Property Rule: वारसा हक्क आणि वडिलोपार्जित मालमत्तेत फरक काय आहे? कोणत्या प्रॉपर्टीतून बेदखल केले जाऊ शकते आणि कोणत्या प्रॉपर्टीतून नाही?

Ajay Patil
Published:
property rule

Property Rule:- प्रॉपर्टी म्हणजेच मालमत्ता हा एक संवेदनशील विषय असून बऱ्याच कुटुंबांमध्ये याबद्दल आपल्याला अनेकदा वाद निर्माण झाल्याचे दिसून येते. तसेच वडिलोपार्जित मालमत्ता आणि वारसा हक्काने मिळालेली मालमत्ता हे शब्द किंवा या संकल्पना आपण बऱ्याचदा ऐकत असतो.

परंतु काहीजण या दोन्ही संकल्पनांचा अर्थ हा एकच असल्याचे समजतात. परंतु जर कायदेशीर दृष्ट्या बघितले तर या दोन्हीही शब्दांमध्ये म्हणजेच वडिलोपार्जित मालमत्ता आणि वारसा हक्काने मिळालेली मालमत्ता यामध्ये मोठा फरक आहे व तो खूपच कमी लोकांना माहिती आहे.

तसेच मालमत्तेच्या वादामध्ये या दोन्ही संकल्पना खूप महत्त्वाच्या असतात व त्यावरच कायदे अवलंबून असल्याने त्या पद्धतीने मालमत्तेच्या वादाच्या संदर्भातील निवाडे होत असतात.

याकरिता या लेखामध्ये आपण वडिलोपार्जित मालमत्ता आणि वारसा हक्काने मिळालेली मालमत्ता यामध्ये नेमका फरक काय आहे? तसेच या दोन्ही प्रॉपर्टी च्या बाबतीतली महत्त्वाची माहिती आपण या लेखात बघणार आहोत.

 वारसा हक्काने मिळालेली आणि वडिलोपार्जित मालमत्ता यातील नेमका फरक काय?

मालमत्ता जशी आपल्या वडील किंवा आजोबा यांच्याकडून आपल्याला मिळत असते. तशी ती एखाद्या व्यक्तीला मामांकडून किंवा आजी कडून देखील मिळू शकते. यामध्ये जर मालमत्ताधारकाचे निधन झाले तर मालमत्ता तुम्हाला वारसा हक्काने मिळते. म्हणजे सोप्या शब्दात सांगायचे झाले तर वडिलोपार्जित मालमत्ता देखील वारसा हक्काचा एक भाग आहे.

परंतु वडिलोपार्जित मालमत्ता ही वडील, आजोबा किंवा पणजोबांकडून मिळते. म्हणजेच कुटुंबातील कोणताही सदस्य तुम्हाला वारसा हक्काने  मालमत्ता देऊ शकते.

परंतु वडील किंवा आजोबांकडून जी मालमत्ता मिळते ती फक्त वडिलोपार्जित मालमत्ता असते. वडिलोपार्जित मालमत्तेचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे जेव्हा एखाद्या व्यक्तीचा जन्म होतो तेव्हाच त्याचा त्या वडिलोपार्जित मालमत्तेवर हक्क मिळतो किंवा त्याचा हक्क असतो.

 दोन्हीपैकी कोणत्या मालमत्तेतून बेदखल करता येत नाही?

तसे पाहायला गेले तर एखाद्या व्यक्तीला वडिलोपार्जित संपत्तीतून किंवा प्रॉपर्टीतून बेदखल करता येऊ शकत नाही. परंतु काही अपवादात्मक परिस्थितीमध्ये बेदखल केले जाऊ शकते. परंतु यामध्ये जर वडील किंवा आई आपल्या मुलाला किंवा मुलीला त्यांच्या स्वतःच्या कमाईतून निर्माण केलेल्या संपत्तीतून मात्र बेदखल करू शकतात.

भारतामध्ये काही न्यायालयीन प्रकरणांमध्ये न्यायालयाने पालकांच्या बाजूने निर्णय देत मुलांना वडिलोपार्जित मालमत्तेतून बेदखल केल्याचे देखील प्रकरणे आहेत. मालमत्तेतून बेदखल करण्याच्या बाबतीत जर आपण कायदे पाहिले तर ते खूप गुंतागुंतीचे आहेत.

यामध्ये एखाद्या व्यक्तीला जर संपत्तीतून बेदखल केले तर ते व्यक्ती वडिलोपार्जित मालमत्तेवर दावा करू शकते व याकरिता बारा वर्षांचा कालावधी दिला जातो. यामध्ये कोर्ट काही परिस्थिती लक्षात घेऊन बारा वर्षानंतर देखील यासंबंधीचा दावा करण्याचे एखाद्या व्यक्तीला परवानगी देऊ शकते.

 वडिलोपार्जित मालमत्तेचा दर्जा केव्हा नष्ट होतो?

वडिलोपार्जित मालमत्तेच्या बाबतीत बघितले तर या मालमत्तेवर पणजोबा, आजोबा, वडील आणि त्यानंतर त्यांच्या मुलांना आजोबांच्या वडिलांकडून मिळालेल्या संपत्तीवर वारसाहक्क असतो. तसे पाहायला गेले तर वडिलोपार्जित मालमत्तेचा जो काही दर्जा असतो तो अविभाजित म्हणजेच प्रॉपर्टीचे विभाजन होत नाही तोपर्यंतच राहतो.

या चार पिढ्यांपैकी जर कोणीही प्रॉपर्टीची विभाजन केले तर मात्र वडिलोपार्जित मालमत्तेचा दर्जा नष्ट होतो व त्यानंतर एखाद्या व्यक्तीला जर मालमत्तेतून बेदखल केले तर मात्र संबंधित व्यक्ती वडिलोपार्जित मालमत्ता म्हणून त्या मालमत्तेवर दावा सांगू शकत नाही.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe