Tourist Place: महाराष्ट्रातील कोकणामध्ये आहे ऐतिहासिक वारसा असलेला प्रसिद्ध राजवाडा; कोकणात जाल फिरायला तर नक्कीच भेट द्या

Ajay Patil
Published:
thiba palace

Tourist Place:- महाराष्ट्र म्हटले म्हणजे निसर्ग संपदेने परिपूर्ण असलेले राज्य आहेच परंतु या ठिकाणी इतिहासात घडून गेलेले अनेक प्रसिद्ध घटनांची माहिती देणारे ठिकाणे देखील भरपूर प्रमाणामध्ये आहेत. ऐतिहासिक समृद्धतेने नटलेली असे अनेक गड किल्ले, स्थापत्यशास्त्राचे उत्कृष्ट नमुने असलेले मंदिरे तसेच लेण्या, समुद्री किल्ले इत्यादी इतिहासाच्या खुणा देखील आपल्याला महाराष्ट्रात पाहायला मिळतात.

खासकरून जर आपण पर्यटनाच्या दृष्टिकोनातून बघितले तर महाराष्ट्रातील पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण किनारपट्टी निसर्गाने खूप समृद्ध असल्याने या ठिकाणी अनेक पर्यटन स्थळे असून पर्यटकांची खूप मोठी गर्दी या ठिकाणी होत असते. त्यामध्ये कोकणात तर वर्षभर पर्यटकांची रेलचेल आपल्याला दिसून येते.

कोकणामध्ये असलेली नारळ पोफळीच्या बागा तसेच विस्तीर्ण समुद्रकिनारा मनाला मोहुन टाकतो. परंतु या कोकणात जर तुम्ही कधी फिरायला गेलात तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये असलेला एक भव्य दिव्य राजवाडा पाहणे  खूप गरजेचे आहे. कारण या राजवाड्याच्या संबंधी अनेक इतिहासाचे संबंधित घटना असल्यामुळेच तो पाहणे महत्त्वाचे ठरते.

 कोकणात जाल तर रत्नागिरी जिल्ह्यातील हा राजवाडा पहा

रत्नागिरी जिल्ह्यामध्ये ब्रिटिशांनी एक भव्य दिव्य राजवाडा बांधला होता व खास करून एका परदेशी राजाला नजरकैदेत ठेवण्यासाठी बांधला गेला होता. हा राजवाडा म्हणजे ब्रिटिशांचा क्रूरकरणाचा पुरावा आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.

तुम्ही जर हा राजवाडा पाहायला गेला तर या राजवाड्यातून तुम्हाला भाटये समुद्रकिनारा आणि सोमेश्वर नदीची खाडी पाहता येते व या ठिकाणचे मनमोहक दृश्य अनुभवता येते. या राजवाड्याला थिबा पॉइंट असं देखील म्हणतो. या थीबा पॉइंटचे  एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी तुम्ही मनमोहक सूर्यास्ताचे देखील दर्शन घेऊ शकतात.

 कसे आहे या राजवाड्याचे स्वरूप?

हा तीन मजली राजवाडा असून याचे बांधकाम अतिशय सुंदर पद्धतीने करण्यात आलेले आहे. विशेष म्हणजे याचे छत कौलांचे असून या राजवाड्याच्या मागच्या बाजूला एक बुद्ध मूर्ती स्थापित करण्यात आलेली असून ही मूर्ती राजा थिबा यांनी भारतात आणली होती असे म्हटले जाते. सध्या या राजवाड्यामध्ये एक प्रादेशिक वस्तू संग्रहालय देखील स्थापन करण्यात आलेले आहे.

या वस्तू संग्रहालयामध्ये थिबा राजा त्यांच्या दैनंदिन आयुष्यामध्ये ज्या वस्तू वापरत होते त्या सगळ्या वस्तू या ठिकाणी जतन करून ठेवलेले आहेत. या थिबा राजाच्या नावावरूनच या राजवाड्याला थिबा पॅलेस असे नाव देण्यात आले आहे. साधारणपणे 1910 यावर्षी या राजवाड्याचे बांधकाम करण्यात आले  व तेव्हापासून 1916 म्हणजेच सहा वर्षाच्या कालावधीपर्यंत या ठिकाणी म्यानमारचा राजा आणि राणी रहायला होते.

ब्रह्मदेशाचे म्हणजेच आताच्या म्यानमारचे थीबा मीन नावाचा जो राजा होता त्याला नजरकैदेत ठेवण्यासाठी ब्रिटिशांनी हा राजवाडा बांधला होता. या राजवाड्याच्या नाव थिबा पॅलेस असून रत्नागिरी शहराच्या अगदी जवळ आहे. त्यामुळे जर तुम्ही कोकणामध्ये पर्यटनासाठी गेलात तर थिबा पॅलेसला आवर्जून भेट देणे खूप महत्त्वाचे ठरते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe