ST Employee News : महाराष्ट्रातील एसटी कर्मचाऱ्यांसाठी दिलासादायक अशी बातमी समोर येत आहे. जानेवारी महिन्यातील पेमेंट जे की फेब्रुवारी महिन्यातील दहा तारखेपर्यंत एसटी कर्मचाऱ्यांना देऊ करणे अपेक्षित होते ते वेतन आता आज 16 फेब्रुवारी रोजी एसटी कर्मचाऱ्यांना मिळणार आहे.
शासनाच्या माध्यमातून एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी अखेर निधीची तरतूद करून देण्यात आली आहे. खरं पाहता एसटी कर्मचाऱ्यांना सात ते दहा तारखेच्या दरम्यान वेतन देणे अपेक्षित आहे. गेल्या वर्षी एसटी कर्मचाऱ्यांनी जो सहा महिन्याचा संप पुकारला होता त्यावेळी राज्य शासनाने एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनाची सर्वस्वी जबाबदारी घेतली होती.
विशेष म्हणजे न्यायालयात संदर्भात तत्कालीन राज्य सरकारने शब्द दिला होता. मात्र शिंदे फडणवीस सरकार सत्तेत आल्यापासून एसटी कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन मिळत नसल्याचे चित्र आहे. गेल्या काही महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांना एकदाही वेळेवर वेतन मिळालेले नाही. गेल्या महिन्यातही वेतन हे 12 ते 13 तारखेच्या दरम्यान एसटी कर्मचाऱ्यांना देण्यात आलं होतं. या महिन्यातही जवळपास संपूर्ण पंधरवाडा उलटून गेल्यानंतर वेतन मिळणार आहे.
जानेवारी महिन्यातील वेतनासाठी आणि मागील बॅकलॉग भरून काढण्यासाठी महामंडळाच्या माध्यमातून राज्य शासनाच्या अर्थ खात्याकडे 1062 कोटी रुपये मागितले गेले होते. वास्तविक, गेल्या काही महिन्यांपासून शासनाकडून एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी पूर्ण रक्कम दिली जात नाही. यामुळे, एसटी महामंडळाच्या माध्यमातून जानेवारी महिन्याच्या वेतनासोबतच मागील बॅकलॉग भरून काढण्यासाठी 1062 कोटी रुपये मागितले गेलेत. मात्र शासनाने एसटी महामंडळाला शासनाकडून मंजूर झालेल्या निधीच्या खर्चाचे विवरणपत्र मागितले.
दरम्यान एसटी महामंडळाकडून हे विवरणपत्र देण्यात आले आहे. काल राज्याचे मुख्य सचिव मनूकुमार श्रीवास्तव यांनी मंत्रालयात या संदर्भात बैठक घेतली. या बैठकीत परिवहन विभागाचे मुख्य सचिव पराग जैन नैनोटिया, एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चने इत्यादी उपस्थित होते.
दरम्यान एका प्रतिष्ठित मीडिया रिपोर्टने दिलेल्या माहितीनुसार या बैठकीत एसटी महामंडळाने जरी 1000 कोटी रुपयांहुन अधिकची मागणी केली असली तरी 350 कोटी रुपये तूर्तास महामंडळाला देण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे एसटी कर्मचाऱ्यांच्या जानेवारी महिन्याचा पगार आता आज 16 फेब्रुवारी 2023ला होणार आहे.