Pune News : पुणेकरांसाठी एक अतिशय महत्वाची आणि कामाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे पुणे जिल्ह्यातील वाहतुकीत मोठा बदल करण्यात आला आहे. याबाबत पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र देशमुख यांनी माहिती दिली आहे. देशमुख यांनी सांगितल्याप्रमाणे, संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यात वाहतुकीत बदल करण्याचा निर्णय झाला आहे.
खरतर संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा आणि संत तुकाराम महाराज पालखी सोहळा हा एक महत्वाचा सोहळा आहे. वारकऱ्यांसाठी हा सोहळा आनंदाची पर्वणी असतो. या सोहळ्यात राज्यभरात लाखो वारकरी सामील होतात. पायीदिंडी काढतात, हरिनामाच्या गजरात तल्लीन होऊन विठुरायाच्या दर्शनासाठी मार्गक्रमण करतात.
या सोहळ्याला भाविकांची उपस्थिती लाखोंच्या घरात राहते. यामुळे भाविकांच्या सोयीसाठी आणि पालखी सोहळ्यात सामील होणाऱ्या भाविकांना कुठलीही अडचण सहन करावी लागू नये यासाठी प्रशासनाच्या माध्यमातून काही उपाययोजना केल्या जातात. यामध्ये वाहतुकीत बदल देखील केला जातो.
दरम्यान यंदाही संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यानिमित्त वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. अशा परिस्थितीत आज आपण पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर वाहतुकीत कसा बदल करण्यात आला आहे याबाबत जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
किती दिवस राहणार वाहतुकीत बदल
हाती आलेल्या माहितीनुसार, 14 जून ते 18 जून दरम्यान संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यासाठी वाहतुकीत बदल राहणार आहे. हा पालखी सोहळा पुणे सासवड लोणंद मार्गे पंढरपूर कडे जाणार आहे. तसेच संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासाठी 15 जून ते 24 जून दरम्यान वाहतुकीत बदल राहणार आहे. हा पालखी सोहळा पुणे ते सोलापूर मार्गे रोटी घाट मार्गे बारामती इंदापूर अकलूज मार्गे पंढरपूरला जाणार आहे.
या कालावधीत पालखी ज्या गावात मुक्कामाला असेल त्या गावामध्ये सर्व प्रकारच्या वाहनांना बंदी राहणार आहे. निश्चितच वाहतुकीत झालेल्या या बदलामुरळे आता संबंधित भागात प्रवास करताना पर्यायी मार्गाने वाहतूक करावी लागणार आहे. दरम्यान आता आपण कोणत्या भागातील वाहतूक या कालावधीमध्ये बंद राहणार आणि यासाठी पर्यायी वाहतुकीचा मार्ग कोणता राहील या संदर्भात थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
संत ज्ञानेश्व महाराज पालखी मार्गातील बदल कसा राहणार?
हाती आलेल्या माहितीनुसार, 14 जून च्या रात्री दोन वाजेपासून ते 16 जूनच्या रात्री बारा वाजेपर्यंत पुणे ते सासवडकडे दिवेघाट व बोपदेव घाट मार्गे जाणारी वाहतूक बंद करण्यात आले आहे. या कालावधीत पुणे ते सासवड दरम्यान प्रवास करण्यासाठी प्रवाशांना खडीमशीन चौक-कात्रज-कापूरहोळ मार्गे वळवण्यात येणार आहे. तसेच सासवड ते पुणे दरम्यान प्रवास करण्यासाठी प्रवाशांना गराडे खेड शिवापुर मार्गे जाता येणार आहे.
याशिवाय 16जुन रात्री दोन वाजेपासून ते 17 जून रात्री बारा वाजेपर्यंत पुणे इथून सासवड जेजुरी वाल्हे निराकडे तसेच नीरा येथून पुण्याकडे जाणाऱ्या प्रवाशांना झेंडेवाडी पारगाव मेमाने सुपे मोरगाव नीरा या पर्यायी मार्गाचा वापर करावा लागणार आहे.
सोबतच 18 जून रोजी पहाटे दोन ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत पुणे येथून सासवड जेजुरी वाल्हे निराकडे तसेच निरा येथून पुण्याकडे जाणाऱ्या वाहनांना सासवड जेजुरी मोरगाव या पर्यायी मार्गाचा वापर करावा लागणार आहे.
हे पण वाचा :- खुशखबर ! मान्सून येत्या काही तासात केरळमध्ये दाखल होणार, महाराष्ट्रात केव्हा? मान्सूनबाबत हवामान विभागाने दिली मोठी अपडेट
संत तुकाराम महाराज पालखी मार्गातील बदल खालीलप्रमाणे
मिळालेल्या माहितीनुसार, 15 जून रोजी पहाटे दोन ते रात्री बारा वाजेपर्यंत पुण्याहुन सोलापूर कडे जाणारी वाहतूक वाघोली केसनंद राहू पारगाव चौफुला या पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे. तसेच सोलापूर कडून पुण्याकडे जाणारी वाहतूक चौफुला पारगाव राहू वाघोली या मार्गे वळवण्यात येणार आहे.
16जुन रोजी पहाटे दोन ते रात्री बारा वाजेपर्यंत पुण्याकडून सोलापूर कडे जाणारी वाहतूक थेऊर फाटा केसनंद राहू पारगाव न्हावरे काष्टी दौंड कुरकुंभ या मार्गाने वळवण्यात आली आहे. तसेच सोलापूर कडून पुण्याकडे जाणारी वाहतूक कुरकुंभ दौंड न्हावरे पारगाव केसनंद वाघोली या मार्गे रवाना करण्यात येणार आहे.
17 जून रोजी पहाटे दोन ते रात्री बारा वाजेपर्यंत पुण्याच्या बाजूकडून सोलापूरकडे जाणारी वाहतूक चौफुला पारगाव न्हावरे काष्टी दौंड कुरकुंभ या मार्गे वळवण्यात आली आहे. तसेच सोलापूर कडून पुण्याकडे जाणारी वाहतूक कुरकुंभ दौंड कष्टी न्हावरे पारगाव चौफुला या मार्गे वळवण्यात आली आहे.
18 जून रोजी पहाटे दोन ते रात्री बारा वाजेपर्यंत बारामती ते पाटस व बारामती ते दौंड हे दोन्ही मार्ग बंद राहणार आहेत. या मार्गावरील वाहतूक भिगवन मार्गे बारामतीला वळवण्यात आली आहे.
19 जून रोजी पहाटे दोन ते रात्री बारा वाजेपर्यंत जंक्शन ते बारामती हा रस्ता पालखी सोहळ्यासाठी बंद करण्यात आला आहे. यादरम्यान वालचंदनगर व इंदापूर कडून येणारी वाहतूक जंक्शन येथून कळस मार्गे बारामती आष्टीकडे वळवण्यात आली आहे. बारामतीकडून येताना कळस जंक्शन कडे वाहतूक वळविण्यात आली आहे.
हे पण वाचा :- पाऊस आला रे…! अहमदनगर, नाशिक, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूरसह ‘त्या’ भागात 9 जूनपासून तीन दिवस पावसाची शक्यता