Monsoon Care Tips: पावसाळ्यात ‘हे’ उपाय करा आणि साप, घूस आणि उंदीर यांना घरात घुसण्यापासून अटकाव करा; वाचा माहिती

Ajay Patil
Published:
snake

Monsoon Care Tips:- पावसाळ्याच्या कालावधीमध्ये अनेक सरपटणाऱ्या प्राण्यांचे किंवा इतर कीटकांचे बिळे म्हणजेच निवारा हा नष्ट होतो व आसरा घेण्यासाठी साप, घूस आणि उंदरांसारखे अनेक धोकादायक असे जीव घरात घुसतात. एवढेच नाही तर घराच्या आजूबाजूला काही अडगळीच्या जागा असतील तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आढळून येतात.

त्यामुळे या पावसाच्या कालावधीत अशा या धोकादायक असलेल्या प्राण्यांपासून स्वतःचा बचाव करणे खूप गरजेचे असते. कारण कोणत्या वेळेला हे प्राणी घरामध्ये शिरतील याचा काहीच नेम नसतो. तसेच शहरांमध्ये देखील  तळमजल्यावरील जे घर असतात त्यामध्ये हे प्राणी सहजपणे घरात प्रवेश करू शकतात. अशा प्राण्यांनी घरामध्ये शिरू नये याकरिता काही सोपे उपाय जर केले तर नक्कीच आपल्याला यापासून बचाव करता येऊ शकतो.

 साप, विंचू आणि उंदीर सारखे प्राणी घरापासून दूर ठेवण्यासाठीचे महत्वाचे उपाय

1- कडुलिंबाचे तेल पावसाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणावर विंचू सारखा प्राणीदेखील घरामध्ये प्रवेश करू शकतो व ही शक्यता पावसाळ्यात जास्त वाढते. म्हणून तुम्ही कडुलिंबाच्या तेलाचा वापर करू शकतात. याकरिता कडुलिंबाचे तेल म्हणजेच निम ऑइल पाण्यात मिक्स करून संपूर्ण घरामध्ये ते शिंपडावे.

दररोज हे पाणी शिंपडल्यामुळे त्याच्या वासाने विंचू घरात येत नाही आणि घरात असेल तर ते बाहेर पडतात. तुमच्या घराला जर गार्डन असेल तर तुम्ही या ठिकाणी देखील कडुलिंबाचे तेल शिंपडू शकतात.

2- ब्लिच पावडर साप तसेच विंचू व इतर घातक जीव जंतूंना घरापासून दूर ठेवायचे असेल तर तुम्ही ब्लिच पावडर वापरू शकतात. पाण्यामध्ये ब्लीच पावडर मिक्स करून तुम्ही घराच्या गार्डनमध्ये जमलेल्या पाण्यात स्प्रे करू शकतात व या पाण्याने तुम्ही घराची फरशी पुसू शकतात.

3- लवंग किंवा दालचिनी तेलाचा वापर जर तुम्ही लवंग किंवा दालचिनीच्या तेलाचा वापर केला तरी साप किंवा विंचू घरात शिरत नाहीत. कारण या प्राण्यांना लवंग किंवा दालचिनीचा वास अजिबात सहन होत नाही. समजा घरामध्ये जर साप शिरला तर दरवाजे व खिडक्या खुल्या करून घ्याव्यात व सापाशी कुठल्याही प्रकारची छेडछाड न करता त्याच्या जवळपास लवंगाच्या तेलाचा स्प्रे करावा व त्या वासाने साप त्या ठिकाणहुन निघून जातो.

4- काही वनस्पतींची घराजवळ लागवड जर पावसाळ्यामध्ये स्नेक प्लांट, गवती चहा म्हणजेच लेमन ग्रास किंवा निवडुंग त्यालाच आपण कॅक्टस असे देखील म्हणतो आणि तुळस यासारख्या वनस्पती जर घराजवळ लावल्या तर साप आजूबाजूला फिरकत देखील नाही. ही रोपे तुम्ही खिडकीजवळ किंवा दरवाजाच्या जवळ लावू शकतात.

5- कांदा आणि लसणाची पेस्ट तुम्हाला जर पावसाळ्यामध्ये सापांना घरापासून लांब ठेवायचे असेल तर कांदा आणि लसणाची पेस्ट खूप महत्त्वाची ठरते. यामध्ये तुम्ही ही पेस्ट खिडकी किंवा दरवाजाजवळ ठेवावी व याच्या वासाने साप दूर पडतात.

घराच्या गार्डनमध्ये तुम्ही कांदा किंवा लसणाची लागवड करून देखील हे करू शकतात. तसेच सापासारखा प्राणी तुळशीच्या झाडापासून दूर राहतो. कारण तुळशीचा जो काही सुगंध असतो तो सापाला अजिबात सहन होत नाही.

तुळस प्रमाणेच पुदिन्याचा वास देखील सापांना सहन होत नाही. याकरिता तुम्ही पुदिन्याच्या पानांचे पाणी तयार करून ते घराच्या जवळपास स्प्रे करू शकतात.

6- दालचिनी पावडर तसेच लिंबाचा रस व्हिनेगरचा वापर दालचिनी पावडर तसेच विनेगर, लिंबाचा रस इत्यादी पाण्यामध्ये मिसळून तुम्ही स्प्रे बॉटलने  घरामध्ये स्प्रे घरामध्ये करू शकता. दररोज जर अशा पद्धतीने स्प्रे केला तर घराच्या जवळपास साप तसेच विंचू इत्यादी धोकादायक प्राणी फिरकत देखील नाहीत. याप्रमाणेच तुम्ही मातीचे तेल तसेच विनेगर आणि फिनाईल इत्यादी स्प्रे केल्यामुळे देखील साप किंवा विंचू सारखे प्राणी घरापासून दूर राहतात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe