Tourist Place:- महाराष्ट्र मध्ये अनेक पर्यटन स्थळे आहेत आणि तसेच त्यासोबतच यामध्ये भर पडते ती अनेक डोंगर माती तसेच घाट परिसराची. कारण पावसाळ्यामध्ये या डोंगरमाथे तसेच घाट परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर हिरवाई पसरते व जणू काही या डोंगरदर्यांनी व घाटांनी हिरवी चादर पांघरली आहे अशा प्रकारचे चित्र निर्माण होते व अशावेळी त्या ठिकाणी भेट देणे म्हणजेच स्वर्ग सुख अनुभवण्यासारखे आहे.
त्यामुळे अनेक पर्यटक हे अशा पावसाच्या कालावधीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी भेटी देताना आपल्याला दिसून येतात व मनमुराद निसर्गाचा आनंद अनुभवतात.त्याच प्रकारे तुमचा देखील या पावसाळ्यामध्ये निसर्गरम्य ठिकाणी आणि निसर्गाच्या सानिध्यात काही वेळ घालवण्याची प्लानिंग असेल तर तुम्ही रत्नागिरी आणि सातारा या दोन जिल्ह्यांना जोडणारा रघुवीर घाट या ठिकाणी भेट देऊ शकतात.

पावसाळ्यात भेट देण्यासाठी रघुवीर घाट आहे उत्तम ठिकाण
रत्नागिरी आणि सातारा या दोन जिल्ह्यांना जोडणारा रघुवीर घाट हा 12 किलोमीटरचा आहे व याची उंची समुद्रसपाटीपासून साधारणपणे 760 मीटर आणि फुटामध्ये बघितलं तर ती 1440 फूट आहे. तुम्हाला जर चिपळूण मार्गे जायचे असेल तर तुम्ही खोपी आणि शिरगाव गावाकडून या ठिकाणी जाऊ शकतात. हा जो घाट मार्ग आहे तो वन खात्याच्या अंतर्गत असून या ठिकाणी एक व्याघ्र प्रकल्प सुद्धा आहे.
जेव्हा तुम्ही रघुवीर घाटातून प्रवास कराल तेव्हा हा बारा किलोमीटरचा प्रवास पूर्ण करत असताना तुम्हाला निसर्गाचा एक अद्भुत आनंद अनुभवायला मिळतो. अगोदर जेव्हा तुम्ही इकडे जात असताना कोकणातून प्रवास करतात तेव्हा रस्त्याच्या आजूबाजूला असलेली हिरवी भाताची रोपे आणि मध्ये असलेला काळपट डांबरी रोड असा दुहेरी प्रवास तुमचा सुरू होतो.
या ठिकाणी तुम्हाला शेतामध्ये कधी भाताचे लावणे तर कधी कुठे चढणीचे मासे पकडणारे स्थानिक नागरिक दिसून येतात. यामध्ये जर तुम्हाला फोटोग्राफी करायचा छंद असेल तर तुमच्यासाठी हा एक सगळा क्षण फोटोग्राफीसाठी उत्तम ठरतात. जर तुम्ही खेड मार्गे जर या घाटाकडे आला तर तुम्हाला जे काही मध्ये गावे लागतील ते संपूर्ण त्या ठिकाणच्या स्थानिक अशा वैशिष्ट्यांनी भरलेले आपल्याला दिसून येतात.
खेड मार्गे या घाटाकडे येत असताना जे काही बीजघर हे गाव लागते त्या ठिकाणी 375 वर्षांपूर्वीचे प्राचीन शिवपार्वती काळकाई मनाई मंदिर असून हा परिसर खूप पाहण्यासारखा आहे. या मार्गे जेव्हा तुम्ही घाटावर वरती जाल तेव्हा तुम्हाला निसर्गाची एक किमया आणि अद्भुत आविष्कार पाहायला मिळतो. ठिकाणी काळ्याभोर खडकांवर तुम्हाला लाल रंगाची खेकडे देखील पाहायला मिळतात.
याशिवाय अशी अनेक अद्भुत असे दृश्य देखील तुम्ही पाहू शकता. या ठिकाणी डोंगर रांगांमध्ये एक लांब अशी डोंगरांची माची आहे व त्याचा थेट आतपर्यंत शासनाच्या माध्यमातून रेलिंगची सुविधा तयार केली आहे व या रेलिंगमध्ये बसायला पेव्हरब्लॉकचा एक मस्त फुटपाथ बांधलेला आहे. या आधारे तुम्ही थेट दरीत जाण्याचा अनुभव घेऊ शकतात.
हा आनंद अनुभवत तुम्ही याच मार्गे महाबळेश्वरला देखील जाऊ शकतात. या ठिकाणी असलेल्या शिंदी गावातील खिंड देखील खूप पाहण्यासारखी आहे व या ठिकाणी असलेले अनेक स्पॉट फोटो घेण्यासाठी खूप उत्तम आहेत. याशिवाय असंख्य अशी अनेक स्पॉट तुम्हाला या रघुवीर घाटामध्ये पाहता येतात. या ठिकाणी असलेले असंख्य छोटे मोठे धबधबे तसेच औषधी वनस्पती आणि इतर निसर्गाच्या चमत्कार पाहायला मिळतो.