मोठी बातमी ! म्हाडाच्या पुणे मंडळाच्या 5915 घरांच्या सोडतीचा मुहूर्त हुकला; आता ‘या’ दिवशी निघणार लॉटरी, पहा डिटेल्स

Ajay Patil
Published:
Mumbai Mhada News

Pune Mhada News : सर्वसामान्य लोकांना पुणे मुंबई औरंगाबाद नासिक यांसारख्या महानगरात घर घेणं म्हणजे दिवसाढवळ्या स्वप्न पाहणं अशी गंमत झाली आहे. परिणामी सर्वसामान्य लोक म्हाडाच्या परवडणाऱ्या घरांची वाट पाहत असतात. अशातच जानेवारी महिन्यात म्हाडाच्या पुणे मंडळांनी तब्बल 5915 घरांसाठीची सोडतची जाहिरात काढली.

यामुळे पुणे मंडळात घर घेऊ इच्छिणाऱ्या हजारो लोकांनी या घरासाठी अर्ज केलेत. दरम्यान आता या पुणे मंडळाच्या घर सोडती संदर्भात एक मोठी माहिती हाती आली आहे. एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, या घर सोडतीचा निकाल अर्थातच लॉटरी प्रक्रिया काही तांत्रिक कारणांमुळे खोळंबली आहे.

ही लॉटरी आता आठ दिवसानंतर काढली जाणार असल्याची माहिती देखील देण्यात आली आहे. निश्चितच यामुळे पुणे मंडळात घरांसाठी अर्ज केलेल्या लोकांना अजून काही काळ लॉटरीची वाट पाहावी लागणार आहे. असंही सांगितलं जात आहे की, अर्थसंकल्पीयं अधिवेशन झाल्यानंतरच पुणे मंडळातील या घरांच्या सोडतीचा निकाल काढला जाईल. निश्चितच या घरांसाठी अर्ज केलेल्या अर्जदारांना अजून काही काळ वाट पहावी लागणार आहे.

आम्ही आपणास सांगू इच्छितो की पुणे मंडळाकडून पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रात असलेल्या घरांसाठी ही सोडत काढण्यात आली होती. याची जाहिरात जानेवारी महिन्यात प्रसिद्ध झाली. त्यानंतर म्हाडाच्या नवीन प्रणालीद्वारे यासाठी नोंदणी प्रक्रिया आरंभ झाली. अर्जदारांना ऑनलाईन अर्ज सादर करावयास सांगितले गेले होते.

मिळालेल्या माहितीनुसार 31 हजार 600 लोकांनी अनामत रकमेसह या घर सोडतीसाठी अर्ज केला आहे. यापैकी 5915 लोकांना लॉटरी लागणार आहे. ही लॉटरीची प्रक्रिया आज अर्थातच 7 मार्च रोजी होती. मात्र तांत्रिक अडथळ्यांमुळे ही प्रक्रिया पुढील आठ दिवस लांबणीवर टाकण्यात आली असल्याची माहिती देण्यात आली आहे. निश्चितच, अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर पुणे मंडळातील या घर सोडतीचा निकाल लागेल असेच चित्र आता निर्माण होत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe