बँक ऑफ बडोदाकडून 5 वर्षांसाठी 11 लाख रुपयांचे कर्ज घेतले तर किती रुपयांचा हप्ता भरावा लागणार ? पहा संपूर्ण कॅल्क्युलेशन…..

अनेकजण बँकेत जाऊन पर्सनल लोन घेतात. जेव्हा कुठूनच पैशांची ऍडजेस्टमेंट होत नाही तेव्हा पर्सनल लोनचा पर्याय फायदेशीर ठरतो. पण या पर्सनल लोनचे व्याजदर नेहमीच अधिक राहते. बँक कोणतीही असली तरी देखील वैयक्तिक कर्जाचे व्याजदर हे चढेच असतात.

Tejas B Shelar
Published:
Bank Of Baroda News

Bank Of Baroda News : बँक ऑफ बडोदाच्या ग्राहकांसाठी आजची बातमी कामाची ठरणार आहे. आज आपण बँक ऑफ बडोदाच्या वैयक्तिक कर्जाची माहिती पाहणार आहोत. खरे तर आपल्यापैकी अनेकांना अचानक पैशांची गरज पडते.

अशावेळी, अनेकजण बँकेत जाऊन पर्सनल लोन घेतात. जेव्हा कुठूनच पैशांची ऍडजेस्टमेंट होत नाही तेव्हा पर्सनल लोनचा पर्याय फायदेशीर ठरतो. पण या पर्सनल लोनचे व्याजदर नेहमीच अधिक राहते.

बँक कोणतीही असली तरी देखील वैयक्तिक कर्जाचे व्याजदर हे चढेच असतात. बँक ऑफ बडोदा या सरकारी बँकेच्या माध्यमातूनही वैयक्तिक कर्जासाठी अधिकचे व्याज वसूल केले जाते.

तथापि जर तुम्हाला नजीकच्या काळात बँक ऑफ बडोदा कडून वैयक्तिक कर्ज घ्यायचे असेल तर आजचा हा लेख तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच वाचायला हवा.

बँक ऑफ बडोदाचे वैयक्तिक कर्जासाठीचे व्याजदर!

आम्ही आपणास सांगू इच्छितो की, बँक ऑफ बडोदा सध्या स्थितीला आपल्या ग्राहकांना 11.20% या किमान इंटरेस्ट रेट वर वैयक्तिक कर्ज ऑफर करत आहे. किमान इंटरेस्ट रेट म्हणजे सर्वात कमी व्याजदर.

मात्र या व्याजदराचा फायदा बँकेच्या माध्यमातून फक्त अशा लोकांना दिला जातो ज्या लोकांचे सिबिल स्कोर चांगले असते. किमान 800 च्या आसपास सिबिल स्कोर असणाऱ्या लोकांना या व्याजदराचा फायदा मिळतो.

आता आपण बँक ऑफ बडोदा कडून 11 लाखांचे वैयक्तिक कर्ज घेतले तर कितीचा हप्ता भरावा लागणार याचे कॅल्क्युलेशन थोडक्यात समजून घेणार आहोत.

बँक ऑफ बडोदाकडून 11 लाखाचे कर्ज घेतले तर

जर बँक ऑफ बडोदा कडून किमान 11.20% या रेटवर 11 लाख रुपयांचे कर्ज पाच वर्ष कालावधीसाठी मंजूर झाले तर सदर व्यक्तीला 24,027 रुपयाचा हप्ता भरावा लागणार आहे.

म्हणजेच या काळात सदर व्यक्तीला 14 लाख 41 हजार 620 रुपये भरावे लागणार आहेत. अर्थातच तीन लाख 41 हजार 620 रुपये फक्त व्याज म्हणून द्यावे लागणार आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe