तुम्हाला देखील म्हाडा कडून स्वस्तात घर हवे असेल तर ‘अशा पद्धती’ने करा अर्ज! कुठली लागतात कागदपत्रे? अर्ज करताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी?

Published on -

प्रत्येकाच्या मनामध्ये असते की स्वतःच्या हक्काचे घर असावे व ते देखील एखाद्या मोठ्या शहरांमध्ये. परंतु सध्या घर आणि जागांच्या किमती प्रचंड प्रमाणात वाढल्यामुळे प्रत्येक व्यक्तीला घर घेणे शक्य होत नाही. परंतु हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सरकारच्या म्हाडा आणि सिडको सारख्या गृहनिर्माण संस्था नागरिकांना मदत करत असतात.

आपल्याला माहित आहे की म्हाडा आणि सिडकोच्या माध्यमातून घरांच्या विक्रीकरिता सोडत काढण्यात येते व त्याकरिता सगळ्यात अगोदर आपल्याला अर्ज करणे गरजेचे असते. परंतु यामध्ये बरेच नागरिक असे असतात की त्यांनी यापूर्वी म्हाडाच्या घरांच्या लॉटरी करता अर्ज केलेला नसतो व ते पहिल्यांदा अर्ज भरत असतात.

त्यामुळे साहजिकच पहिल्यांदा अर्ज भरत असताना अनेक प्रकारचे प्रश्न मनामध्ये असतात किंवा काही समस्या देखील येऊ शकतात. अर्ज भरताना केलेली छोटीशी चूक देखील आपला अर्ज नाकारण्यासाठी कारणीभूत ठरू शकते. त्यामुळे या लेखात आपण पाहणार आहोत की म्हाडाचा अर्ज भरण्यासाठी काय करावे लागते आणि कुठल्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करावे लागते.

 म्हाडाच्या माध्यमातून घरासाठी अर्ज करताना या गोष्टी लक्षात घ्या

1- अशा पद्धतीने करतात अर्ज सगळ्यात अगोदर म्हाडाची जी काही अधिकृत वेबसाईट आहे त्यावर सर्वप्रथम नागरिकांना नोंदणी करणे गरजेचे असते व याकरिता तुम्हाला आधार आणि पॅन कार्ड ची गरज भासते. जेव्हा तुम्ही म्हाडाच्या वेबसाईटवर नोंदणी करतात तेव्हा तुम्हाला विचारलेली इतर आवश्यक माहिती अचूक भरणे गरजेचे असते या सगळ्या प्रक्रियेनंतर तुम्ही म्हाडात अर्ज करण्यास पात्र ठरतात.

2- फॉर्म भरताना या आहेत महत्त्वाच्या गोष्टी जेव्हा तुम्ही सोडती करिता म्हाडात अर्ज करता तेव्हा सगळ्यात महत्त्वाची बाब असते ती म्हणजे तुम्ही कोणत्या कोट्यातून आणि गटातून फॉर्म भरणार आहात. ही बाब आपल्याला अगोदर ठरवावी लागते. कारण सर्वांना समान न्याय मिळावा याकरिता म्हाडात विभागवारी करण्यात आलेली आहे. उदाहरणच घ्यायचे झाले तर पत्रकार कोटा, डॉक्टर तसे स्वातंत्र्य सैनिक इत्यादी अनेक विभागांमध्ये येतात. त्यानंतर तुमच्या पगाराच्या किंवा इतर उत्पन्नानुसार त्या त्या गटात अर्ज करावा.

3- ही कागदपत्रे असतात आवश्यक म्हाडासाठी अर्ज करताना तुमच्याकडे पॅन कार्ड, आधार कार्ड, कॅन्सल चेक, अधिवास प्रमाणपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स तसेच पासपोर्ट फोटो, जन्म प्रमाणपत्र आणि अर्जदाराच्या संपर्काचा तपशील इत्यादी कागदपत्रे आवश्यक असतात.

 म्हाडा कडून घर घेण्यासाठी कोण करू शकतो अर्ज?

अठरा वर्षावरील कोणत्याही नागरिकाला म्हाडाच्या माध्यमातून घर घेण्यासाठी अर्ज करता येऊ शकतो. परंतु महत्त्वाचे म्हणजे त्यांनी महाराष्ट्रात किमान 15 वर्ष वास्तव केलेले असणे गरजेचे आहे. बऱ्याचदा म्हाडाचा अर्ज भरताना अनेक प्रकारच्या समस्या उद्भवतात या समस्यांचे निराकरण करण्यासाठी तुम्ही 022-26598924 किंवा 1800-4250-018 या क्रमांकावर संपर्क साधू शकतात.

 फॉर्म भरा परंतु या चुका टाळा

फॉर्म भरताना तुमचे नाव तसेच पत्ता व कामाची माहिती अचूकपणे नमूद करणे गरजेचे आहे. जर कागदपत्रे तपासणीच्या वेळी भरलेली माहिती आणि कागदपत्रे यामध्ये काही तफावत आढळल्यास तुमचा फॉर्म रद्द केला जाऊ शकतो. तसेच नोंदणी आणि पेमेंटच्या पावत्या डाऊनलोड करणे गरजेचे आहे व त्या व्यवस्थित सांभाळून ठेवाव्यात.

जर या पावत्या हरवल्या तर अडचण निर्माण होण्याची शक्यता असते. जेव्हा तुम्ही म्हाडाची फाईल तयार कराल तेव्हा तुम्ही चार फाईल तयार करावे. यामध्ये एक बँकेसाठी, दुसरी म्हाडा कार्यालयासाठी आणि दोन स्वतःसाठी  कारण भविष्यात जर काही फायलींचा घोळ झाला तर तो तुम्हाला तुमच्याकडील दोन फायदे कामात येतात.

 महत्त्वाचे

जर तुमची लॉटरीमध्ये नाव आल्यास तुम्हाला सगळ्यात अगोदर कागदपत्रे जमा करणे गरजेचे असते. कागदपत्रे गोळा करण्यासाठी तुम्हाला एक तारीख दिलेली असते व या तारखेला तुम्हाला सर्व कागदपत्रे जमा करणे गरजेचे असते. अगोदर जर तुमच्याकडे कागदपत्रे नसतील तर म्हाडा कडून तुम्हाला वेळ दिला जायचा.

आता नवीन नियमानुसार तुम्हाला दिलेल्या तारखेला कागदपत्रे जमा करावीच लागतात. समजा तुम्हाला म्हाडाच्या  माध्यमातून घर मिळाले नाही तर अर्जदाराने जी काही रक्कम भरलेली असते ते सात दिवसात रिफंड केली जाते. यासंबंधीची स्टेटस तुम्ही म्हाडाच्या वेबसाईटवर जाऊन तुमच्या प्रोफाईल मध्ये लॉगिन करून तपासू शकता.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!