Shinde Sarkar Government Scheme : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे. लाडकी बहिण योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपये यांचा आर्थिक लाभ दिला जात आहे. म्हणजेच पात्र लाडक्या बहिणींना एका वर्षात 18 हजार रुपयांचा लाभ मिळणार आहे.
आतापर्यंत या योजनेचे एकूण पाच हप्ते पात्र महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले आहे. आगामी दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर शिंदे सरकारने नोव्हेंबर महिन्याचे पैसे देखील पात्र महिलांच्या खात्यात जमा केले आहेत.
अशातच महाराष्ट्र राज्यातील नोंदणीकृत बांधकाम कामगारांना दिवाळी बोनस देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची बातमी समोर आली आहे. बांधकाम कामगारांना दिवाळी बोनस म्हणून पाच हजार रुपयांचे अर्थसहाय्य दिले जाणार आहे.
ही बोनसची रक्कम दिवाळीपूर्वीच पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार संघटना संयुक्त कृती समिती निमंत्रक शंकर पुजारी यांनी याबाबतचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने नुकताच घेतला असल्याची माहिती यावेळी दिली आहे.
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार मंडळाकडे जमा असलेल्या कामगार उपकरामधून हा बोनस दिला जाईल अशी माहितीही यावेळी पुजारी यांनी दिली.
यासाठी सुमारे २७१९ कोटी २९ लाख रुपये खर्च होणार आहे. महाराष्ट्रातील तब्बल 54 लाख 38 हजार 585 नोंदणीकृत बांधकाम कामगारांना हा बोनस दिला जाणार आहे.
त्यामुळे या संबंधित नोंदणीकृत बांधकाम कामगारांची यंदाची दिवाळी आनंदात साजरी होणार असा आशावाद व्यक्त होऊ लागला आहे. खरंतर नोंदणीकृत बांधकाम कामगारांना बोनस मिळावा यासाठी गेल्या काही काळापासून सातत्याने पाठपुरावा केला जात होता.
अखेर कार हा पाठपुरावा आता यशस्वी झाला असून राज्य मंत्रिमंडळ बैठकीमध्ये कल्याणकारी मंडळामधील नोंदीत सक्रिय बांधकाम कामगारांना ५ हजार रुपयांचे अर्थसहाय्य (सानुग्रह अनुदान) देण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे.
यानुसार, १० ऑक्टोबर २०२४ अखेर मंडळामध्ये नोंदित (जिवित) असलेले २८ लाख ७३ हजार ५६८ तसेच मंडळाच्या संगणक प्रणालीवर नोंदणी व नुतनीकरणाकरिता प्राप्त झालेल्या २५ लाख ६५ हजार १७ अशा एकुण ५४ लाख ३८ हजार ५८५ बांधकाम कामगारांना ५ हजार रुपयांचे अर्थसहाय्य अर्थातच बोनस उपलब्ध करून दिला जाणार आहे. त्यामुळे या सदर बांधकाम कामगारांची दिवाळी यंदा मोठ्या थाटामाटात पार पडेल असे बोलले जात आहे.