SIP Vs RD: गुंतवणुकीसाठी म्युच्युअल फंड एसआयपी फायद्याची की पोस्टाची आरडी? 5 वर्षासाठी 5000 ची गुंतवणूक केली तर कुठे मिळेल किती परतावा?

गुंतवणुकीसाठी मोठ्या प्रमाणावर बँक आणि पोस्ट ऑफिसच्या मुदत ठेव आणि इतर योजनांना गुंतवणूकदारांकडून प्रथम पसंती दिली जाते व त्यामागील कारण म्हणजे गुंतवणुकीची सुरक्षितता आणि मिळणारा परतावा ही आहेत.

Ajay Patil
Published:
sip vs rd

SIP Vs RD: गुंतवणुकीसाठी मोठ्या प्रमाणावर बँक आणि पोस्ट ऑफिसच्या मुदत ठेव आणि इतर योजनांना गुंतवणूकदारांकडून प्रथम पसंती दिली जाते व त्यामागील कारण म्हणजे गुंतवणुकीची सुरक्षितता आणि मिळणारा परतावा ही आहेत. या खालोखाल गेल्या काही वर्षांपासून जर बघितले तर म्युच्युअल फंड एसआयपीमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या वाढताना दिसून येत आहे.

यामध्ये जर आपण रिकरिंग डिपॉझिट स्कीम म्हणजेच आरडी योजना आणि म्युच्युअल फंड एसआयपी या दोन्ही योजनांच्या गुंतवणुकीतून मिळणारा परताव्याच्या दृष्टिकोनातून विचार एसआयपी ही बाजाराशी निगडित असलेली योजना असल्यामुळे यामध्ये परताव्याची निश्चित हमी देता येत नाही.

परंतु आरडीमध्ये जर तुम्ही पैसे गुंतवले तर तुम्हाला मॅच्युरिटीवर नेमके किती पैसे मिळतील हे तुम्हाला सहज समजते. कारण यामध्ये किती व्याज मिळेल हे आपल्याला अगोदरच माहिती असते.

त्यामुळे सुरक्षित गुंतवणूक करायची असेल तर ते आरडीची निवड करू शकतात. जर तुम्हालाही गुंतवणूक सुरू करायची असेल आणि तुम्ही आरडी किंवा एसआयपी या दोन्ही पर्यायांपैकी एका पर्यायांमध्ये गुंतवणूक करू इच्छित असाल तर तुम्ही पाच हजार रुपयांची आरडी पाच वर्षे चालवल्यास आणि तेवढ्याच रकमेची एसआयपी सुरू केल्यास कोणत्या ठिकाणाहून तुम्हाला जास्त परतावा मिळेल हे जाणून घेणे महत्त्वाचे ठरेल.

 आरडीमध्ये 5000 ची गुंतवणूक केली तर किती परतावा मिळतो?

तुम्हाला बँक आणि पोस्ट ऑफिस या दोन्ही ठिकाणी आरडीचा पर्याय मिळतो. बँकांमध्ये आरडी एक ते दहा वर्षांसाठी करता येते तर पोस्ट ऑफिसमध्ये ही योजना पाच वर्षांकरिता आहे. या पद्धतीने तुम्ही जर पाच वर्षांकरिता पोस्ट ऑफिस आरडी मध्ये पाच हजार रुपये गुंतवले व तुम्हाला त्यावर 6.7 टक्के दराने व्याज मिळेल.

अशा पद्धतीने तुम्ही पाच वर्षात तीन लाख रुपयांची गुंतवणूक आरडी योजनेत कराल आणि त्यावर 6.7 टक्के व्याजदराने तुम्हाला 56 हजार 830 रुपये व्याज मिळेल.अशाप्रकारे तुम्ही गुंतवलेले तीन लाख रुपयाची रक्कम आणि त्यावर मिळालेले 56 हजार 830 रुपये व्याज मिळून पाच वर्षात तुम्हाला आरडी योजनेतून तीन लाख 56 हजार 830 रुपये मिळतील.

 एसआयपीमध्ये तुम्ही 5 वर्षांकरिता 5000 रुपयांचे गुंतवणूक केली तर किती फायदा मिळेल?

एसआयपी मधील गुंतवणूक ही थोडीशी जोखमीची असते. परंतु गुंतवणूक तज्ञांच्या मते एसआयपी मधून सरासरी 12 टक्क्यांचा परतावा मिळतो व सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे चक्रवाढ व्याजाचा फायदा देखील यामध्ये मोठ्या प्रमाणात मिळतो.

या परिस्थितीत तुम्ही जर पाच वर्षांकरिता पाच हजार रुपयांची एसआयपी सुरू केली तर तुमची एकूण तीन लाख रुपयांची गुंतवणूक होते व यावर 12 टक्के दराने एक लाख 12 हजार 432 रुपये व्याज मिळते.

अशाप्रकारे तुम्हाला पाच वर्षात चार लाख 12 हजार 432 रुपये मिळतात. यावरून जर बघितले तर आरडीच्या तुलनेत दुप्पट परतावा एसआयपी मधून मिळतो. परंतु परतावा जर बारा टक्क्यांपेक्षा जास्त असेल तर यापेक्षा देखील जास्त परतावा मिळू शकतो.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe