Pune Aurangabad Expressway : महाराष्ट्रात आता पुन्हा एकदा पुणे ते छत्रपती संभाजीनगर हरित महामार्गाची चर्चा सुरू झाली आहे. कारण म्हणजे काल राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिरूर ते छत्रपती संभाजीनगर ग्रीन फील्ड एक्सप्रेस वे महामार्गाला मंजुरी देण्यात आली. खरे तर या महामार्गाचे काम एकूण तीन टप्प्यात केले जाणार आहे.
यासाठी जवळपास 25 हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. परंतु कालच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिंदे सरकारने या प्रकल्पाच्या पहिल्या दोन टप्प्यातील कामांनाच मंजुरी दिली आहे. या पहिल्या दोन टप्प्याच्या कामासाठी जवळपास 14 हजार कोटी रुपयांपेक्षा अधिकचा खर्च अपेक्षित आहे.

ज्यामुळे पुन्हा एकदा राज्यात पुणे छत्रपती संभाजीनगर ग्रीन फिल्ड एक्सप्रेस वे बाबत चर्चा रंगल्या आहेत. खरे तर पुणे ते छत्रपती संभाजीनगर महामार्गाचे काम एकूण तीन टप्प्यात म्हणजेच तीन फेज मध्ये पूर्ण होणार आहे.
या प्रकल्पाच्या पहिल्या दोन फेज अंतर्गत छत्रपती संभाजी नगर ते शिरूर या दरम्यानच्या मार्गाचे काम केले जाणार आहे. तसेच तिसऱ्या टप्प्यात शिरूर ते पुणे या मार्गाचे काम केले जाणार आहे.
यातील पहिल्या दोन फेजसाठी 1486 कोटी आणि तिसऱ्या फेजसाठी अर्थातच शिरूर ते पुणे या मार्गासाठी दहा हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. शिरूर ते छत्रपती संभाजीनगर हा 205 किलोमीटर लांबीचा महामार्ग राहणार आहे. या मार्गाचे काम बीओटी तत्त्वावर केले जाणार आहे.
महामार्ग सुरू झाल्यानंतर 2008 च्या कायद्यानुसार यावर पथकर लावला जाणार आहे. कालच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत संपूर्ण पुणे ते छत्रपती संभाजी नगर या मार्गाबाबत निर्णय झालेला नाही.
फक्त शिरूर ते छत्रपती संभाजीनगर या 205 किलोमीटर लांबीच्या महामार्गबाबतचा निर्णय कालच्या बैठकीत झाला असून उर्वरित शिरूर ते पुणे या 10 हजार कोटी रुपयांच्या मार्गासंदर्भात कुठलाच निर्णय घेण्यात आलेला नाही. दरम्यान आता आपण शिरूर ते छत्रपती संभाजीनगर हा महामार्ग कोण कोणत्या गावांमधून जाणार या संदर्भात अगदी थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत.
महामार्ग कोणत्या गावांमधून जाणार
मिळालेल्या माहितीनुसार हा महत्त्वाकांक्षी महामार्ग छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील पीरवाडी, हिरापूर, सुंदरवाडी, झाल्टा, आडगाव बुद्रुक, चिंचोली, घारदोन, तर पैठण तालुक्यातील वरवंडी खुर्द, पारगाव, डोणगाव, बालानगर, कापूसवाडी, वडाळा, बवा, वरुडी बुद्रुक, पाचळगाव, नारायणगाव, करंजखेडा, आखतवाडा, वाघाडी, दडेगाव जहाँगीर, पोटगाव, सायगाव, पैठण परिसरातून जाणार आहे.
या महामार्गासाठी तयार करण्यात आलेल्या अलाइनमेंट मध्ये थोडासा बदल सुद्धा होणार आहे. बिडकीनमध्ये अलायन्मेंट बदलण्यात येणार अशी माहिती हाती आली आहे.