Salary Hike: ‘या’ सरकारी कर्मचाऱ्यांच्या जीवनामध्ये येणारा आनंद! पगारामध्ये होणार दुप्पटीने वाढ? वाचा ए टू झेड माहिती

Published on -

Salary Hike:- या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्र कर्मचाऱ्यांच्या अनेक प्रकारच्या मागण्या पूर्ण केल्या जातील अशा अपेक्षा होत्या व या मागण्या प्रामुख्याने महागाई भत्तावाढ तसेच आठव्या वेतन आयोगाची स्थापना इत्यादीच्या अनुषंगाने आहेत. साधारणपणे या व इतर मागण्या या लोकसभा निवडणुकीच्या आधी पूर्ण केल्या जातील किंवा त्यासंबंधीच्या काही घोषणा होतील अशा प्रकारची शक्यता व्यक्त करण्यात येत होती.

परंतु तसे काही होऊ शकलेले नाही. परंतु आता देशामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली तिसऱ्यांदा सरकार स्थापन झाले असून आता काहीतरी याबाबत हालचाली होतील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. परंतु यामध्ये आता केंद्र सरकारच्या ज्या काही कंपन्या आहेत त्यामध्ये काम करणारे वरिष्ठ अधिकाऱ्यांकरिता एक आनंदाची बातमी असून त्या कर्मचाऱ्यांचा पगार दुप्पट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे

व यासंबंधीचा जो काही प्रस्ताव आहे त्यावर सरकार गंभीरपणे विचार करत असल्याची माहिती समोर आलेली आहे. साधारणपणे हा प्रस्ताव सरकारी कंपन्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना जो काही पगार मिळतो त्याबद्दल आणि त्या पगारातील तफावतीबाबतच आहे. त्यामुळे येणाऱ्या कालावधीमध्ये सरकारच्या माध्यमातून यावर काय निर्णय घेतला जातो याकडे सरकारी कर्मचाऱ्यांचे लक्ष लागून आहे.

 या सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात होणार दुप्पट वाढ?

केंद्र सरकारच्या सरकारी कंपन्यांमध्ये काम करणारे जे काही वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांचा पगार दुप्पट होण्याची शक्यता असून याबाबतचा प्रस्ताव सादर करण्यात आलेला आहे. हा प्रस्ताव प्रामुख्याने त्यांना मिळणारा पगार व पगार मधील तफावत याबाबत आहे. याबाबतची महत्त्वपूर्ण माहिती एका इंग्रजी वृत्तपत्राच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे.

सरकार या प्रस्तावावर गंभीरपणे विचार करत असल्याची माहिती समोर आली आहे व सरकारने जर या प्रस्तावाला मंजुरी दिली तर संबंधित कंपन्यातील जे वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांच्या पगारामध्ये शंभर टक्के वाढ होईल असं अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. जर आपण आजची परिस्थिती पाहिली तर सरकारी कंपन्यांमध्ये काम करणारे जे वरिष्ठ एक्झिक्युटिव्ह आहेत ते खाजगी क्षेत्रातील समकक्ष असलेल्या कर्मचाऱ्यांच्या तुलनेत कमी पगार घेतात.

या पगार तफावतीमुळे बऱ्याचदा वरिष्ठ पातळीवरील जे काही एक्झिक्युटीव्ह आहेत ते नोकरी सोडतात व त्यामुळे सरकारी कंपन्यांमध्ये टॅलेंट व आवश्यक असलेल्या कर्मचाऱ्यांचे प्रमाण घटते व असे कर्मचारी टिकून राहावेत म्हणून हा पगारवाढीचा प्रस्ताव आला असून त्यावर सरकारच्या माध्यमातून विचार केला जात असल्याचे सांगितले जात आहे.

 या गोष्टींवर अवलंबून असेल ही पगार वाढ

ज्या कंपन्यांचा टर्नओव्हर 100 कोटींपेक्षा जास्त आहे अशा सेंट्रल पब्लिक सेक्टर इंटरप्राईजेससाठी हा प्रस्ताव आहे. तसेच शंभर कोटींचा उलाढाल असणाऱ्या सरकारी कंपनीतील वरिष्ठ कर्मचाऱ्यांची ही पगारवाढ अनेक गोष्टींवर अवलंबून आहे. जसे की यामध्ये संबंधित कर्मचाऱ्यांचा परफॉर्मन्सवर पगार वाढ केली जाईल अशी शक्यता असून याकरिता असेट मॉनिटायझेशन तसेच प्रोजेक्ट पूर्ण करण्याचा वेग व नफा सारखे पॅरामीटर्स लक्षात ठेवले जातील.

 बजेटमध्ये होऊ शकतो काहीतरी सकारात्मक निर्णय

संबंधित प्रस्ताव केंद्रीय बजेट किंवा केंद्रीय अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी आर्थिक विषयाच्या कॅबिनेट कमिटीकडे जाऊ शकतो व त्यानंतर या कॅबिनेटमध्ये यावर विचार केला जाईल. तसेच 2024-25 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प देखील या महिन्यात सादर होणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामण यांनी अंतरिम अर्थसंकल्प मांडला होता व आता निवडणुका संपल्यानंतर पूर्ण बजेट मांडण्यात येणार आहे. या सगळ्या घडामोडीत प्रस्ताव मंजूर केला जाईल अशी शक्यता आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe