मोठी बातमी ! पुणे जिल्ह्याच विभाजन करून बारामती जिल्हा बनवा; ‘या’ समितीने केलीय शिफारस, पहा….

Published on -

Pune New District Baramati : सध्या पुणे जिल्हा विभाजनाच्या चर्चा मोठ्या रंगले आहेत. त्याला कारणही तसंच खास आहे. सत्ता पक्षातील भोसरी मतदारसंघातील आमदार महेश लांडगे यांनी उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत एका कार्यक्रमात पुणे जिल्हा विभाजनाची मागणी केली आहे.

लांडगे यांनी पुणे जिल्ह्याचे विभाजन करून नवीन शिवनेरी जिल्हा बनवा अशी मागणी यावेळी केली. तेव्हापासून पुणे जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात वेगवेगळे तर कविता लावले जात आहेत. मात्र जिल्हा विभाजनाची ही मागणी आजची नाही. गेल्या अनेक वर्षांपासून राज्यातील लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वाधिक मोठा जिल्हा पुणे जिल्हा विभाजित करून नवीन जिल्हा बनवावा अशी मागणी आहे.

2014 पूर्वी पुणे जिल्हा हा राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक मोठा जिल्हा होता. मात्र 2014 मध्ये ठाणे जिल्ह्याचे विभाजन झाले आणि पुणे जिल्हा हा राज्यातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला जिल्हा बनला. सध्या pune जिल्हा अंदाजीत लोकसंख्या ही 80 लाखाच्या आसपास आहे. हेच कारण आहे की प्रशासकीय कामांसाठी आणि जिल्ह्यातील नागरिकांच्या सोयीसाठी जिल्ह्याचे विभाजन करण्याची मागणी होत आहे.

पुणे जिल्ह्याप्रमाणेच राज्यातील इतरही लोकसंख्येने मोठ्या आणि क्षेत्रफळाने मोठ्या असलेल्या जिल्ह्याच्या विभाजनाची मागणी गेल्या कित्येक वर्षांपासून जोर धरत आहे. या पार्श्वभूमीवर 2016 मध्ये एका समितीची देखील स्थापना करण्यात आली होती. महसूल विभागाचे प्रधान सचिव यांच्या अध्यक्षतेखाली या समितीची स्थापना करण्यात आली होती.

या समितीने राज्यातील सर्व जिल्ह्यांचा अभ्यास करून कोणत्या जिल्ह्याचे विभाजन करून कोणते नवीन जिल्हे तयार होतील? त्यात कोणत्या तालुक्यांचा समावेश असेल? कोणत्या गावांचा समावेश असेल? यासाठी खर्च किती असेल? यांसारख्या एक ना अनेक बाबींचा अभ्यास करून सविस्तर असा अहवाल शासनाकडे सोपवला आहे.

यामध्ये 36 पैकी 18 जिल्ह्यांचे विभाजन करणे प्रस्तावित आहे. ज्या सध्याच्या अठरा जिल्ह्यांचे विभाजन होणार आहे त्यापासून नव्याने 22 जिल्हे तयार होणार आहेत. याच शासनाकडे धुळखात पडलेल्या अहवालात पुणे जिल्हा विभाजित करून नवीन बारामती जिल्हा तयार करा अशी शिफारस करण्यात आली आहे. मात्र गेल्या सात वर्षांपासून या समितीचा हा प्रस्ताव तसाच पडून आहे.

अशातच आता आमदार महेश लांडगे यांनी जिल्हा विभाजनाचा मुद्दा छेडला असून याला पुन्हा एकदा फोडणी मिळाली आहे. आता भाजपा आमदार लांडगे यांनी पुणे जिल्हा विभाजित करून शिवनेरी जिल्हा बनवण्याची मागणी केली आहे तर शासनाकडे सादर झालेल्या प्रस्तावात बारामती हा जिल्हा तयार करण्याचे प्रस्तावित आहे. यामुळे शिवनेरी जिल्हा बनणार की बारामती? हाच मोठा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe