Vastu Tips: तुमच्याही घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे का? त्यामुळे होत असेल नुकसान तर करा ‘हे’ उपाय

Ajay Patil
Published:
vastu tips

Vastu Tips:- वास्तुशास्त्र हे एक महत्त्वाचे शास्त्र असून यामध्ये तुमच्या घराची बाह्य आणि अंतर्गत रचना कशी असावी याबाबत सखोल अभ्यास करण्यात आलेला आहे. तसेच घरामध्ये जर काही गोष्टींमध्ये चुकी झाली तर त्यामुळे एकंदरीत कुठले नुकसान होऊ शकते व त्यावर उपाय काय करावे इत्यादीबाबत देखील सविस्तरपणे विवेचन केल्याचे आपल्याला दिसून येते.

त्यामुळे जास्त करून प्रत्येक व्यक्ती आता वास्तुशास्त्रानुसार पाहूनच घराची रचना किंवा घराचे बांधकाम करते व त्या पद्धतीनेच घराची उभारणी केली जाते. या वास्तुशास्त्रानुसार जर आपण बघितले तर एखाद्या घराचा दरवाजा जर दक्षिण दिशेला असेल तर घरामध्ये किंवा कुटुंबावर त्याचा काय परिणाम होऊ शकतो व असा वाईट परिणाम टाळण्याकरिता आपण काय उपाययोजना करणे गरजेचे आहे? याबाबतची महत्त्वपूर्ण माहिती बघू.

 घराचा दरवाजा दक्षिण दिशेला असल्यामुळे होत असेल नुकसान तर काय आहे उपाय?

घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला असेल तर घरामध्ये अनेका अप्रिय किंवा नकारात्मक घटना घडण्याची शक्यता वाढते. वास्तुशास्त्रानुसार बघितले तर दक्षिण दिशा ही यमराजची दिशा म्हटली जाते व या दिशेला जर मुख्य दरवाजा असेल तर मात्र ते अशुभ मानले जाते व त्यावर काही उपाय करणे गरजेचे आहे. या उपायांमध्ये प्रामुख्याने….

1- दक्षिण दिशेला श्री.गणेशाची मूर्ती ठेवावी जर घराच्या दरवाजा दक्षिण दिशेला असेल तर तुम्ही श्री गणेशाची मूर्ती दक्षिण दिशेला लावणे गरजेचे आहे. त्यामुळे दक्षिण दिशेला दरवाजा असल्यामुळे होत असलेला अशुभ प्रभाव कमी व्हायला मदत होते. यामध्ये गणेश मूर्ती दररोज स्वच्छ करावी आणि लक्षात ठेवावे की घराचे मुख्य प्रवेशद्वार दक्षिण दिशेला असेल तरच गणेश देवाची मूर्ती घराच्या दक्षिण दिशेला ठेवावी.

2- दक्षिणेकडील भिंतीवर स्वस्तिक काढावा घरामध्ये जर काही निगेटिव्ह एनर्जी म्हणजेच नकारात्मक ऊर्जा वाटत असेल तर ती दूर करण्यासाठी दक्षिण दिशेला असलेल्या भिंतीवर स्वस्तिकाचे चिन्ह काढावे. त्यामुळे घरामधील जे काही नकारात्मक ऊर्जेचे वातावरण तयार झालेले असते ते दूर होण्यास मदत होते व घरामध्ये सुख-समृद्धी यायला मदत होते.

3- भगवान हनुमंताचा फोटो दक्षिण दिशेला लावावा घराचा दरवाजा दक्षिण दिशेला असेल तर त्याचा होणारा अशुभ प्रभाव टाळण्याकरता तुम्ही दक्षिण दिशेला आशीर्वाद देण्याच्या मुद्रेत असलेल्या हनुमानजींचा फोटो किंवा चित्र लावणे आवश्यक आहे. याशिवाय तुम्ही पंचमुखी हनुमान जी चा फोटो देखील दक्षिण दिशेला लावू शकतात. त्यामुळे देखील घरावरील सर्व संकटे दूर होण्यास मदत होते.

4- कॅक्टस म्हणजेच निवडुंग दक्षिण दिशेला ठेवावे वास्तुशास्त्रानुसार बघितले तर निवडुंगाचे रोप घरामध्ये लावणे हे अशुभ मानले जाते. परंतु घराचा दरवाजा दक्षिण दिशेला असल्यामुळे उपाय म्हणून निवडुंग जर लावले तर त्यामुळे अशुभ प्रभाव दुर होण्यास मदत होते. त्यासोबतच  घरातील नकारात्मक ऊर्जा नाहीशी होते व नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करत नाही.

5- घरामध्ये दक्षिण दिशेला मोठा आरसा लावावा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला असेल तर दक्षिण दिशेला असलेल्या दरवाज्याच्या विरुद्ध दिशेला असलेल्या भिंतीवर मोठा आरसा लावावा. यामुळे घरामध्ये येणारे नकारात्मक ऊर्जाची आरशाची टक्कर होऊन ती नकारात्मक ऊर्जा मागे जाण्यास मदत होईल.

( टीपवरील माहिती वाचकांसाठी माहितीस्तव सादर केलेली आहे याविषयी आम्ही कुठल्याही प्रकारचा दावा अथवा समर्थन करत नाहीत.)

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe