Success Story:- आजकालच्या परिस्थितीमध्ये आपल्याला असे अनेक तरुण पाहायला मिळतात त्यांनी विविध विषयांमध्ये उच्च शिक्षण घेतलेले आहे. परंतु हे शिक्षण घेऊन नोकरीच्या पाठीमागे न लागता एखादा व्यवसायात ते उतरले आणि प्रचंड मेहनत करून व्यवसायाला यशाच्या शिखरावर पोहोचवले.
तसे पाहायला गेले तर तरुणांची मानसिकता या अशा प्रकारच्या असते की उच्च शिक्षण घेऊन चांगल्या पगाराची नोकरी मिळवली की संपूर्ण जीवन अगदी त्याच पद्धतीने ते जगतात. परंतु काही तरुण याला अपवाद असतात.
अगदी याच पद्धतीने जर आपण जुन्नर तालुक्यात असलेल्या नारायणगाव येथील चंद्रकांत अडसरे या तरुणाचा विचार केला तर या तरुणाने एग्रीकल्चर बिझनेस मॅनेजमेंट आणि त्यानंतर एमबीए मार्केटिंग पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. काही कालावधीसाठी नोकरी करून नंतर व्यवसाय करण्याचे ठरवले व नर्सरी साठी आवश्यक असलेल्या ट्रे ची निर्मिती करण्याचा व्यवसाय सुरू केला व आयुष्यामध्ये वेगळीच आर्थिक उंची गाठली.
चंद्रकांत नर्सरी ट्रे व्यवसायातून करतो लाखोत उलाढाल
याबाबत सविस्तर वृत्त असे की, जुन्नर तालुक्यात असलेल्या नारायणगाव येथील चंद्रकांत आडसरे हा एक उच्च शिक्षित तरुण असून त्यांनी एग्रीकल्चर बिजनेस मॅनेजमेंट आणि एमबीए मार्केटिंग मध्ये शिक्षण घेतले आहे. शिक्षण पूर्ण केल्यानंतर काही ठिकाणी नोकरी पण केली आणि नोकरी करत असताना मात्र एखाद्या शेतीपूरक व्यवसाय करावा असे मनामध्ये इच्छा होती.
व्यवसायांची चाचपणी सुरू असताना नर्सरीसाठी आवश्यक असणारे ट्रे तयार करण्याचा व्यवसायाची कल्पना त्याला सूचली व चार वर्षांपूर्वी केवळ एका मशीनच्या सहाय्याने व्यवसायाची मुहूर्तमेढ रोवली.
आज हा व्यवसाय हळूहळू वाढीस लागला व त्यांच्याकडे चार मशीन आणि दहा ड्रायर आहेत. त्यांनी त्यांच्या या व्यवसायाची ब्रँडीग मुक्ताई सिडलिंग ट्रे या नावाने केली.
कसे आहे व्यवसायाचे व्यवस्थापन?
सध्या त्यांच्या या कंपनीमध्ये चार ते पाच कामगार काम करतात व परिसरातील वेगवेगळ्या नर्सरीची ज्याप्रमाणे मागणी असते त्याप्रमाणे वेगवेगळ्या मशीनच्या साह्याने वेगवेगळ्या प्रकाराचे ट्रे तयार करतात. ऊस तसेच भाजीपाला पिके, झेंडू आणि फुल पिके इत्यादींसाठी लागणारी ट्रे ते बनवतात.
त्यांच्या या मुक्ताई सिडलिंग ट्रे कंपनीमध्ये तयार झालेला माल ते जुन्नर तसेच सिन्नर, नासिक, खेड, आंबेगाव, शिरूर, बारामती आणि महाराष्ट्राच्या बऱ्याच भागांमध्ये विक्री करतात. त्यांचे प्रमुख ग्राहक हे नर्सरी व्यवसायिक असून त्यांना या ट्रेची विक्री केली जाते.
त्यांच्या या व्यवसायाचे यशाची गमक जर पाहिले तर ते तयार करत असलेल्या मालाची क्वालिटी यामध्ये आहे. हे सगळे व्यवसायाच्या यशामागे त्यांना कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव यांचे विक्री तसेच मालाची ब्रँडिंग आणि मार्केटिंग,
व्यवसायांसाठी आवश्यक कर्जाची उपलब्धता इत्यादी बाबतीत मार्गदर्शन तर राहिलेच परंतु इतर तांत्रिक मार्गदर्शन देखील त्यांना कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव यांच्याकडून मिळण्यास मदत झाली.
चंद्रकांत किती करतात कमाई?
चंद्रकांत हे त्यांच्या या कंपनीमध्ये दिवसाला दहा ते बारा हजार ट्रेची निर्मिती करतात. तसेच या ट्रेची विक्री ही महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर केली जाते. या सगळ्या व्यवसायाच्या माध्यमातून ते वर्षाला 70 ते 80 लाख रुपयांची उलाढाल करतात.