नोकरी नसल्यामुळे आता अनेक सुशिक्षित बेरोजगार तरुण वेगवेगळ्या व्यवसायांकडे वळल्याची चित्र आपण पाहत आहोत आणि त्यामध्ये बरेच सुशिक्षित तरुण आता शेतीकडे आणि शेतीशी निगडित असलेल्या जोडधंदांकडे वळले आहेत.
परंतु शेतीमध्ये या तरुणांनी पाऊल ठेवल्यामुळे आता शेतीचे पारंपारिक स्वरूप जवळपास नाहीसे झाले असून असे तरुण आता पारंपारिक पिकांऐवजी वेगवेगळी फळ पिके तसेच औषधी पिके व भाजीपाला पिके घेण्याकडे त्यांचा कल दिसून येते व त्यासोबत अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर ते शेतीमध्ये करत असल्याने कोट्यावधी रुपयांचे उत्पन्न घेण्यामध्ये देखील यशस्वी झाल्याचे आपल्याला दिसून येते.

प्रकारे जर आपण सातारा जिल्ह्यातील पाडळी या गावचा रहिवासी असलेल्या ऋषिकेश धाणे या सुशिक्षित असलेल्या तरुण शेतकऱ्याच्या दृष्टिकोनातून बघितले तर त्याने कोरफड लागवडीतून तब्बल वर्षाला कोट्यावधी रुपये कमावून एक आश्चर्याचा धक्का दिला आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.
कोरफड लागवडीतून साधली आर्थिक समृद्धी
याबाबत सविस्तर वृत्त असे की, सातारा जिल्ह्यातील पाडळी या गावचा रहिवासी असलेला ऋषिकेश धाने एक सुशिक्षित युवक असून त्याने शेती करण्याचा निर्णय घेतला. जर आपण त्याची पार्श्वभूमी पाहिली तर त्याच्या कुटुंबाचा प्रमुख व्यवसाय हा शेती व्यवसाय आहे व अगोदर ते ज्वारी तसेच बाजरी व सोयाबीन या पारंपरिक पिकांची लागवड करायचे.
परंतु या पिकांच्या लागवडीतून हवा तेवढा आर्थिक फायदा त्यांना होतांना दिसून येत नव्हता. त्यातल्या त्यात ऋषिकेश हा सुशिक्षित असल्यामुळे शेती क्षेत्रामध्ये चांगली संधी शोधत होता. आपण त्याचे शिक्षण पाहिले तर त्याने फलोत्पादनामध्ये बीएससी कम्प्लीट केले असून तो छोट्या स्वरूपामध्ये शेती आणि कृषी उत्पादनांचे मार्केटिंग करायचा.
साधारणपणे 2001 मध्ये पदवी पूर्ण केली आणि पुढचे शिक्षण घेताना पैसे मिळावे याकरिता आणि कुटुंबाला आर्थिक आधार लावावा म्हणून छोट्या कंपन्यांसाठी त्यांनी खते आणि कृषी निविष्ठा विक्री करणे सुरू केले. हे करत असताना मात्र शेतीकडे लक्ष दिले व सुरुवातीला काकडी आणि टोमॅटोची कमी प्रमाणामध्ये लागवड करायला सुरुवात केली.
परंतु या सगळ्या कालावधीमध्ये तो ज्या कंपनीमध्ये काम करत होता त्या कंपनीने त्याला महिन्याला साडेतीन हजार रुपये पगारावर दुसऱ्या शहरांमध्ये जायला सांगितले व एवढ्या पैशात जगणे अशक्य आहे असे ऋषिकेशला वाटले व त्याने नोकरी सोडली व पूर्णपणे शेती करण्याचा निर्णय घेतला.
2007 मध्ये घेतला कोरफड लागवडीचा निर्णय
2007 हे वर्ष ऋषिकेशाच्या आयुष्यामधील एक टर्निंग पॉईंट देणारे वर्ष ठरले. यावर्षी त्याने शेजारच्या शेतकऱ्याकडून चार हजार न वापरलेली कोरफडीची रोपे घेतली व कोरफडीच्या रोपांची क्षमता ओळखून स्वतःच्या शेतामध्ये त्याची लागवड केली व पुढे ती लागवड वाढवून तीन एकर पर्यंत नेली. ऋषिकेश या सगळ्या कोरफडीचे सेंद्रिय पद्धतीने नियोजन करतो व यासाठी तो मोठ्या प्रमाणावर कोंबडी खत व शेणखताचा वापर करतो.
तसेच कोरफड पिकाला पाण्याचे व्यवस्थापन करण्यासाठी स्प्रिंकलर आणि ठिबक सिंचन पद्धतीचा वापर प्रामुख्याने करतो. कोरफड लागवडीमुळे ऋषिकेशला फायदा असा झाला की, हे कोणत्याही जमिनीमध्ये सहज उगवणारे पीक आहेच परंतु वर्षभर त्याची काढणी करता येणे शक्य आहे. तसेच तयार कोरफडीची पुणे आणि मुंबईतील कॉस्मेटिक आणि फार्मासूटिकल कंपन्यांना 25 रुपये प्रति किलो दराने या कोरफडीची विक्री करतो.
त्यासोबतच तो सेंद्रिय कीटकनाशके देखील तयार करतो व त्याची विक्री इतर शेतकऱ्यांना करतो. त्यामुळे त्याच्या उत्पन्नामध्ये आणखीनच वाढ होण्यास मदत झालेले आहे व या सगळ्या व्यवसायाच्या माध्यमातून त्याला वर्षाला जवळपास लाखो ते कोटी रुपये मिळतात.