State Employee News : नुकताच महाराष्ट्र राज्य शासनाने एक मोठा निर्णय घेतला आहे. हा निर्णय राज्यातील राज्य कर्मचाऱ्यांच्या हिताचा आहे. राज्य शासनाने घेतलेल्या या नवीन निर्णयानुसार, राज्य कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगाच्या थकबाकीचा चौथा हप्ता जून महिन्याच्या वेतनासोबत तसेच पेन्शनासोबत दिला जाणार आहे.
यासाठी 24 मे 2023 रोजी राज्य शासनाच्या वित्त विभागाकडून शासन निर्णय देखील निर्गमित करण्यात आला आहे. खरं पाहता, राज्य शासनाच्या या निर्णयामुळे राज्य कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

यामुळे शासनाच्या या निर्णयाचे राज्य कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून स्वागत देखील केले जात आहे. अशातच मात्र राज्यातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सातवा वेतन आयोग थकबाकीच्या हप्त्यासंदर्भात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.
हे पण वाचा :- बातमी कामाची ! म्हाडाच्या घरासाठी कोण अर्ज करू शकत? अर्ज कुठं करावा लागणार? वाचा याविषयी ए टू झेड माहिती
खरं पाहता, राज्य शासनाच्या माध्यमातून राज्य कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगाच्या थकबाकीचा पहिला, दुसरा आणि तिसरा हप्ता देण्यासाठी शासन निर्णय काढण्यात आले आहेत. यानुसार विविध संवर्गातील राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगाच्या थकबाकीचा पहिला, दुसरा तसेच तिसरा हप्ता देण्यात आला आहे.
मात्र शासन निर्णय निर्गमित झालेला असतानाही राज्य शासकीय सेवेतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना अद्याप सातवा वेतन आयोगाच्या थकबाकीचा दुसरा व तिसरा हफ्ता मिळालेला नाही. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना केवळ सातवा वेतन आयोग थकबाकीचा पहिला हप्ता मिळालेला आहे.
हे पण वाचा :- मुंबई, नागपूर, पुण्यातील रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी; ‘या’ एक्सप्रेस ट्रेन रद्द, पहा यादी
दरम्यान आता राज्य शासकीय सेवेतील कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग थकबाकीचा चौथा हप्ता देण्यासाठी वित्त विभागाने शासन निर्णय निर्गमित केला आहे. मात्र, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना या आधीचेच थकबाकीचे हप्ते मिळालेले नसल्याने या शासन निर्णयाचा काय फायदा असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.
यामुळे अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाच्या पदाधिकाऱ्यांकडून लवकरच शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना 7th Pay Commission चा दुसरा, तिसरा आणि 14 हप्ता वितरित करण्यासाठी निधीची उपलब्धता करण्यात यावी अशी मागणी जोर धरू लागली आहे. यामुळे आता या संदर्भात शासनाकडून काय निर्णय घेतला जातो? याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहणार आहे.