‘या’ पठ्ठ्याची कंपनी भाडेतत्त्वावर जमीन घेऊन करते शेती! आज या कंपनीचे व्हॅल्यू आहे 1200 कोटी रुपये, वाचा तरुणाची यशोगाथा

आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने हे तरुण शेतकरी आता कमीत कमी क्षेत्रामध्ये देखील लाखोंचे उत्पन्न घेत आहेत. अगदी याच मुद्द्याला धरून जर आपण राजस्थान राज्यातील जयपूर मधील ऋतुराज शर्मा या तरुणाचे उदाहरण घेतले तर या तरुनाणे शेतीमध्ये भन्नाट असा प्रयोग केला आहे.

Ajay Patil
Published:
ruturaj sharma

आजकालचे तरुण जर एखाद्या व्यवसायामध्ये उतरले तर ते व्यवसायांमध्ये कोणकोणत्या प्रकारच्या कल्पना आणतील व त्या कशा पद्धतीने यशस्वी करतील याचा आपण अंदाज देखील बांधू शकत नाही. कारण तरुणांमध्ये असलेला उत्साह आणि पाहिलेले स्वप्न पूर्ण करण्याची उमेद मोठ्या प्रमाणावर असते.

त्यामुळे असे तरुण ज्या ही क्षेत्रामध्ये पाऊल ठेवतात त्या क्षेत्रामध्ये ते काहीतरी नवीन करण्याच्या उद्देशाने काम करत असतात. या गोष्टीला आता शेतीक्षेत्र देखील अपवाद राहिलेले नाही. कारण आता नोकऱ्या नसल्यामुळे अनेक उच्च शिक्षित तरुण शेतीमध्ये येत आहेत व यामुळे शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, पीक पद्धतीत झालेला बदल इत्यादी गोष्टी आपल्याला दिसून येत आहेत.

आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने हे तरुण शेतकरी आता कमीत कमी क्षेत्रामध्ये देखील लाखोंचे उत्पन्न घेत आहेत. अगदी याच मुद्द्याला धरून जर आपण राजस्थान राज्यातील जयपूर मधील ऋतुराज शर्मा या तरुणाचे उदाहरण घेतले तर या तरुनाणे शेतीमध्ये भन्नाट असा प्रयोग केला आहे.

आजकालच्या विपरीत नैसर्गिक परिस्थितीमध्ये घरची शेतीतून दोन पैसे मिळवणे कठीण होऊन बसलेले आहे. परंतु या पठ्याने चक्क इतर शेतकऱ्यांकडून जमीन भाड्याने घेऊन शेती करण्याचा व्यवसाय उभारला आहे व या व्यवसायाच्या माध्यमातूनच त्याने झेटाफार्म नावाची कंपनी देखील सुरू केलेली आहे.

 ऋतुराज शर्माची अनोखी शेतीची पद्धत

याबाबत सविस्तर वृत्त असे की, राजस्थान राज्यातील जयपूर येथील ऋतुराज शर्मा या तरुणाने वयाच्या 33 व्या वर्षी शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करायला सुरुवात केली व या प्रयोगाचा भाग म्हणून त्यांनी गुडगाव मध्ये झेटाफार्म्स नावाची कंपनी सुरू केली व या कंपनीच्या माध्यमातून ऋतुराज आता कार्पोरेट पद्धतीने शेती करत आहे.

तो या कंपनीच्या माध्यमातून शेतजमीन भाडेतत्त्वावर घेतो व त्यावर वेगवेगळ्या पिकांची लागवड करतो. विशेष म्हणजे आज या कंपनीचे जर आपण मार्केट व्हॅल्युएशन पाहिले तर काही हजार कोटीत गेलेले आहे.

ऋतुराज ने एमबीएपर्यंतचे शिक्षण पूर्ण केलेले आहे व शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्याला स्वतःचे स्टार्टअप सुरू करायचे होते. स्टार्टअप सुरू करण्याच्या प्रयत्नांमध्ये तो दोनदा सपशेल अपयशी ठरला व त्याचे तिसरे स्टार्टअप झेटाफार्म्स यशस्वी झाले.

 कसे आहे या कंपनीच्या व्यवसायाचे स्वरूप?

या कंपनीचे जर आपण व्यवसाय मॉडेल बघितले तर ही कंपनी शेतकऱ्यांकडून भाडेतत्त्वावर जमीन घेते व त्यावर गव्हापासून ते बाजारी पर्यंत व कडधान्य तसेच चहा आणि कॉफी मळ्यांची शेती देखील केली जाते.

ही कंपनी एका गटाकडून 50 ते 100 एकर जमीन भाडेतत्त्वावर घेते व त्या शेतीवर वेगवेगळ्या पिकाची लागवड करते. ऋतुराजने या व्यवसायामध्ये जेव्हा पाऊल ठेवले तेव्हा सुरुवातीला फक्त दोन एकर जमिनीत शेती सुरू केलेले होती व त्यानंतर हळूहळू त्याने या कंपनीचा विस्तार करायला सुरुवात केली.

अगदी सुरुवातीच्या पहिल्या वर्षात कंपनीला फक्त एक लाख रुपयांचा नफा या व्यवसायाच्या माध्यमातून झाला व त्यानंतर मात्र कंपनीने खूप वेगाने प्रगती केली. एका ठिकाणी किंवा एकाच पिकाची शेती करणे हे जमिनीसाठी देखील चांगले नाही व त्यामुळे विविध पिकांचे प्रयोग शेतीत करण्यावर या कंपनीचा भर आहे.

त्यानंतर त्याने शेती संबंधित व्यवसायामध्ये आवश्यक मॅनेजमेंट तसेच शेतीमालाचे मार्केटिंग व फायनान्स सारख्या डिपार्टमेंटचा समावेश केला व शेतीसाठी आवश्यक असलेले माती परीक्षणापासून ते तंत्रज्ञान वापरण्यावर देखील मोठ्या प्रमाणावर भर दिला. आज झेटाफार्म्स ह्या कंपनीचे व्हॅल्यू 1200 कोटी रुपये इतके आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe