मुंगूस दिसणे हे शुभ असते की अशुभ; मुंगुसाचे दिसणे हे धनलाभाचा संकेत देते का? वाचा याबद्दल माहिती

Published on -

हिंदू धर्म आणि त्याच्या परंपरा या खूप  वैशिष्ट्यपूर्ण असून हिंदू धर्मामध्ये अनेक प्राण्यांचे महत्त्व देखील विशद केलेले आहे. यातील काही प्राणी हे अशुभ किंवा त्यांचे दिसणे हे अशुभ मानले जाते तर काही प्राण्यांचे दिसणे हे शुभ मानले जाते. आपल्याला माहित आहे की बऱ्याच प्राण्यांचा संबंध हा देवांशी देखील जोडला गेलेला असून त्यानुसार आपण संबंधित प्राण्यांना महत्त्व देखील देत असतो.

यामध्ये आपण गाईला शुभ मानतो तसेच मांजर जर आडवी गेली तर आपण त्याला अशुभ मानतो. असे अनेक प्रकारचे शुभ व अशुभाचे तर्कवितर्क आपण प्राण्यांवरून लावत असतो. त्याचप्रमाणे आपण मुंगूस या छोट्याशा प्राण्याबद्दल पाहिले तर याला हिंदू धर्मामध्ये विशेष महत्त्व आहे. मुंगसाचे दिसणे हे शुभ असते असे आपण अनेकांच्या तोंडी ऐकले असेल. मुंगुसाचे दिसणे हे शुभ असते की अशुभ याविषयीची माहिती आपण या लेखात बघू.

 मुंगुसाचे दिसणे फलदायी असते का?

ज्योतिष शास्त्रानुसार बघितले तर सूर्याचे प्रतीक म्हणून मुंगूसाला ओळखले जाते ज्योतिष शास्त्रानुसार अनेक शुभचिन्हे हे मुंगूसाशी संबंधित आहेत. मुंगूस व्यक्तीच्या जीवनामध्ये सूर्यासारखी चमक आणतो असे देखील मानले जाते. ज्योतिष शास्त्रानुसार बघितले तर सकाळच्या वेळेस एखाद्या व्यक्तीला जर मुंगूस दिसला तर लवकरच त्याला धनलाभ होण्याची शक्यता आहे असे समजावे.

तसेच तुम्ही सकाळी उठले आहात व तुम्हाला परिसरामध्ये मुंगूस दिसला तर सात दिवसात तुम्हाला धनाशी संबंधित एखादी चांगली बातमी कानावर मिळणार आहे असे समजले जाते.तसेच तुम्ही कुठे जायला निघालात व मुंगूसाने तुमचा रस्ता ओलांडला तर तुमचे सर्व कामे होतील देखील मानले जाते.

एवढेच नाही तर तुम्ही कोर्ट कचेरीच्या कामाला जात असाल व तुम्हाला मुंगुसाचे दर्शन झाले तर तुमचे काम यशस्वी होणार हे निश्चित समजले जाते. कुठल्यातरी कामासाठी तुम्ही जात असाल व तुम्हाला मुंगूस आडवा गेला तर त्या कामात मला यश मिळते असे देखील सांगितले जाते.

 धार्मिक शास्त्रानुसार मुंगूस आणि कुबेर यांचा संबंध काय आहे?

धनाची देवता म्हणून कुबेर देवाला ओळखले जाते व धार्मिक शास्त्रानुसार मुंगूस हे भगवान कुबेराचं वाहन आहे. इतकेच नाही तर भगवान कुबेरांना धनाचे रक्षक देखील मानले जाते. त्यामुळे मुंगूस हे कुबेराचे वाहन दिसणं हे धनलाभच्या दृष्टीने शुभ म्हटले जाते. व्यक्तीला जर मुंगूस दिसला तर आर्थिक भरभराट होणार असा त्याचा संकेत समजला जातो. येणाऱ्या काळात तुमचे नशीब उजळणार याचे हे लक्षण असते. म्हणजेच धार्मिक शास्त्रानुसार बघितले तर मुंगूस दिसणे म्हणजेच साक्षात कुबेराचे दर्शन होण्यासारखे  असते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News