मध्ये या कायद्यामध्ये समाविष्ट करण्यात आली आहे. मात्र या कायद्यान्वये केव्हा मुलींना आपल्या वडिलांच्या संपत्तीत दावा करता येतो हे आता आपण सखोल जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
असं झाले तर मुलींचा हक्क संपुष्टात येतो
या कायद्यानुसार जर वडील हयात असतील आणि त्यांनी आपली मालमत्ता किंवा संपत्ती थेट नातवंडांच्या नावे केली असेल किंवा त्यांना हस्तांतरित केली असेल तर अशा संपत्तीवर मुली दावा करू शकत नाहीत. म्हणजेच अशा प्रकरणात मुलींचा आपल्या वडिलांच्या संपत्तीवरील हक्क संपुष्टात येतो.
हे पण वाचा :- मुंबई, ठाणेकरांसाठी खुशखबर ! आता ‘या’ लिंक रोड प्रकल्पामुळे नवी मुंबईचा प्रवास होणार मात्र 25 मिनिटात, पहा….
तसेच जर वडिलांनी स्वतःच्या पैशाने जमीन, घर किंवा इतर मालमत्ता विकत घेतलेली असेल तर अशा परिस्थितीत वडील आपली मालमत्ता कोणालाही देऊ शकतात. अशा मालमत्तेवर कोणीच अधिकार दाखवू शकत नाही. अशा परिस्थितीत जर वडिलांनी स्वतःच्या पैशाने जमीन घर किंवा इतर मालमत्ता विकत घेतलेली असेल आणि अशी मालमत्ता मुलीला देण्यास नकार दिला तर या मालमत्तेवर मुलीला हक्क सांगता येत नाही.
असे असेल तर मुलगी वडिलांच्या संपत्तीवर दावा करू शकते
जर वडिलांचा मृत्यू झाला असेल आणि मालमत्ता ही मृत्युपत्राच्या आधारे हस्तांतरित झाली असेल आणि यामध्ये जर मुलीला हक्क मिळाला नसेल तर मुलगी वैध कारणास्तव अशा मृत्युपत्राला न्यायालयात आव्हान देऊ शकते.
जर समजा वडिलांनी मृत्युपत्र लिहलेले नसेल आणि त्यांचे निधन झाले तर अशा मृत व्यक्तीच्या संपत्तीत मुलींचा देखील समान अधिकार असतो. हिंदू उत्तराधिकारी कायदा 1956 नुसार मुलींना हा अधिकार देण्यात आला आहे. यामुळे अशा प्रकरणात मुली न्यायालयात धाव घेऊ शकतात.
हे पण वाचा :- मोचा चक्रीवादळाचा महाराष्ट्रालाही धोका वाढला! ‘या’ भागात पडणार वादळी वाऱ्यासह पाऊस, भारतीय हवामान विभागाचा इशारा