Pune Bus News : पुणे ही महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी. कॅपिटल शहर म्हणून ख्यातीप्राप्त असलेल्या पुणे शहराला शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळखले जाते. शहरात शिक्षणासाठी लाखोच्या संख्येने विद्यार्थी दाखल होतात. तसेच अलीकडील काही वर्षात शहरांमध्ये आयटी कंपन्यांनी आपले बस्तान बसवले आहे. यामुळे शहरातील लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. खाजगी वाहनांची संख्या देखील झपाट्याने वाढली आहे.
यामुळे वाहतूक कोंडी होत असून प्रदूषणाचा स्तर देखील चिंताजनक बनला आहे. यामुळे लोकांनी अधिकाधिक सार्वजनिक वाहतुकीचा वापर करावा यासाठी शासन प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहे. रस्ते विकासाची कामे यामुळे जलद गतीने पूर्ण केले जात आहेत. तसेच शहरात मेट्रो मार्ग विकसित होत आहेत. तसेच एसटी महामंडळाच्या ताब्यात देखील नवीन बसेस येत आहेत. जेणेकरून नागरिकांनी अधिकाधिक सार्वजनिक वाहतुकीचा वापर करावा.
हे पण वाचा :- ‘हा’ शेअर ठरला कुबेरचा खजाना ! फक्त 8 वर्षात 1 लाखाचे झालेत 3 कोटी 70 लाख, पहा कोणता आहे तो बाहुबली स्टॉक?
दरम्यान आता पुणेकरांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे शहरातील नागरिकांसाठी लवकरच ई-शिवाई बस सुरू होणार आहे. कारण की, आता महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ताब्यात आठ नवीन ई-शिवाई बस आल्या आहेत. आता या बसचे पासिंगचे काम पूर्ण झाले की मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात या बस प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहेत. या नवीन बसेस पुणे विभागाला मिळणार आहेत.
यामुळे निश्चितच पुणे विभागातील प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. या बसेस मुंबई, छत्रपती संभाजी नगर, सोलापूर, नासिक, कोल्हापूर, सोलापूर या शहरांदरम्यान सुरू होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. खरं पाहता एसटीच्या ताफ्यात गेल्यावर्षी जून महिन्यात एक ई-शिवाई बस दाखल झाली होती. दरम्यान आता आठ बस एसटीकडे आल्या आहेत. म्हणजेच या नवीन ई-शिवाई बसेस जलद गतीने प्रवाशांच्या सेवेसाठी एसटी महामंडळाकडे येत आहेत.
हे पण वाचा :- पुणे, अहमदनगर, नागपूर, सातारा, सांगली, सोलापूर, धाराशिव, लातूर, बीड अन ‘त्या’ जिल्ह्यात गारपीट होणार ! IMDचा येलो अलर्ट
एका मीडिया रिपोर्ट मध्ये दिलेल्या माहितीनुसार पहिल्या टप्प्यात एसटीच्या ताफ्यात तब्बल 150 ई-शिवाई बस रुजू होणार आहेत. यापैकी 50 बस पुणे विभागाला मिळणार आहेत. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे विभागाला मिळणाऱ्या या बसेस पुणे-मुंबई, पुणे-छत्रपती संभाजीनगर, पुणे-ठाणे, पुणे-कोल्हापूर, पुणे-सोलापूर, पुणे-नाशिक, पुणे-बोरिवली या मार्गांवर चालवल्या जाऊ शकतात.
या पार्श्वभूमीवर स्वारगेट येथील एसटीच्या विभागीय कार्यालयात चार्जिंग स्टेशन विकसित होत आहे. अद्याप याचे काम पूर्ण झालेले नाही. मात्र लवकरच याचे काम पूर्ण होणार आहे कारण की, हे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. एकंदरीत आता पुणेकरांना या नवीन बसेसचा फायदा होणार असून पुण्याहून मुंबई, छत्रपती संभाजीनगर, ठाणे, कोल्हापूर, सोलापूर, नासिक, बोरिवली यांसारख्या शहरांदरम्यानचा प्रवास अधिक गतिमान आणि सोयीचा होणार आहे.
हे पण वाचा :- भारतीय नौदलात नोकरीची सुवर्णसंधी ! ‘या’ पदासाठी निघाली मोठी भरती, असा करा अर्ज