पावसाळ्याच्या कालावधीमध्ये सगळीकडे ओलावा असतो व बऱ्याच ठिकाणी पाणी तुंबलेले असल्याने मोठ्या प्रमाणावर अनेक प्रकारचे कीटक तसेच माशा व डासांचा उपद्रव वाढतो. यामध्ये प्रामुख्याने डास आणि माशा यांचा उपद्रव मोठ्या प्रमाणावर वाढल्यामुळे आणि साथीचे आजार देखील या कालावधीत मोठ्या प्रमाणावर पसरतात.
या कालावधीमध्ये स्वयंपाक घरात मोठ्या प्रमाणावर माशा घोंगावत असल्याने अनेक खाद्यपदार्थांवर जाऊन बसतात व यामुळे आरोग्य विषयक अनेक समस्या देखील निर्माण होऊ शकतात. त्यामुळे आपण अशा मासा किंवा डासांना घालवून लावण्यासाठी अनेक प्रकारच्या उपाययोजना करतो.
परंतु अपेक्षित असा परिणाम आपल्याला दिसून येत नाही.त्यामुळे या लेखामध्ये आपण असे काही साधे आणि सोपे घरगुती उपाय बघणार आहोत ज्यामुळे पावसाळ्यात डास व माशा तुमच्या घरापासून दूर ठेवण्यास मदत होईल.
हे साधे उपाय करा आणि घरापासून डास व माशांना दूर ठेवा
1- कडूलिंबाचे तेल– आपल्याला माहित आहे की कडुलिंबाच्या तेलाचा वापर हा कीटकनाशक म्हणून मोठ्या प्रमाणावर केला जातो. याकरिता घरामधून माशा किंवा डासांसारखे कीटक तुम्हाला पळवून लावायचे असतील तर कडुलिंबाच्या तेलाचा वापर करता येतो.
या तेलाचा वापर करण्यासाठी कडुलिंबाच्या तेलामध्ये थोडे पाणी मिसळून घ्यावे व ते स्प्रे करण्याच्या बाटलीत भरावे. हे द्रावण घरामध्ये आणि घराच्या बाहेर स्प्रे करावे. असं केल्यामुळे घर तर स्वच्छ राहतेस परंतु माश्या व डासांसारखे कीटक देखील घरात येत नाहीत.
2- लिंबू–बेकिंग सोडा– लिंबू आणि बेकिंग सोड्याचा वापर करून तुम्ही माशा आणि इतर कीटक व डासांना घराच्या बाहेर पळवून लावू शकतात. याकरता एका छोट्या बाटलीमध्ये पाणी घेऊन त्यात लिंबाचा रस व बेकिंग सोडा टाकावा व चांगले मिसळून घ्यावे.
नंतर स्प्रे बाटलीच्या मदतीने घराच्या कानाकोपऱ्यामध्ये स्प्रे करावा. किचन तसेच बाथरूम यासारख्या ठिकाणी कीटक जास्त राहण्याची शक्यता असल्यामुळे त्या ठिकाणी जास्त प्रमाणात स्प्रे करणे फायद्याचे ठरते. आठवड्यातून एक वेळेस जरी हा घरगुती उपाय केला तरी तुम्हाला अपेक्षित परिणाम दिसून येईल.
3- काळी मिरीचा वापर– काळी मिरी अगोदर बारीक करून घ्यावी व पाण्यात चांगली मिसळून घ्यावी. स्प्रे बाटलीमध्ये हे मिश्रण भरून घराच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये ते स्प्रे करून घ्यावे. झुरळ तसेच ढेकूण यासारख्या कीटकांना काळी मिरीचा असलेला तीव्र वास आवडत नाही व त्यापासून ते दूर जातात. ही एक साधी आणि सोपी पद्धत असून ती तुमच्यासाठी खूप फायद्याची ठरू शकते.
4- ब्लॅक फिल्म– तुम्ही घराच्या दारे आणि खिडक्यांवर ब्लॅक फिल्म चिकटवू शकतात. आपल्याला माहित आहे की ही एक पातळ शीट असते व यामुळे रात्री घरातील प्रकाश बाहेर जाण्यापासून प्रतिबंध होतो.
घरामधील प्रकाश जेव्हा किटकांना दिसतो तेव्हाच ते घरामध्ये येत राहतात.रात्रीच्या वेळी जर तुम्ही दारे आणि खिडक्यांवर ब्लॅक फिल्म लावली तर किटकांना प्रकाश न दिसल्यामुळे घरात येण्यापासून त्यांना मज्जाव होतो.
5- लव्हेंडर आणि पेपरमिंटचा वापर– कीटकांना दूर ठेवण्यासाठी पेपरमिंट आणि लव्हेंडर इसेन्शियल ऑईलचा वापर करणे फायद्याचे ठरते. कीटकांना पळवून लावण्याकरता हा एक फायदेशीर उपाय असून याचा वापर करण्यासाठी तुम्हाला फक्त कीटक ज्या ठिकाणी असतात
त्या ठिकाणी याचा स्प्रे करावा लागेल. यामुळे घरात आणि घराच्या सभोवती तुम्हाला माशा व डास तसेच इतर उपद्रवी कीटकांचा प्रादुर्भाव दिसणार नाही.