महिलांसाठी खास आहे सरकारची ‘ही’ योजना! 2 वर्षासाठी जमा करा 2 लाख आणि मिळवा भरपूर व्याज

केंद्र सरकारच्या माध्यमातून एक एप्रिल 2023 रोजी सुरू करण्यात आलेल्या व खास महिलांसाठी असलेली बचत योजना बघितली तर ती म्हणजे एमएसएससी अर्थात महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना होय. ही योजना महिलांसाठी खास डिझाईन करण्यात आलेली असून यामध्ये फक्त महिलाच खाते उघडू शकतात.

Ajay Patil
Published:
investment scheme

गुंतवणूक करणे हे काळाची गरज असून जीवनामध्ये जर आर्थिक दृष्ट्या समृद्ध व्हायचे असेल तर गुंतवणुकी शिवाय पर्याय नाही. परंतु गुंतवणूक करताना देखील बऱ्याच गोष्टींची काळजी घेणे गरजेचे असते. कारण आपण कष्ट करून कमावलेला एक एक रुपयाची बचत करून जेव्हा गुंतवणूक करतो तेव्हा ती गुंतवणूक सुरक्षित राहणे गरजेचे असते आणि त्यातून मिळणारा परतावा देखील आपल्याला चांगल्या पद्धतीने मिळावा हे देखील यामध्ये पाहणे गरजेचे असते.

खास करून कोणताही गुंतवणूकदार हे दोन मुद्दे विचारात घेऊनच गुंतवणुकीचा पर्याय निवडत असतात. जास्त करून बँकांच्या माध्यमातून मुदत ठेव योजनांना तसेच पोस्ट ऑफिसच्या बचत योजनांना देखील यामध्ये महत्त्व दिले जाते. तसेच सरकारच्या माध्यमातून देखील अनेक गुंतवणूक योजना राबविण्यात येत असून यामध्ये देखील गुंतवणूक केले तर उत्तम परतावा मिळतो व गुंतवणुकीची सुरक्षितता देखील राहते.

याच प्रकारे जर आपण केंद्र सरकारच्या माध्यमातून एक एप्रिल 2023 रोजी सुरू करण्यात आलेल्या व खास महिलांसाठी असलेली बचत योजना बघितली तर ती म्हणजे एमएसएससी अर्थात महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना होय. ही योजना महिलांसाठी खास डिझाईन करण्यात आलेली असून यामध्ये फक्त महिलाच खाते उघडू शकतात. अठरा वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलींसाठी देखील पालक यामध्ये खाते उघडू शकतात.

 महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजनेतून मिळतो हमी परतावा

या योजनेअंतर्गत खाते उघडणाऱ्या महिलांना सरकारी हमीसह 7.5 टक्के दराने व्याज दिले जाते. महिलांनी या योजनेमध्ये केलेली गुंतवणूक ही दोन वर्षात परिपक्व होते. म्हणजेच तुम्हाला या योजनेच्या मॅच्युरिटी वर खात्रीशीर परतावा मिळतो. आपण सध्या केलेल्या गुंतवणुकीवर व्याजदर पाहिले तर स्मॉल फायनान्स बँक वगळता कुठलीही बँक दोन वर्षाच्या एफडीवर इतके व्याज देत नाही.

 एक हजार रुपयांपासून सुरू करू शकतात गुंतवणूक

महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजनेच्या माध्यमातून तुम्हाला गुंतवणूक सुरू करायची असेल तर तुम्ही किमान एक हजार रुपयांपासून सुरू करू शकतात व जास्तीत जास्त दोन लाख रुपये त्यामध्ये तुम्हाला जमा करता येतात. ही योजना दोन वर्षात परिपक्व होत असली तरी खाते उघडण्याच्या तारखेपासून एक वर्षानंतर या योजनेत तुम्ही गुंतवलेल्या रकमेपैकी 40% रक्कम गरज पडल्यास तुम्ही काढू शकतात.

 दोन लाख रुपये जमा केल्यास मॅच्युरिटीवर किती पैसे मिळतील?

तुम्ही जर या महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजनेमध्ये जास्तीत जास्त दोन लाख रुपये जमा करू शकता व अशा पद्धतीने तुम्ही जर दोन वर्षासाठी दोन लाख रुपये या योजनेत जमा केले तर तुम्हाला दोन वर्षानंतर म्हणजेच या योजनेच्या परिपक्वतेनंतर एकूण दोन लाख 32 हजार 44 रुपये मिळतात. म्हणजेच तुम्ही गुंतवलेल्या दोन वर्षाच्या कालावधीतील दोन लाखांवर तुम्हाला 32 हजार 44 रुपये व्याजाचा लाभ मिळतो.

 31 मार्च 2025 पर्यंत घेता येईल लाभ

या योजनेची शेवटची तारीख 31 मार्च 2025 आहे. म्हणजेच तुम्हाला देखील या योजनेमध्ये गुंतवणूक करायची असेल तर ती तुम्ही 31 मार्च 2025 पर्यंत करणे गरजेचे आहे व एक एप्रिल 2025 पासून ही योजना बंद होणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe