5 एकर ड्रॅगन फ्रुट लागवडीतून हा शेतकरी वर्षाला घेतो 25 लाख रुपयांचे उत्पन्न! वाचा या शेतकऱ्याचे ड्रॅगन फ्रुट शेतीचे नियोजन

मराठवाड्यातील जाफराबाद तालुक्यातील पासोडी या गावचे शेतकरी ईश्वर रावळकर यांची यशोगाथा बघितली तर ती इतर शेतकऱ्यांसाठी खूप प्रेरणादायी आहे. रावळकर यांनी साधारणपणे 2021 मध्ये ड्रॅगन फ्रुट ची लागवड केली  आज या फळबागेतून त्यांना वर्षाला निव्वळ 25 लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळत आहे.

Published on -

Dragon Fruit Farming: पारंपरिक शेती पद्धतीला फाटा देत शेतकरी मोठ्या प्रमाणावर तंत्रज्ञानाचा वापर करत भाजीपाला पिके आणि फळ पिकांकडे वळले आहेत. शेडनेट सारख्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून फूल शेतीमध्ये देखील शेतकरी नशीब आजमावतांना दिसून येत असून या माध्यमातून देखील लाखो रुपयांचे उत्पन्न शेतकरी मिळवत आहे.

फळबागाच्या दृष्टिकोनातून बघितले तर डाळिंब तसेच  द्राक्ष, पेरू, सिताफळ सारख्या फळबाग लागवडी सोबतच आता ड्रॅगन फ्रुट सारख्या पिकांच्या लागवडीकडे शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर मोर्चा वळवल्याचे चित्र आहे. ड्रॅगन फ्रुट शेतीतून आता अनेक शेतकरी लाखो रुपयांचे उत्पन्न मिळवत आहे.

याच अनुषंगाने जर आपण मराठवाड्यातील जाफराबाद तालुक्यातील पासोडी या गावचे शेतकरी ईश्वर रावळकर यांची यशोगाथा बघितली तर ती इतर शेतकऱ्यांसाठी खूप प्रेरणादायी आहे. रावळकर यांनी साधारणपणे 2021 मध्ये ड्रॅगन फ्रुट ची लागवड केली  आज या फळबागेतून त्यांना वर्षाला निव्वळ 25 लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळत आहे.

 हा शेतकरी ड्रॅगन फ्रुट लागवडीतून वर्षाला घेतो 25 लाखांचे उत्पन्न

याबाबत सविस्तर वृत्त असे की, मराठवाड्यातील जालना जिल्ह्यात असलेल्या जाफराबाद तालुक्यातील  पासोडी या गावचे प्रगतिशील शेतकरी ईश्वर रावळकर हे शेतामध्ये कायम नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर व प्रयोग करत असतात.

याच प्रयोगांचा भाग म्हणून त्यांनी 2021 मध्ये ड्रॅगन फ्रुटच्या जम्बो रेड या व्हरायटीची एकूण पाच एकर क्षेत्रामध्ये लागवड केली. या फळबागेकरिता त्यांना एकरी चार ते पाच लाख रुपयांचा खर्च आला.

लागवडीसाठी ड्रॅगन फ्रुटची रोपे आणल्यानंतर ड्रॅगन फ्रुटला आधारासाठी लागणारे सिमेंट खांब उभारून त्यावर ड्रॅगन फ्रुट ची वेल वाढवण्यासाठी जाळी तयार केली. या फळबागेतून सध्या त्यांना एका एकर मधून आठ टन फळांचे उत्पादन मिळत आहे.

सध्याचा बाजार भाव पाहिला तर 100 ते 120 रुपये प्रति किलो असल्याने  सर्व खर्च वजा जाता त्यांना सहा ते सात लाख रुपयांचे उत्पन्न मिळत आहे. ड्रॅगन फ्रुट फळपिकाचे अचूक व्यवस्थापन आणि योग्य निगा यामुळे एक एक ड्रॅगन फ्रुटच्या वेलीवर चार चार ते पाच पाच फळे  लगडल्याचे सध्या दिसून येत आहे.

 अशाप्रकारे आहे विक्री व्यवस्थापन

सध्या जर आपण बाजारपेठेतील ड्रॅगन फ्रुट ची मागणी पाहिली तर ती प्रचंड प्रमाणात वाढताना आपल्याला दिसून येत आहे. ईश्वर रावळकर हे त्यांनी उत्पादित केलेल्या ड्रॅगन फ्रुटची विक्री विदर्भ व मराठवाड्यातील विविध बाजारपेठेमध्ये करतात.

अकोला बाजारपेठेमध्ये चांगला दर मिळतो असे त्यांचे म्हणणे आहे. ग्रामीण भागामध्ये देखील चांगली मागणी या फळाला असल्याने शंभर ते दीडशे रुपये प्रति किलो प्रमाणे ड्रॅगन फ्रुट विकले जाते. ज्या व्यक्तींना मधुमेह आहे असे रुग्ण ईश्वर रावळकर यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर फळांची खरेदी करतात.

ड्रॅगन फ्रुटमध्ये आरोग्यास पोषक असणारे अनेक घटक असल्यामुळे व त्यासोबतच व्हिटॅमिन सी आणि ई यासारखे अँटिऑक्सिडंट देखील असतात. तसेच यामध्ये फॅटचे प्रमाण खूप कमी व फायबरचे प्रमाण जास्त असल्याने वजन कमी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तींसाठी देखील ड्रॅगन फ्रुट खूप फायद्याचे आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News