Profitable Business Idea: येणारा काळ राहील फक्त ‘या’ व्यवसायाचा! कराल आत्तापासून सुरुवात तर लाखोत कमवाल

इलेक्ट्रिक वाहनांच्या संदर्भात जर बघितले तर यांना चार्जिंग करणे खूप गरजेचे असते व हीच बाब हेरून जर इलेक्ट्रिक व्हेईकल चार्जिंग स्टेशन उभारले तर या माध्यमातून खूप चांगल्या पद्धतीने पैसा कमावता येऊ शकतो व व्यवसाय देखील भरभराटीला नेता येऊ शकतो.

Published on -

Profitable Business Idea:- व्यवसाय करायचा असेल व त्यासाठी जर तुम्हाला एखाद्या व्यवसायाची निवड करायची असेल तर यामध्ये सगळ्यात अगोदर त्या व्यवसायाला असलेली आत्ताची आणि भविष्यकाळातील मागणीचा विचार करणे खूप गरजेचे असते.

मागणी आणि त्या मागणीच्या अनुषंगाने होणारा पुरवठा  याचा सांगोपांग अभ्यास करून जर व्यवसाय उभारला तर नक्कीच तो व्यवसाय यशस्वी होऊ शकतो व व्यवसाय उभारताना त्या व्यवसायातील भविष्यात असलेल्या संधी देखील ओळखणे खूप गरजेचे असते. सध्या जर आपण भारताचे स्थिती पाहिली तर पेट्रोल आणि डिझेलचे भाव खूप मोठ्या प्रमाणावर वाढल्यामुळे आता लोकांचा कल प्रामुख्याने इलेक्ट्रिक वाहनांकडे जास्त करून दिसून येत आहे.

शहरी भागच नाही तर अगदी ग्रामीण भागामध्ये देखील आता इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वाढत आहे व येणाऱ्या काळामध्ये रस्त्यांवर आपल्याला पेट्रोल आणि डिझेल वाहना ऐवजी इलेक्ट्रिक वाहने जास्त प्रमाणात धावताना दिसतील.

परंतु या इलेक्ट्रिक वाहनांच्या संदर्भात जर बघितले तर यांना चार्जिंग करणे खूप गरजेचे असते व हीच बाब हेरून जर इलेक्ट्रिक व्हेईकल चार्जिंग स्टेशन उभारले तर या माध्यमातून खूप चांगल्या पद्धतीने पैसा कमावता येऊ शकतो व व्यवसाय देखील भरभराटीला नेता येऊ शकतो.

 इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशन व्यवसाय उभारण्यासाठी अगोदर काय तयारी करावी लागेल?

इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशन उभारायचे असेल तर त्याकरिता अनेक विभागांच्या माध्यमातून परवानगी घेणे गरजेचे असते. यामध्ये वनविभाग तसेच अग्निशमन विभाग आणि महानगरपालिकेकडून ना हरकत प्रमाणपत्र घ्यावे लागते.

तसेच चार्जिंग स्टेशनवर गाड्यांचे पार्किंग आणि त्यांचा प्रवेश आणि बाहेर पडण्यासाठी योग्य व्यवस्था करणे देखील गरजेचे असते. चार्जिंग स्टेशनवर शुद्ध पिण्याचे पाणी तसेच स्वच्छतागृह, विश्रामगृह, अग्निशामक यंत्रणा तसेच व्हेंटिलेशन सुविधा देखील असणे आवश्यक आहे.

साधारणपणे इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशन उभारण्याकरिता चाळीस लाखांपर्यंत खर्च अपेक्षित असतो. परंतु हा खर्च चार्जिंग स्टेशनच्या क्षमतेवर अवलंबून असतो. यापेक्षा देखील हा खर्च कमी असू शकतो.

साधारणपणे तुम्हाला जर कमी क्षमतेचे चार्जिंग स्टेशन उभारायचे असेल तर त्याकरिता 15 लाख रुपये खर्च येऊ शकतो. यामध्ये तुम्हाला जमिनीपासून चार्जिंग पॉइंट बसवण्यापर्यंतचा खर्चाचा देखील समावेश होतो.

 इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशन व्यवसायातून किती कमाई होऊ शकते?

त्यामध्ये तीन हजार किलो किलोवॅटचे चार्जिंग स्टेशन बसवले तर या माध्यमातून अडीच रुपये प्रति किलोवॅट इतकी कमाई तुम्ही करू शकतात. या हिशोबाने बघितले तर एका दिवसात 7500 रुपये सहज तुम्ही कमवू शकतात व महिन्याला 2.25 लाख रुपयांची कमाई तुम्ही या व्यवसायातून करू शकतात.

या मधून जर तुम्ही झालेला खर्च वजा केला तर एक लाख 50 हजार ते एक लाख 75 हजार रुपयांची कमाई तुम्ही महिन्याला करू शकतात. समजा तुम्ही चार्जिंग स्टेशनची क्षमता वाढवली तर या कमाईमध्ये देखील वाढ होते व महिन्याला तुम्ही दहा लाख रुपयांपर्यंत देखील पोहोचू शकता.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!