कारवाई आणि कार्यवाही या दोन्ही शब्दांमधील फरक तुम्हाला माहिती आहे का? वाचा ए टू झेड माहिती

Published on -

आपण जेव्हा बोलतो तेव्हा अनेक प्रकारचे शब्द वापरतो. परंतु बोलत असताना आपण बऱ्याच शब्दांचा  वापर हा एकाच अर्थाने करत असतो. तसं पाहायला गेले तर बऱ्याच शब्दांचा उच्चार हा थोडा बहुत फरकाने सारखाच असतो व त्यामुळेच अर्थाच्या बाबतीत देखील आपली गल्लत उडते.

त्यामुळेच दोन वेगवेगळे शब्द देखील आपण बऱ्याचदा एकाच अर्थाने वापरतो. जसे आमंत्रण व निमंत्रण या दोन शब्दातील अर्थांमध्ये फरक आहे. अगदी त्याच पद्धतीने असे अनेक शब्द आहेत की त्यांचा उच्चार हा थोडा फरकाने सारखाच असतो. परंतु अर्थ मात्र वेगवेगळा होतो.

अगदी याच पद्धतीने कार्यवाही आणि कारवाई या दोन शब्दांचा वापर बरेच जण एकाच अर्थाने करतात. बोलतानाच नाही तर लिहिताना देखील आपण एकाच अर्थाने हे शब्द लिहीत असतो. परंतु या दोन्ही शब्दांचा अर्थ पाहिला तर तो संपूर्णपणे वेगळा आहे. त्याबद्दलचीच माहिती या लेखात घेऊ.

 कार्यवाही आणि कारवाई या शब्दांमध्ये काय आहे फरक?

आपण या दोन शब्दांचा अर्थ पाहिला तर वेगवेगळ्या आहे. यामध्ये कार्यवाही या शब्दाचा अर्थ पाहिला तर एखादी कामाची योजना आखणे, त्याची नियोजन करणे आणि त्या योजना किंवा नियोजनाप्रमाणे संबंधित काम करणे किंवा त्या कामाची अंमलबजावणी करणे या दृष्टिकोनातून कार्यवाही हा शब्द योग्य ठरतो.

याउलट संबंधित कामाची अंमलबजावणी करण्यामध्ये जर कोणी दुर्लक्ष केले किंवा हयगय केली तर संबंधित व्यक्तीला केली जाणारी शिक्षा किंवा दंड ठोठावणे या क्रियेला कारवाई असे म्हणतात. जर कार्यवाही आणि कारवाई हे दोन शब्द जर एकाच अर्थाने वापरले तर अर्थाचा बेअर्थ होऊ शकतो.

बऱ्याचदा ही दोनही शब्द चुकीच्या किंवा एकाच अर्थाने वापरले जातात. परंतु आपण वर पहिल्याप्रमाणे या शब्दांमध्ये फरक आहेच परंतु अर्थ देखील वेगवेगळे आहेत. यामध्ये उदाहरणच घ्यायचे झाले तर समजा एखाद्या वेळी सांगण्यात येते की या या वेळेला सगळ्यांनी मीटिंगसाठी हजर राहावे व या आदेशाची अंमलबजावणी करावी याला आपण कार्यवाही हा शब्द वापरू शकतो.

म्हणजेच मिटींगला हजर राहण्याचा जो काही आदेश आहे त्या आदेशाची अंमलबजावणी करणे म्हणजेच त्या आदेशाची कार्यवाही करणे  होय. परंतु जे कोणी दिलेल्या वेळेत उपस्थित राहणार नाहीत त्यांना जी शिक्षा किंवा दंड करण्यात येईल ती कारवाई होते.

अशा पद्धतीने कार्यवाही आणि कारवाई या दोन शब्दांमध्ये फरक आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News