Successful Farmer : अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या कष्टाचे झाले चीज ! अवघ्या एका गुंठ्यात शेवंती फूल शेतीतून मिळवले 50 हजार

Ajay Patil
Published:

Successful Farmer : भारतीय शेतीत काळानुरूप मोठे बदल होत आहेत. आता शेतकरी बांधव करोडो रुपयांची कमाई करू लागले आहेत. निश्चितच शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती होत आहे. पण वेळोवेळी अशा प्रयोगशील शेतकऱ्यांची यशोगाथा देखील आपल्या पुढ्यात आणून ठेवत असतो.

आज देखील आपण अशाच एका प्रयोगशील शेतकऱ्याची यशोगाथा जाणून घेणार आहोत ज्यांनी आपल्या कष्टाने कमी जमिनीतही हजारोची कमाई करून दाखवली आहे.

अनेक शेतकरी बांधव तक्रार करत असतात की एक दोन एकर शेत जमिनीत कुठे घर चालतं का. अशा शेतकऱ्यांसाठी परभणी जिल्ह्यातून आरसा दाखवण्यासाठी एक साजेस असं उदाहरण समोर आलं आहे.

परभणी जिल्ह्यातील झरी येथील अल्पभूधारक शेतकरी बाळासाहेब मारुतीराव झगाडे यांनी आपल्या अवघ्या एक गुंठे शेत जमिनीतून शेवंती फूल शेतीतून 50,000 चे उत्पन्न करून दाखवले आहे. जर आपण याचा एकरी हिशोब केला तर चांगल्या चांगल्या प्रयोगशील शेतकऱ्यांच्या भुवया उंचावणार आहेत.

म्हणजेच जर बाळासाहेबांनी आपल्या एक एकर शेत जमिनीत शेवंती फुलाची लागवड केली असती आणि आता जो दर मिळाला तसाच दर मिळाला असता तर वीस लाखांचे उत्पन्न त्यांना मिळाले असते. हा तर जर आणि तरचा विषय झाला मात्र अवघ्या एका गुंठ्यात पन्नास हजाराचे उत्पन्न हे कुठे ना कुठे चांगल्या उच्चशिक्षित आणि प्रयोगशील शेतकऱ्यांना देखील विचारात पाडण्यासाठी पुरेसं आहे.

बाळासाहेब यांनी पारंपारिक पीक पद्धतीला फाटा देत फुलशेतीला प्राधान्य दिले आहे. फुल शेती त्यांनी शेवंती या फुलाची लागवड केली. विशेष म्हणजे लागवडीनंतर अतिवृष्टीचा फटका देखील त्यांना बसला. यामुळे एका गुंठ्यात त्यांनी एक हजार रोपे लावले त्यातून केवळ 350 रोपे वाचली.

मात्र तरीदेखील त्यांनी शेवंतीची योग्य जोपासना केली आणि शेवंती फुलपिकातून चांगले उत्पादन मिळवले. सध्या स्थितीला त्यांनी उत्पादित केलेल्या शेवंती फुलाला 30 ते 35 रुपये प्रति किलो असा दर मिळत आहे.

याबाबत बाळासाहेब सांगतात की, गेल्या तीन ते चार वर्षांपासून त्यांनी कमी जागेत अधिक उत्पादन मिळावे म्हणून फुलशेती सुरू केली असून यातून त्यांना चांगली कमाई होत आहे. निश्चितच बाळासाहेबांची शेतीमधली ही कामगिरी प्रयोगशील शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक अशी राहणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe