पंजाब डख यांचा तातडीचा मेसेज; आज आणि उद्या ‘या’ जिल्ह्यात गारपीट होणार, पहा संपूर्ण हवामान अंदाज

Punjab Dakh Havaman Andaj 2023 : राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे जेष्ठ हवामान तज्ञ पंजाब डक यांनी एक नवीन हवामान अंदाज सार्वजनिक केला आहे. यावेळी डख यांनी शेतकऱ्यांना एक तातडीचा मेसेज देखील दिला आहे.

पंजाब डख यांनी वर्तवलेल्या नवीन हवामान अंदाजानुसार, आज अर्थातच 7 मे आणि उद्या 8 मे 2023 ला महाराष्ट्रातील कोकण, पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण महाराष्ट्र, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात पावसाची शक्यता राहणार आहे. यामुळे संबंधित विभागातील शेतकऱ्यांना अधिक काळजी घेण्याची गरज आहे.

विशेष बाब म्हणजे आज आणि उद्या राज्यातील काही भागात गारपीट होण्याची शक्यता आहे. तर काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता कायम राहणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना अधिक काळजी घेण्याचे आवाहन केले जात आहे.

हे पण वाचा :- 10वी पास तरुणांसाठी पुण्यात नोकरीची सुवर्णसंधी ! ‘या’ संस्थेत निघाली मोठी भरती, पहा….

कोणत्या जिल्ह्यात पडणार मुसळधार पाऊस अन गारपीट

पंजाब डख यांनी वर्तवलेल्या आपल्या नवीन हवामान अंदाजानुसार, आज आणि उद्या दुपारी अडीच ते तीन वाजेनंतर पावसाला सुरुवात होणार आहे. यामध्ये सांगली अक्कलकोट सोलापूर जत या भागात गारपीट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

यासोबतच कोकण, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र तसेच पुणे, अहमदनगर नासिक कोल्हापूर या भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. एकंदरीत काही भागात गारपीट आणि काही भागात मुसळधार पाऊस होणार असा अंदाज आहे, यामुळे संबंधित भागातील शेतकऱ्यांना अधिक सतर्क राहण्याची आवश्यकता आहे.

हे पण वाचा :- याला म्हणतात मल्टिबॅगर स्टॉक ! 12 रुपयाचा ‘हा’ स्टॉक पोहोचला 106 रुपयांवर, गुंतवणूकदार झालेत मालामाल; स्टॉकची ए टू झेड माहिती वाचा

9 तारखेनंतर पावसाची उघडीप

पंजाब डख यांनी वर्तवलेल्या हवामान अंदाजानुसार आज आणि उद्या पावसाची शक्यता आहे. हे दोन दिवस दुपारी अडीच ते तीनच्या सुमारास पाऊस पडणार आहे तसेच रात्री एक ते दोनच्या सुमारास पावसाची शक्यता कायम राहणार आहे. मात्र नऊ तारखेनंतर पावसाची उघडीप राहणार आहे. 9-16 मे दरम्यान तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे.

या कालावधीत 45° डिग्री सेल्सिअस पर्यंत तापमान जाईल असा अंदाज आहे. निश्चितच यावेळी उकाड्यात वाढ होणार आहे यामुळे नागरिकांना थोडीशी अडचण होऊ शकते. परंतु पावसाची उघडीप राहणार असल्याने काही भागातील शेतकऱ्यांना दिलासा मिळेल असे चित्र आहे.

हे पण वाचा :- अहमदनगर, नासिक, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूरसह ‘या’ जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस; भारतीय हवामान विभागाचा अलर्ट