Type Of Pension: कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या पेन्शनचे किती व कोणते आहेत प्रकार? तुम्हाला कोणत्या प्रकाराची मिळू शकते पेन्शन?

कर्मचाऱ्याच्या पीएफ खात्यात जमा होत असते व त्यासोबतच नियोक्ता कंपनीच्या माध्यमातून देखील काही निश्चित रक्कम ही जमा केली जाते. साधारणपणे कर्मचाऱ्यांच्या 12 टक्के रक्कम या खात्यात जमा होत असते व त्यातील 8.33% भाग हा पेन्शन फंडाच्या नावाने जमा होतो.

Ajay Patil
Updated:
Type Of Pension

Type Of Pension:- आज संपूर्ण देशामध्ये खाजगी कंपन्यांपासून तर सरकारी क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. या सगळ्या क्षेत्रामध्ये जे काही कर्मचारी काम करतात त्यातील बरेच  कर्मचारी हे कर्मचारी भविष्य निर्वाह निधीचे सदस्य आहेत.

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी अर्थात ईपीएफओचे कर्मचारी सदस्य आहेत अशा कर्मचाऱ्यांचा भविष्य निर्वाह निधी हा जमा होत असतो. यामध्ये कर्मचाऱ्यांना निवृत्तीवेतन आणि विम्याचा लाभ देण्याची तरतूद करण्यात आलेली आहे. कर्मचाऱ्यांच्या प्रॉव्हिडंट फंड अर्थात पीएफ खात्यामध्ये महिन्याच्या म्हणजेच मासिक पगारातून काही योगदान कापले जाते

व ते कर्मचाऱ्याच्या पीएफ खात्यात जमा होत असते व त्यासोबतच नियोक्ता कंपनीच्या माध्यमातून देखील काही निश्चित रक्कम ही जमा केली जाते. साधारणपणे कर्मचाऱ्यांच्या 12 टक्के रक्कम या खात्यात जमा होत असते व त्यातील 8.33% भाग हा पेन्शन फंडाच्या नावाने जमा होतो.

त्यानंतर कर्मचाऱ्यांनी नोकरी सोडल्यानंतर कर्मचारी भविष्य निर्वाह निधीच्या माध्यमातून दर महिन्याला पेन्शन स्वरूपात कर्मचाऱ्यांना लाभ मिळतो त्यालाच आपण निवृत्ती वेतन किंवा पेन्शन  म्हणतो. अशाप्रकारे कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या पेन्शनचे सहा प्रकार असून त्यांची माहिती या लेखात घेऊ.

 कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या पेन्शनचे प्रकार

1- निवृत्ती वेतन जर आपण कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या पेन्शनच्या प्रकारातील हा प्रकार बघितला तर यामध्ये एखादा कर्मचाऱ्याने जर संघटित क्षेत्रामध्ये दहा वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त कालावधी करिता काम केले असेल व वयाच्या 58 वय पूर्ण झाल्यानंतर निवृत्ती घेतली असेल तर त्यांना सेवानिवृत्त वेतनाचा लाभ मिळतो.

2- अर्ली पेन्शन अर्थात लवकर पेन्शन जर एखाद्या कर्मचार्‍याने संघटित क्षेत्रामध्ये दहा वर्षाच्या कालावधी पेक्षा जास्त काम केले आहे. परंतु वयाच्या 58 वर्ष वय पूर्ण होण्याआधीच निवृत्ती घेतली असेल तर अशा व्यक्तीला अर्ली म्हणजेच लवकर पेन्शनचा फायदा मिळतो.

3- अपंगत्व निवृत्ती पेन्शन यामध्ये जर आपण eps-95 चा नियम बघितला तर त्या नियमानुसार एखादा व्यक्ती एखाद्या संस्थेत काम करत असेल व त्याला त्या कालावधीत अपंगत्व आले व त्यामुळे तो काम करण्यासाठी असमर्थ किंवा असक्षम ठरत असेल तर अपंगत्व निवृत्तीवेतनाच्या माध्यमातून अशा कर्मचाऱ्याला लाभ मिळत असतो.

4- विधवा किंवा मुलांसाठी पेन्शन समजा दुर्दैवाने एखाद्या कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला तर अशा कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना या प्रकारामध्ये आर्थिक मदत मिळत असते.

यामध्ये कर्मचारी भविष्य निर्वाह निधी सदस्याची पती/ पत्नीला मासिक पेन्शनचा लाभ दिला जातो. इतकेच नाही तरी ईपीएस 95 अंतर्गत जर बघितले तर पंचवीस वर्षांपर्यंतच्या दोन मुलांना मासिक पेन्शनचा लाभ दिला जातो. जेणेकरून अशा कर्मचाऱ्यांची मुले त्यांचे शिक्षण पूर्ण करू शकतील हा त्यामागचा उद्देश असतो.

5- अनाथ पेन्शन कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या सदस्याचा मृत्यू झाला व दुर्दैवाने त्या व्यक्तीची पत्नी म्हणजे जोडीदाराचा देखील मृत्यू झाला तर पेन्शनच्या या प्रकाराच्या माध्यमातून त्यांच्या मुलांना अनाथ पेन्शनचा लाभ दिला जातो.

6- नॉमिनी पेन्शन समजा एखाद्या कर्मचाऱ्याला पत्नी आणि मुले नाहीत तर अशा कर्मचारी हा कोणालातरी नॉमिनी म्हणजेच वारस करू शकतो व त्या वारसाला म्हणजेच नॉमिनीला पेन्शनचा लाभ दिला जातो. या प्रकारामध्ये महिन्याला मिळणाऱ्या पेन्शनचे अर्धे पैसे नॉमिनीला  मिळत असतात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe