28 मे ला लॉन्च होणार Realmi Narzo N65 5G स्मार्टफोन! कमी किमतीमध्ये मिळणार 50 मेगापिक्सलचा AI कॅमेरा आणि बरेच काही

Published on -

स्मार्टफोन उत्पादक कंपन्यांमध्ये अनेक नामांकित कंपन्या असून प्रत्येक कंपनी अनेक आकर्षक फीचर्स असलेले व ग्राहकांना परवडतील अशा किमतीमध्ये स्मार्टफोन लॉन्च करत असतात. भारतामध्ये देखील अशाच पद्धतीने अनेक टेक कंपनी असून  या कंपन्यांच्या माध्यमातून परवडणाऱ्या दरांमध्ये अनेक वैशिष्ट्यपूर्ण असे स्मार्टफोन लॉन्च करण्यात जणू स्पर्धा दिसून येते.

या स्मार्टफोन उत्पादक कंपन्यांमध्ये जर आपण रियलमी या टेक कंपनीचा विचार केला तर ही कंपनी देखील एक प्रसिद्ध कंपनी असून या कंपनीच्या स्मार्टफोन देखील ग्राहकांच्या पसंतीस पडल्याचे आपल्याला दिसून येते.

त्यामुळे आता रियलमी या कंपनीने भारतीय बाजारपेठेमध्ये नवीन Narzo सिरीज स्मार्टफोन N65 5G लॉन्च  करण्याचा निर्णय घेतला असून येत्या 28 मेला हा भारतीय बाजारामध्ये लॉन्च केला जाणार आहे व याची माहिती कंपनीने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वर दिली आहे.

 स्वस्तातल्या या स्मार्टफोनमध्ये उपलब्ध आहेत तीन स्टोरेज पर्याय

या लॉन्च होऊ घातलेल्या स्मार्टफोनचे प्रॉडक्ट पेज अमेझॉन या ई-कॉमर्स साइटवर लाईव्ह झाले असून त्या ठिकाणी या फोनचे अनेक स्पेसिफिकेशन्स समोर आले असून त्यानुसार बघितले तर हा फोन तीन मेमरी व्हेरीयंटमध्ये लॉन्च केला जाण्याची शक्यता आहे.

यामध्ये चार जीबीची रॅम व 64 जीबी आणि 128 जीबीचा स्टोरेज पर्याय असणार आहे व त्याचवेळी शीर्ष वेरियंट सहा जीबी रॅम आणि 128 जीबी मेमरीसह येईल अशी देखील शक्यता असून हा स्मार्टफोन खोल हिरवा आणि अंबर सोनेरी रंगांमध्ये खरेदी करता येईल.

 कशी राहिली याची स्क्रीन?

Narzo N65 5G स्मार्टफोन मध्ये 6.67 इंचाचा एचडी प्लस डिस्प्ले असणार आहे. पंच होल स्टाइल स्क्रीन 625 नीट्सच्या ब्राईटनेसला सपोर्ट करेल आणि 120Hz रिफ्रेश दराने स्क्रीन काम करेन.

 कसा आहे कॅमेरा?

या स्मार्टफोनमध्ये मागील पॅनलवर ड्युअल कॅमेरा सेटअप उपलब्ध असेल व यामध्ये एलईडी फ्लॅश व 50 मेगापिक्सल प्राथमिक लेन्स असेल जे एआय तंत्रज्ञानाने सुसज्ज असेल.

 प्रोसेसर कसा आहे?

या स्मार्टफोनमध्ये मीडियाटेक डायमेन्शन 6300 ऑक्टोकोअर प्रोसेसर दिला जाणार असून हा सहा एनएम फॅब्रिकेशन वर तयार केलेला मोबाईल चीपसेट असून जो 2.4 GHz पर्यंत क्लॉक स्पीड वर चालेल.

 बॅटरी कशी असेल?

या स्मार्टफोनमध्ये पावर बॅकअप करिता 5000mAh बॅटरी असणार असून ते चार्ज करण्यासाठी 15W फास्ट चार्जिंग तंत्रज्ञान या स्मार्टफोनला प्रदान केले जाणार आहे.

 सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून काय पर्याय आहेत?

हा स्मार्टफोन IP54 प्रमाणेच असेल व तो पाण्यावरील धुळीपासून देखील सुरक्षित राहील व रेन वॉटर स्मार्ट टच तंत्रज्ञान देखील यामध्ये उपलब्ध असणार आहे व यामुळे ओला हाताने देखील तुम्ही फोन आरामात वापरू शकणार आहात.

 Realmi Narzo N65 ची अपेक्षित किंमत

1- चार जीबी रॅम+64 जीबी स्टोरेजकिंमत 9999

2- चार जीबी रॅम+128 जीबी स्टोरेज किंमत 10 हजार 999

3- सहा जीबी रॅम+ 128 जीबी स्टोरेज किंमत 12 हजार 999 रुपये

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe