Punjab Dakh Weather Report : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी थोडीशी दिलासादायक बातमी समोर येत आहे. वास्तविक गेल्या काही दिवसांपासून राज्यात अवकाळी पाऊस आणि गारपीट होत आहे.
गेल्या महिन्यात देखील अवकाळी पावसाने आणि गारपिटीने अक्षरशः थैमान माजवले होते. यामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
ऐन उन्हाळ्यात पडणारा हा पाऊस शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढवत होता. मात्र आता अवकाळी पाऊस लवकरच निरोप घेणार आहे. पंजाब डख यांनी याबाबत एक मोठी अपडेट दिली आहे.
हे पण वाचा :- चिंताजनक ! अवकाळीचा मुक्काम लांबला; ‘या’ तारखेपर्यंत जोरदार पावसाची शक्यता कायम, आज ‘या’ जिल्ह्यात पाऊस घालणार थैमान? पहा…..
डख यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात दोन मेपर्यंत अवकाळी पाऊस पडत राहणार आहे. म्हणजेच आज आणि उद्यापर्यंत पावसाची शक्यता कायम आहे.
आज दोन मे 2023 रोजी तसेच उद्या तीन मे रोजी राज्यातील विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रात पाऊस पडणार आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाचा जोर अधिक राहणार असला तरी देखील पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रात ठिकाणीच पाऊस पडणार आहे.
दोन तारखे नंतर मात्र पावसाची उघडीप राहणार आहे. दोन मे पासून ते चार मे पर्यंत पावसाची उघडीप राहील आणि त्यानंतर पाच मे ते सात मे दरम्यान पुन्हा एकदा राज्यात पावसाची शक्यता कायम राहणार आहे.
हे पण वाचा :- मोठी बातमी ! महाराष्ट्रात नवीन 22 जिल्ह्यांची निर्मिती होणार; नवीन जिल्ह्यांची यादी आली समोर, पहा….
5-7 मे पर्यंत राज्यातील उत्तर महाराष्ट्र म्हणजेच धुळे, नंदुरबार, जळगाव, नासिक, अहमदनगर या परिसरात पावसाची शक्यता राहणार आहे. याशिवाय पूर्व विदर्भात आणि मराठवाड्यातील तुरळक ठिकाणी या कालावधीमध्ये पाऊस पडेल असा अंदाज पंजाब डख यांनी वर्तवला आहे.
यानंतर मात्र पाऊस विश्रांती घेणार आहे. 8 मे पासून पावसाची उघडीप राहणार असून 9 मे ते 16 मे दरम्यान उन्हाची तीव्रता वाढणार आहे. एकंदरीत अजून काही दिवस राज्यात पाऊस पडणार आहे आणि त्यानंतर अवकाळी पाऊस विश्रांती घेईल यामुळे निश्चितच शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
हे पण वाचा :- पुणे-नासिक हायस्पीड रेल्वेला रेल्वे मंत्रालयाची परवानगी केव्हा मिळणार, प्रकल्पाची सद्यस्थिती काय? पहा….