Pune Expressway News : महाराष्ट्रात आणि देशात गेल्या काही वर्षांमध्ये रस्त्यांचे अनेक मोठं-मोठे प्रकल्प पूर्ण झाले आहेत. तसेच अजूनही अनेक रस्त्यांची कामे सध्या देशात सुरू आहेत आणि रस्त्यांच्या कामामुळे देशातील कनेक्टिव्हिटी फारच मजबूत झाली आहे.
आतापर्यंत देशात अनेक मोठमोठ्या महामार्गाची कामे पूर्ण झाली आहे. तर दुसरीकडे अनेक नवनवीन महामार्ग प्रकल्पांची कामे प्रस्तावित असून पुणे ते बेंगळुरू दरम्यानही नवा एक्सप्रेस वे विकसित केला जाणार आहे.

यामुळे पुणे ते बेंगळुरू हा प्रवास फारच वेगवान होणार अशी आशा आहे. या दोन्ही शहरा दरम्यान दररोज हजारो प्रवासी प्रवास करतात आणि म्हणूनच नवीन एक्सप्रेस वे या हजारो प्रवाशांसाठी फायदेमंद राहणार आहे.
हा नवा एक्सप्रेस वे जवळपास ७०० किलोमीटर लांबीचा राहणार आहे. या एक्सप्रेस वे बाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नुकत्याच काही दिवसांपूर्वी माहिती दिली होती. महत्त्वाची बाब म्हणजे पुणे-बेंगळुरू एक्सप्रेसवे चे काम लवकरच सुरु होणार आहे.
अशा परिस्थितीत, आज आपण या नव्या एक्सप्रेस वे चा महाराष्ट्राला काय फायदा होणार ? तसेच कर्नाटकाला या एक्सप्रेस वे मधून काय साध्य होणार ? याचा संपूर्ण आढावा या लेखातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
पुणे – बेंगळुरू महामार्गाचा फायदा काय ?
पुणे – बेंगळुरू महामार्ग प्रकल्पाचे काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून पूर्ण केले जाणार असून या प्रकल्पामुळे प्रवासाचा वेळ १५ तासांवरून फक्त ७ तासांवर येणार आहे. म्हणजेच पुणे ते बेंगलोर यादरम्यान भविष्यात फक्त सात तासात प्रवास करता येणार आहे.
हा एक प्रवेश-नियंत्रित हरित महामार्ग असेल. महाराष्ट्र आणि कर्नाटक या राज्यांना जोडणारा हा प्रकल्प राज्यातील तीन महत्त्वाच्या जिल्ह्यांमधून जाणार आहे. पुणे, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांमधून हा प्रकल्प जाणार असून यामुळे या भागातील एकात्मिक विकासाला चालना मिळणार आहे.
कृषी, पर्यटन, उद्योग शिक्षण अशा सर्वच क्षेत्रांना या नव्या महामार्गाचा फायदा होणार आहे. खरेतर, हा महामार्ग कर्नाटकातील बोम्मनाळ (अथणी तालुका) येथून सुरु होईल आणि बेळगाव, जमखंडी, बागलकोट या कर्नाटक मधील महत्त्वाच्या जिल्ह्यांतून महाराष्ट्रात प्रवेश करणार आहे.
महाराष्ट्रात हा रस्ता पुणे, सातारा आणि सांगली जिल्ह्यांतून पुढे जाईल अन यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील विकासासाठी हा प्रकल्प गेम चेंजर ठरू शकतो. या प्रकल्पामुळे मुंबई ते बेंगलोर हा प्रवास सुद्धा वेगवान होणार आहे.
या प्रकल्पाची सुरुवात पुणे रिंग रोड पासून होणार आहे. परिणामी या प्रकल्पाच्या आसपासच्या भागात रहिवासी आणि व्यावसायिक मालमत्तांच्या मागणीत मोठी वाढ होणार असा विश्वास रिअल इस्टेट क्षेत्रातील तज्ज्ञांकडून व्यक्त केला जात आहे.
या नव्या एक्सप्रेस वे मुळे नाशिक, कोल्हापूर, सातारा यांसारख्या शहरात गुंतवणूक आणि बांधकामाच्या संधी वाढणार आहेत. या नव्या रस्त्यामुळे विद्यमान महामार्गावरील वाहतुकीचा ताण सुद्धा फारच मोठ्या प्रमाणात कमी होणार अशी आशा आहे.
मुंबई, पुणे आणि गुजरातसारख्या औद्योगिक भागांतील व्यापार सुद्धा यामुळे गतिमान होईल असे बोलले जात आहे. या महामार्गामुळे पाणथळ आणि दुर्लक्षित भागांमधील विकासाला सुद्धा मोठी चालना मिळणार आहे.
स्थानिक लोकांना रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होतील आणि आर्थिक प्रगतीला चालना मिळेल. एकूणच, पुणे-बेंगळुरू एक्सप्रेसवे हा रिअल इस्टेट क्षेत्रासाठी ‘गेम चेंजर’ ठरणार आहे. सोबतच या महामार्गामुळे औद्योगिक आणि कृषी क्षेत्राला देखील मोठा फायदा होणार आहे. त्यामुळे कनेक्टिव्हिटी सुद्धा अधिक मजबूत होणार आहे.