शेतकऱ्यांनो काळजी घ्या; ‘या’ भागात आजपासून तुफान गारपीट होणार ! पंजाबराव डख यांचा नवा अंदाज

Punjab Dakh Breaking : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक चिंतेची बाब समोर येत आहे. वास्तविक गेल्या महिन्यापासून राज्यातील हवामानात मोठा बदल झाला असून या हवामानात होत असलेल्या बदलामुळे शेतकऱ्यांना सर्वाधिक फटका बसत आहे. सध्या राज्यातील बहुतांशी जिल्ह्यात अवकाळी पाऊस आणि गारपीट होत आहे.

दरम्यान जेष्ठ हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी नुकताच एक हवामान अंदाज वर्यवला आहे. डख यांनी वर्तवलेल्या आपल्या सुधारित हवामान अंदाजानुसार 24-25 एप्रिल पासून म्हणजेच उद्या परवा पासून राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पाऊस आणि गारपीटीची शक्यता कायम राहणार आहे.

हे पण वाचा :- महाराष्ट्रातील प्रसिद्ध भेंडवळच्या घट मांडणीचे भाकीत जाहीर; यंदा ‘असा’ राहणार पावसाळा, ‘या’ महिन्यात पडणार खूपच कमी पाऊस? वाचा सविस्तर

उद्यापासून पडणारा पाऊस हा उत्तर महाराष्ट्र, पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, मराठवाडा तसेच पश्चिम महाराष्ट्रात देखील कायम राहणार आहे. अर्थातच कोकण वगळता जवळपास संपूर्ण राज्यात पावसाची शक्यता कायम राहणार आहे. 

निश्चितच राज्यात पुन्हा एकदा गारपीट होणार असल्याचा अंदाज डख यांनी वर्तवला असल्याने जर हा अंदाज खरा ठरला तर शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढणार आहे. यामुळे पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या काढणी योग्य पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे.

हे पण वाचा :- मुंबई ते पुणे प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; ‘या’ हायवेवर दुरुस्तीची कामे सुरू असल्याने दोन मार्गीका झाल्यात बंद, पर्यायी मार्ग कोणता?

डख यांच्या मते मराठवाड्यात 25 एप्रिल ते 30 एप्रिल दरम्यान अवकाळी पाऊस आणि काही भागात गारपीट होणार आहे. पश्चिम महाराष्ट्रात आणि उत्तर महाराष्ट्रात 26 एप्रिल ते 30 एप्रिल पर्यंत अवकाळी पाऊस आणि गारपीटीची शक्यता राहणार आहे.

पूर्व विदर्भात आज पासून ते 29 एप्रिल पर्यंत अवकाळी पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता आहे. तर पश्चिम विदर्भात 25 एप्रिल ते 30 एप्रिल पर्यंत पावसाची शक्यता राहणार आहे तसेच काही भागात गारपीट देखील होऊ शकते असे मत डख यांनी व्यक्त केले आहे.

हे पण वाचा :- सावधान ! महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस पडणार; हवामान विभागाचा इशारा

खरं पाहता सध्या मराठवाडा आणि विदर्भातील बहुतांशी भागात हळद, कांदा, मका तसेच काही शेतकऱ्यांच्या गव्हाच्या पिकाची देखील काढणी सुरू आहे. अशातच हवामानात होणारा हा बदल आणि गारपीटीची शक्यता शेतकऱ्यांसाठी चिंतेचा विषय आहे. पंजाबरावांनी वर्तवलेला हा अंदाज जर खरा ठरला तर निश्चितच शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान यामुळे होऊ शकते असं जाणकार नमूद करत आहेत. 

हे पण वाचा :- धक्कादायक ! ‘या’ राज्य कर्मचाऱ्यांची शिंदे फडणवीस सरकारच्या काळात 960 कोटी रुपयांची देणी थकली; वाचा सविस्तर