Investment In Gold: ‘या’ पर्यायांचा वापर करा आणि विनाझंझट सोन्यात गुंतवणूक करून पैसे कमवा; वाचा संपूर्ण प्रोसेस

Published on -

Investment In Gold:- गुंतवणूक ही संकल्पना आर्थिक दृष्टिकोनातून आणि उज्वल भविष्यासाठी खूप महत्त्वाची बाब असल्या कारणाने तुम्ही जे पैसे कमवतात त्यातील काही पैशांची बचत करून नियमितपणे चांगल्या ठिकाणी गुंतवणूक करणे खूप गरजेचे असते. त्यामुळे बरेच व्यक्ती हे वेगवेगळ्या पर्यायांमध्ये गुंतवणूक करतात.

या गुंतवणूक पर्यायांमध्ये सोन्याची खरेदी किंवा सोन्यामधील गुंतवणूक हा देखील एक महत्त्वाचा गुंतवणुकीचा प्रकार असून  गेल्या कित्येक वर्षापासून सोन्यामध्ये केलेली गुंतवणूक एक महत्त्वाचे राहिलेले आहे. म्हणजे भारतीयांमध्ये गुंतवणुकीसाठी एक आवडता प्रकार म्हणून देखील सोन्याकडे पाहिले जाते.

सोने हा चलनवाढी विरोधात काम करणारा धातू असल्याने यामधील गुंतवणूक बऱ्याचदा फायद्याची ठरते. बहुसंख्य पद्धतीने आपण सोन्यातील गुंतवणूक ही दागिन्यांच्या स्वरूपात किंवा प्रत्यक्ष सोनं खरेदी करून करत असतो. परंतु या पद्धतीमध्ये बऱ्याचदा आर्थिक नुकसान होऊ शकते किंवा काही तोटे देखील असतात.

गुंतवणूक म्हणून सोन्याचे दागिने खरेदी केले तर यामध्ये सोन्याच्या शुद्धतेपासून तर दागिने बनवण्यासाठी लागणारा मेकिंग चार्ज, सोन्याचे सुरक्षितता इत्यादी घटकांवर आपल्याला व्यवस्थित लक्ष द्यावे लागते. नाहीतर फायदयाऐवजी तोटा होतो. परंतु यामध्ये जर सोन्याची गुंतवणूक करायची असेल तर प्रत्यक्ष सोने खरेदी करण्याऐवजी जर इतर गुंतवणुकीचे पर्याय अवलंबले तर नक्कीच फायदा होतो.

म्हणजे प्रत्यक्ष सोने खरेदी करण्याऐवजी जर डिजिटल सोन्यामध्ये गुंतवणूक केली तर जास्तीचा फायदा होतो. अशा पद्धतीने डिजिटल सोन्यात गुंतवणूक करण्यामध्ये तुम्हाला प्रत्यक्षपणे सोन्याची किंवा दागिन्यांची खरेदी करण्याची गरज भासत नाही व त्यामुळे सोने शुद्ध आहे की अशुद्ध याची चिंता तुम्हाला राहत नाही.त्यामुळे या लेखात आपण नेमके सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याचे पर्याय कोणते आहेत ते जाणून घेऊ.

 सोन्यात गुंतवणूक करण्यासाठी हे पर्याय ठरतील फायद्याचे

1- सॉवरीन गोल्ड बॉण्ड केंद्र सरकारच्या माध्यमातून साधारणपणे नोव्हेंबर 2015 मध्ये सॉवरीन गोल्ड बॉण्ड ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. यामध्ये ग्राहकांना प्रत्यक्ष सोन्याऐवजी डिजिटल स्वरूपामध्ये सोने मिळते आणि ते डिमॅट अकाउंटमध्ये सुरक्षितपणे ठेवले जाते. विशेष म्हणजे याची सर्व जबाबदारी ही रिझर्व बँक ऑफ इंडियाची असते व यामध्ये गुंतवणूकदारांनी केलेल्या गुंतवणुकीवर प्रत्येक वर्षाला 2.5 टक्क्यांचे व्याज दिले जाते

या व्यवहारामध्ये जो काही नफा मिळतो त्यावर कुठल्याही प्रकारचा भांडवली कर देखील आकारला जात नाही. त्यामुळे या पर्यायातील गुंतवणूक ही अधिकची किफायतशीर आणि फायद्याची व सुरक्षित मानली जाते.

2- गोल्ड म्युच्युअल फंड गोल्ड म्युच्युअल फंड हा एक सोन्यात गुंतवणूक करण्याचा डिजिटल पर्याय असून या माध्यमातून देखील तुम्ही जोखीम शिवाय चांगला परतावा मिळवू शकतात. गोल्ड म्युच्युअल फंड मध्ये जी गुंतवणूक केली जाते ती थेट सोन्यात केली जात नसली तरी ती सोन्याची खाण कंपनी आणि त्याच्याशी संबंधित कंपन्यांमध्ये केली जात असते.

या पर्यायांमध्ये कमीत कमी रकमेपासून आणि सिस्टिमॅटिक गुंतवणूक पद्धतीने गुंतवणूक करता येणे शक्य आहे. विशेष म्हणजे यासाठी डिमॅट अकाउंटची गरज भासत नाही व गुंतवणुकीच्या दृष्टीने देखील हा पर्याय सुरक्षित आहे.

3- गोल्ड ईटीएफ हा देखील सोने खरेदीचा डिजिटल पर्याय असून गोल्ड ईटीएफची खरेदी किंवा विक्री नॅशनल स्टॉक एक्सचेंज आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंज वर केली जाते. या पद्धतीने सोन्यात गुंतवणूक करण्यासाठी तुम्हाला डिमॅट अकाउंटची गरज भासते.

या पद्धतीने तुम्हाला एक ग्राम युनिट पासून सोन्याची खरेदी करता येते. 2023 पासून गोल्ड ईटीएफ मधील गुंतवणुकीवर सरकारने कर लागू केला असून तीन वर्षाच्या आतील गुंतवणुकीवर अल्पकालीन भांडवल टॅक्स लागू होतो. तर तीन वर्षावरील गुंतवणुकीवर दीर्घकालीन भांडवली टॅक्स भरावा लागतो.

या तिन्ही पर्यायांमध्ये गुंतवणूक करणे फायद्याचे आहे. परंतु याचे कमी जास्त प्रमाणात फायदे आणि तोटे देखील आहेत. त्यामुळे गुंतवणुकीचे वैशिष्ट्ये आणि उद्दिष्ट लक्षात घेऊन गुंतवणूकदारांनी गुंतवणुकीसाठी या पर्यायांपैकी एकाची निवड करणे फायद्याचे ठरते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News