Unknown Facts Of Hotel Taj: प्रसिद्ध असलेल्या मुंबईतील हॉटेल ताजबद्दल या महत्त्वाच्या गोष्टी खूपच कमी लोकांना माहित आहेत! वाचा माहिती

Ajay Patil
Published:
hotel taj palace in mumbai

Unknown Facts Of Hotel Taj:- मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी तर महाराष्ट्राची राजधानी असून जगातील एक सर्वात प्रसिद्ध असलेले शहर आहे. मुंबईमध्ये जगातील अनेक प्रसिद्ध असलेले स्थळ देखील असून यामध्ये हॉटेल ताज ही पंचतारांकित हॉटेल भारतातच नव्हे तर संपूर्ण जगामध्ये प्रसिद्ध असलेले हॉटेल आहे.

मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया जवळ असलेलं हे हॉटेल महाराष्ट्राचीच नव्हे तर एक भारताची शान आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. समुद्राच्या किनारी मोठ्या डौलाने उभी राहिलेली ताज हॉटेल जितकी प्रसिद्ध आहे तितकीच या हॉटेल बद्दलची काही महत्त्वाच्या बाबी अजून देखील बऱ्याच जणांना माहिती नाहीत. साधारणपणे हॉटेल ताजची सुरुवात ही 1903 मध्ये झालेली आहे. याच हॉटेल बद्दल न ऐकलेल्या काही महत्त्वाच्या गोष्टी आपण आज जाणून घेणार आहोत.

 हॉटेल ताजबद्दल माहिती नसलेल्या महत्त्वाच्या गोष्टी

1- भारतातील पहिले हॉटेल ज्यामध्ये विज होती साधारणपणे मुंबईमध्ये 1903 यावर्षी ताज हॉटेलची सुरुवात झालेली होती. महत्त्वाचे म्हणजे ही भारतातील पहिली अशी हॉटेल आहे की ज्यामध्ये तेव्हा विजेची सुविधा उपलब्ध होती.1903 च्या कालावधीमध्ये या हॉटेलमध्ये जर एक रात्र राहायचे असेल तर साध्या रूमचे भाडे दहा रुपये आणि अटॅच बाथरूम आणि पंखा असलेल्या रूमसाठी 13 रुपये भाडे द्यावे लागत होते.

2- हॉटेल ताजच्या निर्मितीला ही घटना ठरली जबाबदार जमशेदजी टाटा एकदा ब्रिटिश राजवटीच्या कालावधीमध्ये सर्वात आलिशान हॉटेल असणाऱ्या वॅटसन्स हॉटेलमध्ये गेले होते व त्या ठिकाणी त्यांना प्रवेश दिला गेला नव्हता. कारण त्यावेळी त्या हॉटेलमध्ये फक्त गोऱ्या लोकांनाच प्रवेश  दिला जात होता.

यामुळे जमशेतजी टाटांना हा स्वतःचाच नव्हे तर संपूर्ण देशाचा अपमान वाटला व तेव्हाच त्यांनी ठरवले की भारतामध्ये अशी हॉटेल बांधायची की जिथे भारतीयच नाही तर विदेशी नागरिक देखील कुठल्याही निर्बंधा शिवाय आरामात थांबू शकतील व यातूनच भारताच्या पहिल्या सुपर लक्झरी हॉटेल अर्थात ताज हॉटेलचा जन्म झाला. जमशेदजी टाटा यांनी या हॉटेलचे पायाभरणी 1898 मध्ये केली होती व  त्यानंतर या हॉटेलचे बांधकामाला सुरुवात झाली. साधारणपणे 16 डिसेंबर 1902 ला ही हॉटेल सर्वांसाठी खुली करण्यात आली.

3- आधी गेटवे ऑफ इंडिया बांधले गेले की हॉटेल ताज मुंबईमध्ये गेटवे ऑफ इंडियाच्या अगदी जवळ हॉटेल ताज बांधली गेलेली आहे. परंतु यामध्ये जर आपण पाहिले तर गेटवे ऑफ इंडियाच्या नऊ वर्ष अगोदर हॉटेल ताज बांधली गेलेली आहे. गेटवे ऑफ इंडियाची पायाभरणी ही 1911 मध्ये झालेली होती.

4- पहिल्या महायुद्धाच्या वेळी ताज हॉटेलचा असा करण्यात आला होता उपयोग जेव्हा पहिले महायुद्ध सुरू होते तेव्हा हॉटेल ताजमहालचे रूपांतर हे 600 खाटांच्या एका लष्करी रुग्णालयामध्ये करण्यात आले होते.

5- हॉटेल ताजच्या आहेत दोन इमारती हॉटेल ताजच्या दोन इमारती असून त्यातील पहिली म्हणजे हॉटेल ताज पॅलेस आणि दुसरे म्हणजे ताज टॉवर हे होय. यातील ताजमहाल पॅलेसचे बांधकाम विसाव्या शतकाच्या सुरुवातीला करण्यात आले होते तर ताज हॉटेलचे टॉवर 1973 मध्ये उभारण्यात आले होता.

6- जगातील प्रसिद्ध व्यक्तींनी केले आहे या हॉटेलमध्ये वास्तव्य हॉटेल ताजमहालमध्ये जगभरातील अनेक महत्त्वाच्या लोकांनी देखील वास्तव केलेले आहे. अनेक  क्षेत्रातील  जगभरातील नामांकित व्यक्ती येथे वास्तव्यास राहिलेले आहेत. उदाहरणच घ्यायचे झाले तर बराक ओबामा जेव्हा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते तेव्हा ते देखील हॉटेल ताज मध्ये वास्तव्यास होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe