पुण्यात नोकरीची सुवर्णसंधी ! ‘या’ संस्थेत निघाली भरती, पदवीधर उमेदवारांना करता येणार अर्ज, पहा….

Pune Government Job : पुणे अर्थातच शिक्षणाचे माहेरघर आणि राज्याची सांस्कृतिक राजधानी. या ठिकाणी अनेकांची नोकरी करण्याची इच्छा असते. अलीकडे आयटी हब म्हणून विकसित झालेल्या पुण्यात राज्यातील लाखो नवयुवकांच नोकरी करण्याचे स्वप्न असतं.

दरम्यान पुण्यात नोकरी करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी आजची ही बातमी विशेष खास राहणार आहे. कारण की, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी या संस्थेत भरतीची घोषणा करण्यात आली आहे.

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी पुणे येथे विविध रिक्त पदांसाठी भरती निघाली असून यासाठीची अधिसूचना देखील सदर संस्थेच्या माध्यमातून निर्गमित करण्यात आली आहे. दरम्यान आज आपण या पदभरती संदर्भात सर्व आवश्यक माहिती थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

कोणत्या पदासाठी होणार भरती

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल्स मेट्रोलॉजी पुणे या संस्थेत सेक्शन ऑफिसर या पदाच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

हे पण वाचा :- महाराष्ट्रातील सर्वात लांब बोगदा मुंबईत; ठाणे ते पश्चिम उपनगरातील ‘या’ शहराच अंतर फक्त 15 मिनिटात होणार पार, पहा….

किती पदांसाठी होणार भरती?

या पदाच्या चार रिक्त जागा भरल्या जाणार असल्याचे अधिसूचनेत नमूद करण्यात आले आहे.

आवश्यक शैक्षणिक पात्रता?

या पदासाठी अर्ज करू इच्छिणारा उमेदवार हा पदवीधर असावा तसेच सदर उमेदवाराकडे 5 वर्षांचा प्रशासकीय/कायदे/खरेदी आणि स्टोअर्सचा अनुभव असावा. (शासकीय किंवा निमशासकीय संस्थेतील पदाशी संबंधित ज्यातील किमान 3 वर्षे पर्यवेक्षी श्रेणीत असणे आवश्यक आहे).

हे पण वाचा :- पंजाब डख : महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता; मे अन जून महिन्यात कसं राहणार हवामान? वाचा डख यांचा सविस्तर हवामान अंदाज*

अर्ज कसा करावा लागणार?

या पदासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. https://www.tropmet.res.in/Careers या लिंक वर जाऊन उमेदवार आपला अर्ज सादर करू शकतात.

अर्ज सादर करण्याची अंतिम दिनांक

यासाठी अद्याप अर्ज प्रक्रिया सुरू झालेली नाही. एक मे 2023 पासून अर्ज प्रक्रिया सुरू होईल आणि 15 मे 2023 पर्यंत उमेदवारांना आपला अर्ज सादर करता येणार आहे.

जाहिरात कुठे पाहणार?

या पदभरती संदर्भात जारी झालेली जाहिरात पाहण्यासाठी https://www.tropmet.res.in/jobs_pdf/1682572593PER-03-2023-Section-Officer.pdf या लिंक वर क्लिक करू शकता.

हे पण वाचा :- कौतुकास्पद ! उच्चशिक्षित तरुणाने नोकरी न करता सुरू केली शेती; उन्हाळी हंगामात बाजरीच्या पिकातून मिळवले तब्बल पाच लाखाचे उत्पन्न