वाहन बाजारपेठेमध्ये दुचाकी उत्पादक कंपन्यांच्या दृष्टिकोनातून बघितले तर अनेक नामांकित कंपन्यांच्या माध्यमातून आता वेगवेगळे वैशिष्ट्य असलेले बाईकचे नवनवीन मॉडेल लॉन्च केले जात आहेत. यामध्ये इलेक्ट्रिक बाइक पासून तर बजाज सारख्या कंपनीने सीएनजी बाईक देखील लॉन्च केलेली आहे.
ग्राहकांची गरज ओळखून आणि त्यांना परवडतील या किमतींमध्ये बाईकचे नवनवीन मॉडेल लाँच करण्यामध्ये सगळ्याच कंपन्या आघाडीवर असल्याचे आपल्याला सध्या दिसून येत आहे. याचप्रमाणे टीव्हीएस मोटर कंपनीच्या माध्यमातून देखील आता आपल्या लोकप्रिय असलेली बाईक अपाची RTR 160 बाईकचे एक नवीन मॉडेल लॉन्च करण्यात आलेले

असून हे लॉन्च करण्यात असलेले मॉडेल पूर्वीच्या मॉडेलच्या तुलनेमध्ये खूपच पावरफुल आहे. विशेष म्हणजे ही नवीन मॉडेल आता स्पोर्टी डिझाईनसह लॉन्च करण्यात आलेले आहे. जर आपण या बाईकची किंमत पाहिली तर ही आतापर्यंतची सर्वात महागडी अपाची RTR 160 बाईक ठरणार आहे.
कसा आहे या बाईकचा लुक आणि तिचा परफॉर्मन्स?
अपाचीच्या या अगोदरच्या स्पोर्टी दिसणाऱ्या अपाची RTR 160 चा प्रगत स्पोर्टी अवतार असून या रेसिंग एडिशन मध्ये तुम्हाला अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या खास गोष्टी पाहायला मिळणार आहेत. यामध्ये तुम्हाला मॅट ब्लॅक कलरचा पर्याय आणि अतिशय स्टायलिश लूक देखील पाहायला मिळेल.
तसेच आपाचीच्या या रेस एडिशनचा लोगो देखील खूप आकर्षक असा बनवण्यात आलेला आहे. लोगो मुळे आपल्याला असे वाटते की ही बाईक कार्बन फायबर रेस प्रेरित ग्राफिक्ससह आली आहे.
काय आहेत या बाईकमध्ये खास वैशिष्ट्ये?
या बाईकमध्ये उपलब्ध असलेल्या काही खास वैशिष्ट्यांबद्दल जर पाहिले तर यामध्ये फ्युएल इंजेक्शन, उत्तम मायलेज आणि स्मूथ परफॉर्मन्स पाहायला मिळेल. याशिवाय या बाईकमध्ये ड्युअल चॅनल एबीएस आणि सुरक्षितता लक्षात घेऊन संपूर्णपणे या बाईकची रचना करण्यात आलेली आहे. या बाईकमध्ये स्लीपर क्लच देण्यात आला असून ज्यामुळे गिअर शिफ्टिंग सोपे आणि गुळगुळीत होते.
हे स्मार्ट एक्झोनेक्ट तंत्रज्ञानासह येते जे टर्न बाय टर्न नेवीगेशन सह येते. या बाईकला एलईडी हेड लाईट आणि टेल लॅम्प देण्यात आलेला असल्याने उत्तम प्रकाश देखील मिळतो. तसेच ब्लूटूथ सक्षम डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर देण्यात आला आहे व यामुळे तुम्हाला तुमच्या बाईकची संपूर्ण माहिती मिळेल. टीव्हीएस कनेक्ट एप्लीकेशनशी कनेक्ट करून तुम्हाला तुमच्या बाईक बद्दलचा तपशील तसेच सेवा स्मरणपत्रे इत्यादी देखील मिळेल.
ही बाईक रेन, अर्बन आणि स्पोर्ट यातील रायडिंग मोड सह येते. या बाईकमध्ये असलेले रेस टेलीमेट्री तसेच गिअर शिफ्ट इंडिकेटर्स इत्यादी वैशिष्ट्यांमुळे ही बाईक तुमची रायडिंग आणखी सुलभ व रोमांचक बनवते.
असे आहे या नवीन रेस एडिशनचे इंजिन?
अपाचीच्या या RTR 160 रेस एडिशन मध्ये अगोदरच्या अपाची RTR 160 सारखेच 159.7cc क्षमतेचे एअर कुल्ड इंजिन देण्यात आलेले आहे. जे 16.04 बीएचपी पावर आणि 13.85 एनएम टॉर्क जनरेट करते.
किती आहे अपाचीच्या या नवीन रेस एडिशनची किंमत?
अपाचीची ही Apache RTR 160 रेस एडिशन ची किंमत एक लाख 29 हजार रुपयांपासून सुरू होते व ही आतापर्यंतचे सर्वात महागडी अपाची RTR 160 बाईक आहे.