शिक्षकाच्या नोकरीतून निवृत्ती घेतली आणि शरद किंग नावाच्या डाळींबाच्या वाणाची लागवड केली! ‘हा’ शेतकरी आज कमवत लाखो रुपये

Published on -

बरेच व्यक्ती जेव्हा नोकरी करत असतात तेव्हा नोकरी केल्यानंतर नोकरीतून जेव्हा रिटायर होतात तेव्हा मात्र आपले उरलेले आयुष्य सुखा समाधानाने आनंदाने घालवण्याच्या दृष्टिकोनातून विचार करत असतात. परंतु बहुतेक लोक असे असतात की ते कुठल्याही नोकरी मधून जेव्हा रिटायर होतात तेव्हा घरी शांत न बसता ते कुठल्यातरी व्यवसायामध्ये पडतात

व आपला रिकामा वेळ सत्कारणी लावतात. अगदी याच मुद्द्याला धरून जर आपण इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी या गावचे धनाजी भोंग या प्रयोगशील शेतकऱ्याच्या दृष्टिकोनातून बघितले तर यांनी शिक्षकी पेशा पत्करलेला होता

व या नोकरीतून सेवानिवृत्त झाल्यानंतर धनाजी भोंग यांनी प्रयोगशील शेती करण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न चालवले.आज त्यांच्या मुलाच्या मदतीने ते डाळिंब शेतीतून लाखो रुपयांचे उत्पन्न मिळवत आहे.

 सेवानिवृत्त शिक्षकाने डाळिंब शेतीतून मिळवले लाखो रुपये

याबाबत सविस्तर वृत्त असे की, इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी या गावचे धनाजी भोंग हे शिक्षक होते आणि शिक्षकी पेशातून सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांनी शेती करायचे ठरवले. परंतु शेतीची पारंपारिक शेती पद्धत न अवलंबता त्यांनी प्रयोगशीलतेच्या दृष्टिकोनातून आधुनिक शेतीचे कास धरली.

अगोदर त्यांचे माळरानावर पाच एकर शेतजमीन होती व त्या शेतीत ते इतर पारंपारिक पिके घेत होते. परंतु या माध्यमातून मिळणारा बाजार भाव आणि त्या पिकांसाठी होणारा खर्च याचा ताळमेळ कुठेच बसत नव्हता. म्हणून त्यांनी पारंपारिक पिकांना फाटा देत फळबाग लागवड करण्याचे ठरवले व सुरुवातीला त्यांनी पेरू, ड्रॅगन फ्रुट,

त्याचबरोबर डाळिंब अशा प्रकारचे फळबागांची लागवड त्यांनी केली. महत्वाचे म्हणजे या सगळ्या शेतीच्या प्रयत्नामध्ये धनाजी भोंग यांना त्यांचा मुलगा अमन याची पूर्णपणे साथ मिळाली. अमन यांचे बीएससी ऍग्री मध्ये शिक्षण पूर्ण झाले असून  नोकरी न करता त्यांनी वडिलांना शेतीमध्ये मदत करण्याचे ठरवले

व त्यांच्या आधुनिक ज्ञानाचा फायदा त्यांनी शेतीत करण्याचा निश्चय केला.बीएससी ऍग्री मधून जे काही ज्ञान त्यांना मिळाले त्या माध्यमातून त्यांनी अनेक नावीन्यपूर्ण प्रयोग करण्याचे प्रयत्न केले आणि कुठलाही अनुभव नसताना देखील केवळ इच्छाशक्तीच्या जोरावर इतर प्रगतिशील शेतकऱ्यांना लाजवेल अशी फळबाग उभारली.

 डाळिंब शेतीतून साधली आर्थिक प्रगती

प्रामुख्याने त्यांच्या भागामध्ये डाळिंब मोठ्या क्षेत्रावर लागवड केल्याचे आपल्याला दिसून येते. परंतु मध्यंतरीच्या कालावधीमध्ये तेल्या तसेच मर रोगासारख्या रोगामुळे बऱ्याच शेतकऱ्यांनी डाळिंब बागा काढून टाकल्या व हळूहळू पेरूच्या फळभागाकडे वळलेत. परंतु अमन यांनी या सगळ्या परिस्थितीमध्ये डाळिंब फळ पिकाकडे वळण्याचे ठरवले व शरद किंग हा नवीन वाण लागवडीसाठी निवडला.

याकरिता त्यांनी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील तुपेवाडी या ठिकाणहून 525 गुटी कलमे खरेदी केली व त्यांचे रोपे तयार करत बारा फूट बाय आठ फुटांवर खोड पद्धतीने लागवड केली. तसेच शेणखत व जैविक पद्धतीने ही रोपे त्यांनी वाढवली व पहिल्या वर्षाच्या कालावधीत पहिला बहर धरला.

वास्तविक बघता पहिल्या वर्षी फळधारणा कमी होईल अशी एक शक्यता असते. परंतु त्यांनी अचूक व्यवस्थापन ठेवल्यामुळे डाळिंबाच्या झाडांवर फळे लगडली व डाळिंबाच्या उत्पादनातून त्यांनी लाखोत आर्थिक नफा मिळवला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe