एसटी कर्मचाऱ्यांना आलेत बुरे दिन…! हजारो कर्मचाऱ्यांचे वेतन रखडले ; काय आहे नेमकं कारण

Published on -

ST Employee News : महाराष्ट्रातील शासकीय कर्मचाऱ्यांना गेल्या दोन दिवसांत शिंदे फडणवीस सरकारकडून मकर संक्रांतीच्या प्रवाला मोठी भेट देण्यात आली आहे. खरं पाहता, गेल्या अनेक वर्षांपासून के पी बक्षी समितीच्या शिफारशी लागू करण्याची मागणी मंत्रिमंडळ बैठकीत 10 जानेवारी रोजी स्वीकृत झाली.

तसेच राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना चार टक्के महागाई भत्ता वाढीचा देखील लाभ जुलै महिन्यापासून अनुज्ञय करण्यात आला असून हा लाभ जानेवारी महिन्यापासून रोखीने अदा होणार आहे. विशेष म्हणजे जुलै ते डिसेंबर महिन्यापर्यंतची डीए थकबाकी देखील कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. शिवाय काल राज्यातील निवृत्तीवेतनधारक आणि कुटुंब निवृत्तीवेतनधारकांना देखील महागाई भत्ता वाढीचा लाभ देण्यात आला आहे.

मात्र असे असले तरी राज्यातील एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांच्या अडचणी काही कमी होत नसल्याचे चित्र आहे. आता महामंडळातील कर्मचारी डिसेंबर महिन्यातील पेमेंट मिळाले नसल्याने अडचणीत सापडले आहेत. सांगली जिल्ह्यातील जवळपास 4,000 हून अधिक एसटी कर्मचाऱ्यांना पेमेंट मिळाल नसल्याच सांगितलं जात आहे.

जिल्ह्यातील महामंडळातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना डिसेंबर महिन्याच्या वेतनासाठी आठ कोटी 50 लाखांची आवश्यकता होती. मात्र शासनाकडून अनुदान मिळाले नसल्याने जिल्ह्यातील 4 हजार कर्मचारी अजूनही पगाराविनाच आहेत. यामुळे पेमेंट न झालेले कर्मचारी आर्थिक कोंडीत सापडले आहेत. खरं पाहता एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन हे सात ते दहा तारखे दरम्यान होत असते.

पण गेल्या दोन महिन्यांपासून वेतन वेळेवर मिळत नसल्याचे जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांकडून सांगितले गेले आहे. वास्तविक पाहता जिल्ह्यातील एकूण दहा आगारातून महामंडळाला चांगले उत्पन्न मिळत आहे मात्र इंधनाचे वाढलेले दर, एसटीसाठी लागणारा मेंटेनन्स खर्च यामुळे बहुतांशी अधिकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी महामंडळाकडे पैसा शिल्लक राहत नाही.

परिणामी राज्य शासनाच्या अनुदानावर कर्मचाऱ्यांचे वेतन अवलंबून असते. दोन महिन्यांपूर्वी महामंडळातील कर्मचाऱ्यांना वेळेवर पेमेंट मिळत होते मात्र आता वेळेवर पेमेंट मिळत नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये सरकार विरोधात रोष वाढत आहे. निश्चितच वेळेवर वेतन मिळाल्याने आर्थिक टंचाईचा सामना एसटीतील कर्मचाऱ्यांना करावा लागत आहे. 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe