SBI FD Scheme: 2 वर्षात व्हायचे असेल श्रीमंत तर एसबीआयच्या ‘या’ 4 एफडी योजनांमध्ये करा गुंतवणूक! मिळेल भरपूर व्याजदर

Ajay Patil
Published:
sbi fd scheme

SBI FD Scheme:- गुंतवणुकीची सुरक्षितता आणि मिळणारा परतावा या दृष्टिकोनातून गुंतवणुकीचे जे पर्याय उपलब्ध आहेत त्यामध्ये गुंतवणूकदारांकडून बँक आणि पोस्ट ऑफिसच्या गुंतवणूक योजनांना मोठ्या प्रमाणावर पसंती दिली जाते. यामध्ये वेगवेगळ्या बँकांनी मुदत ठेव योजना सुरू केलेले आहेत व त्यांचे व्याजदर व मिळणारा परतावा देखील वेगवेगळा आहे.

यामध्ये गुंतवणूकदारांना ज्या ठिकाणी जास्त व्याजदर मिळेल व त्या माध्यमातून परतावा जास्त मिळेल अशा ठिकाणी मुदत ठेव योजनांमध्ये गुंतवणूक केली जाते.

अगदी तुम्हाला देखील मुदत ठेव योजनांमध्ये गुंतवणूक करून भरपूर व्याजाचा फायदा घ्यायचा असेल तर स्टेट बँक ऑफ इंडियाच्या चार विशेष स्वरूपाच्या एफडी योजना तुमच्या मदतीला येऊ शकतात. याच योजनांची माहिती आपण थोडक्यात घेऊ.

 एसबीआयच्या या चार मुदत ठेव योजना देतील भरपूर परतावा

1- एसबीआय अमृत कलश स्टेट बँक ऑफ इंडियाची अमृत कलश योजना ही एक विशेष एफडी योजना असून या योजनेच्या माध्यमातून बँक 7.10 टक्के इतके व्याज देत आहे. या योजनेमध्ये गुंतवणूक करायची असेल तर त्याची अंतिम तारीख 30 सप्टेंबर 2024 आहे.

अमृत कलश एफडी योजनेचा कालावधी 400 दिवसांचा असून  कोणत्याही व्यक्तीला अमृत कलश विशेष योजनेमध्ये 400 दिवसाच्या कालावधीसाठी गुंतवणूक करता येते व यामध्ये हमी परतावा देखील मिळवणे शक्य आहे.

या योजनेमध्ये मासिक, तिमाही आणि सहामाही व्याज पेमेंट तुम्हाला घेता येते. ही 400 दिवसांची योजना आहे व त्या अगोदर जर तुम्ही पैसे काढले तर बँक लागू दरापेक्षा दंड म्हणून 0.50% ते 1% कमी व्याजदर वजा करू शकता.

2- एसबीआय वुई केअर एफडी स्टेट बँक ऑफ इंडियाची वुई केअर एफडी योजना देखील एक फायद्याची योजना असून या योजनेमध्ये तुम्ही पाच वर्ष ते कमाल 10 वर्षांकरिता गुंतवणूक करू शकता व या माध्यमातून सध्या 7.50 टक्के दराने व्याज दिले जात आहे. यामध्ये लक्षात घ्यावी की हे दर नवीन आणि नूतनीकरण योग्य एफडीवर उपलब्ध असणार आहेत.

3- एसबीआय अमृत वृष्टी एफडी स्कीम स्टेट बँक ऑफ इंडियाची अमृत वृष्टी योजना 15 जुलै 2024 रोजी लागू करण्यात आलेली असून यामध्ये 444 दिवसांच्या मुदत ठेवीवर 7.25 टक्के वार्षिक व्याजदर मिळतो.

तसेच ज्येष्ठ नागरिकांना 0.50% अतिरिक्त व्याजामध्ये मिळते. म्हणजे ज्येष्ठ नागरिकांना सर्वाधिक व्याज या योजनेतून दिले जात आहे. या योजनेमध्ये तुम्ही जास्तीत जास्त तीन कोटी रुपयांची गुंतवणूक करू शकतात.

4- एसबीआय सर्वोत्तम स्टेट बँक ऑफ इंडियाची सर्वात कमी योजना देखील एक महत्त्वाची योजना असून ही योजना पीपीएफ तसेच एनएससी आणि पोस्ट ऑफिसच्या इतर बचत योजनापेक्षा जास्त व्याज देत आहे.

ही योजना फक्त एक आणि दोन वर्ष कालावधीची योजना असून तुम्ही कमी वेळामध्ये देखील मोठा निधी या माध्यमातून तयार करू शकतात. जर तुम्ही दोन वर्षाची एफडी या योजनेअंतर्गत केली तर तुम्हाला 7.4% दराने व्याज मिळते.

हा सर्वसामान्यांसाठी व्याजदर असून ज्येष्ठ नागरिकांना या योजनेत 7.90% व्याज मिळत आहे. 1 वर्षासाठी गुंतवणूक केली तर त्यावर 7.10% सर्वसामान्य नागरिक व ज्येष्ठ नागरिकांना 7.60% व्याज मिळत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe