Real Estate:- गेल्या काही वर्षापासून जर आपण पाहिले तर रियल इस्टेट क्षेत्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर वाढ होताना आपल्याला दिसून येत आहे व यामध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांची संख्या देखील दिवसेंदिवस वाढताना आपल्याला दिसत आहे. भारतामध्ये अशी काही शहरे आहेत की यामध्ये गेल्या काही वर्षापासून रियल इस्टेट क्षेत्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याचे चित्र आहे
व यामध्ये प्रामुख्याने महाराष्ट्रातील मुंबई तसेच पुणे व नाशिक सारख्या शहरांचा समावेश करता येईल. महाराष्ट्रातील या शहरांसोबतच देशातील आयोध्या तसेच द्वारका, पुरी, वाराणसी या शहरांमध्ये देखील रिअल इस्टेट क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. त्यामुळे देशातील अशी काही शहरे आहेत की त्या ठिकाणी येणाऱ्या काही वर्षात रिअल इस्टेट क्षेत्रामध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.

भारतातील या शहरांमध्ये रिअल इस्टेट क्षेत्रात होऊ शकते वाढ
याबाबत सविस्तर वृत्त असे की, भारतातील आयोध्या, वाराणसी, द्वारका, पुरी, महाराष्ट्रातील शिर्डी, तिरुपती आणि अमृतसर यासह इतर शहरांमध्ये येत्या काही वर्षांमध्ये रिअल इस्टेट क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर वाढ होण्याची शक्यता असून यामागे त्या ठिकाणाच्या आध्यात्मिक पर्यटन, पायाभूत सुविधा प्रकल्पांची उभारणी आणि डिजिटलायझेशन यासारखी कारणे आहेत.
रियल इस्टेट कन्सल्टन्सी कॉलियर्स इंडियाचा अंदाज
भारतातील रियल इस्टेट कन्सल्टन्सी कॉलियर्स इंडियाने 100 पेक्षा अधिक शहरांपैकी तीस संभाव्य चांगली वाढ होऊ शकेल अशी शहरे ओळखली असून ज्या ठिकाणी रियल इस्टेटची वाढ मध्यम ते दीर्घ कालावधीसाठी असण्याची शक्यता आहे. यातील शहरांपैकी 17 शहरांमध्ये रियल इस्टेट क्षेत्रात वाढवण्याची अपेक्षा वर्तवण्यात आलेली आहे. यामध्ये या कन्सल्टन्सीने म्हटले आहे की, शिर्डी, तिरुपती, अमृतसर, आयोध्या, द्वारका, पुरी आणि वाराणसी ही आध्यात्मिक पर्यटनाच्या दृष्टिकोनातून रियल इस्टेट क्षेत्रात वाढीच्या दृष्टिकोनातून उदयास येणारी शहरे आहेत.
देशातील या 17 शहरांमध्ये वेगाने वाढणारी रियल इस्टेट
जर आपण भारतातील रियल इस्टेट क्षेत्राचा विचार केला तर प्रामुख्याने पूर्व, पश्चिम आणि मध्य तसेच त्यासोबत उत्तर आणि दक्षिण इत्यादी प्रदेशांमध्ये समान वाढ दर्शवते. यामध्ये उत्तर भारतातील अमृतसर, जयपुर, अयोध्या, कानपूर, लखनऊ आणि वाराणसी या शहरांचा समावेश आहे तर पूर्व भारतातील पाटणा आणि पुरी, पश्चिम भारतातील शिर्डी, नागपूर, द्वारका आणि सुरत तर दक्षिण भारतातील कोची, तिरुपती, कोइंबतूर, विशाखापट्टणम आणि मध्य भारतातील इंदूर या शहरांचा समावेश आहे.