Pune-Ahmednagar-Nashik Railway : पुणे अहमदनगर नासिक सेमी हाय स्पीड रेल्वे बाबत एक मोठी माहिती येत आहे. या रेल्वे मार्गासाठी अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात भूसंपादनाची प्रक्रिया सुरू झाली आहे. तालुक्यातील 26 गावातून हा रेल्वे मार्ग जाणार असून यासाठी 293 हेक्टर जमिनीचे संपादन होणार आहे.
विशेष म्हणजे या 293 हेक्टर शेत जमिनी पैकी 19 हेक्टर शेत जमीन संपादित झाली असून त्याच्या मोबदल्यात 29 कोटी रुपये संबंधित जमीन धारकाला मिळाले आहेत. तालुक्यातील 26 गावापैकी 15 गावात जमिनीचे मूल्यांकन हे झाल आहे. जिल्हाधिकारी यांची मूल्यांकनाला मंजुरी लाभली आहे. यामुळे थेट खरेदीअंतर्गत आतापर्यंत 98 खरेदी खत ही झाली आहेत.

उर्वरित अकरा गावात देखील लवकरच जमिनीचे मूल्यांकन केल जाणार असून बाधितांसाठी योग्य मोबदला जाहीर होणार असल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान आज आपण अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्याच्या कोणत्या गावात भूसंपादनाची प्रक्रिया राबवली जाणार आहे याची यादी जाणून घेणार आहोत.
पुणे नाशिक सेमी हाय स्पीड रेल्वेसाठी संगमनेर तालुक्यातील या गावात होणार भूसंपादन
पुणे नासिक सेमी हाय स्पीड रेल्वे साठी नियुक्त झालेले भूसंपादन अधिकारी डॉक्टर शशिकांत मंगरुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोखरी हवेली, अंभोरे, कोळवाडे, येळखोपवाडी, अकलापूर, खंदरमाळवाडी, नांदूर खंदरमाळ, जांबूत बुद्रुक, साकूर, माळवाडी, बोटा, रणखांबवाडी, पिंपरणे, जाखुरी, खंडेरायवाडी या १५ गावांतील जमिनीचे मूल्यांकन हे झाले आहे.
या गावातीपा जमिनीच्या मूल्यांकनाला जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले यांनी मान्यता देखील दिली आहे. आता या 15 गावात थेट खरेदी अंतर्गत आतापर्यंत ९८ खरेदीखत तयार झाली आहेत. उर्वरित जमिनीसाठी ही प्रक्रिया वेगात सुरु आहे.
तसेच समनापूर, कोल्हेवाडी, जोर्वे, पळसखेडे, निर्माण, सोनेवाडी, पिंपळे, पारेगाव खुर्द, खराडी, नान्नज दुमाला, केळेवाडी या ११ गावांतील भूसंपादन जमिनींचे मूल्यांकन मंजूर झाल्यानंतर होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.