एसबीआय बँक ग्राहकांसाठी कामाची बातमी ! आता नवीन चेकबुक मागवण्यासाठी ‘इतकं’ शुल्क भरावे लागणार, चेकबुकबाबतचे SBI चे नियम वाचा…

बँक आपल्या ग्राहकांना विविध प्रकारचे कर्ज देते तसेच फिक्स डिपॉझिट मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना देखील चांगला परतावा देत आहे. याशिवाय बँकेच्या माध्यमातून ग्राहकांना पैशांचे व्यवहार सुलभतेने करता यावे यासाठी एटीएम कार्ड तसेच चेकबुक चा पर्याय उपलब्ध करून दिला जातो.

Published on -

SBI Cheque Book Order : एसबीआय ही देशातील सर्वात मोठी सरकारी बँक. या बँकेचे करोडो कस्टमर आहेत. बँकेच्या माध्यमातून आपल्या ग्राहकांना वेगवेगळ्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. बँक आपल्या ग्राहकांना विविध प्रकारचे कर्ज देते तसेच फिक्स डिपॉझिट मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना देखील चांगला परतावा देत आहे.

याशिवाय बँकेच्या माध्यमातून ग्राहकांना पैशांचे व्यवहार सुलभतेने करता यावे यासाठी एटीएम कार्ड तसेच चेकबुक चा पर्याय उपलब्ध करून दिला जातो.

दरम्यान जर तुम्ही ही एसबीआयचे ग्राहक असाल आणि तुमचे चेकबुक संपले असेल, म्हणजे चेकबुक मधील सर्व चेक संपले असतील आणि तुम्हाला नवीन चेकबुक ऑर्डर करायचे असेल तर आजची बातमी तुमच्यासाठी कामाचे ठरणार आहे. कारण की आज आपण नवीन चेकबुक ऑर्डर करण्यासाठी एसबीआय किती शुल्क वसूल करते याबाबत माहिती पाहणार आहोत.

एसबीआय कडून नवीन चेक बुक मागवण्यासाठी किती पैसे लागतात

मित्रांनो जर तुमचे चेकबुक संपले असेल तर तुम्हाला नव्या चेकबुक साठी अर्ज सादर करावा लागणार आहे. मात्र यासाठी तुम्हाला काही शुल्क द्यावे लागणार आहेत. एसबीआयचे कस्टमर 10, 20, 50 आणि 100 लीव्सच्या चेकबुक साठी अर्ज करू शकतात.

एसबीआय ने दिलेल्या माहितीनुसार एका आर्थिक वर्षात ग्राहकांना दहा लीफ मोफत मिळतात. त्यासाठी ग्राहकांना कोणतेच शुल्क द्यावे लागत नाही.

मात्र हे दहा फ्री लीफ नंतर 10 लीफ असणाऱ्या चेकबुक साठी अर्ज करणार असाल तर तुम्हाला चाळीस रुपये प्लस जीएसटी एवढे शुल्क द्यावे लागणार आहे. 25 लीफ असणाऱ्या चेकबुक साठी अर्ज करणार असाल तर तुम्हाला 75 रुपये प्लस जीएसटी एवढे शुल्क द्यावे लागणार आहे.

मात्र इथे एक गोष्ट लक्षात ठेवा की सीनियर सिटीजन सेविंग अकाउंट आणि सॅलरी पॅकेज अकाउंट अंतर्गत खोलल्या गेलेल्या बँक खात्यासाठी चेक बुक करिता पैसे लागत नाहीत.

तसेच ज्या लोकांचे करंट अकाउंट म्हणजे चालू खाते आहे अशा लोकांना एका आर्थिक वर्षात 30 चेक मोफत मिळतात. मात्र यानंतर अप्लाय केल्यास प्रति लीफ तीन रुपये प्लस जीएसटी एवढे शुल्क द्यावे लागते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News