Kitchen Tips: वापराल ‘या’ टिप्स तर नाही संपणार लवकर गॅस सिलेंडर! पैशांची होईल बचत, वाचा माहिती

Ajay Patil
Published:
gas in kitchen

Kitchen Tips:- आपला महिन्याचा जो काही आर्थिक बजेट असतो त्यामध्ये सगळ्यात मोठ्या बोजा पडत असतो तो घरातील इलेक्ट्रिसिटी बिल आणि गॅस सिलेंडर रिफिलिंग करण्यासाठी जाणारा पैशामुळे. यामध्ये जर आपण गॅस सिलेंडरच्या दृष्टिकोनातून बघितले तर बऱ्याचदा नको त्या वेळेला गॅस सिलेंडर संपते आणि मोठ्या प्रमाणावर त्रासाला सामोरे जावे लागते.

कधीकधी घरांमध्ये पाहुणेमंडळी आलेली असते व नेमक्या त्याच वेळेस गॅस सिलेंडर संपते व वेळेला  खूप मोठी धावपळ करावी लागते. कारण आजकाल चुल्यावरील स्वयंपाक हा ग्रामीण भागामध्ये देखील मागे पडला असून सर्वत्र स्वयंपाक करण्यासाठी गॅसचा वापर केला जातो. गॅसवर स्वयंपाक केल्यामुळे लागणारा वेळ देखील वाचतो व महिलांचा धुरापासून सुटका होण्यास देखील यामुळे मदत होते.

परंतु सध्या गॅसच्या किमती वाढल्या असल्यामुळे लवकर गॅस संपू नये असं प्रत्येकाला वाटत असतं. त्यामुळे तुम्हाला देखील लवकर गॅस संपू नये असे वाटत असेल तर तुम्ही काही छोट्याशा टिप्स वापरणे खूप गरजेचे आहे. तुम्ही या छोट्या छोट्या टिप्स वापरल्या तर तुमचा गॅस सिलेंडर ज्या कालावधीमध्ये संपत असेल त्यापेक्षा तुम्ही जास्त दिवस त्याला वापरू शकतात.

 गॅस सिलेंडर लवकर संपू नये याकरिता वापरा या टिप्स

1- स्वयंपाकासाठी प्रेशर कुकरचा वापर करावा बऱ्याचदा स्वयंपाक बनवताना गॅस जास्त कालावधीपर्यंत आपण चालू ठेवतो व त्यामुळे गॅस लवकर संपतो हे एक साधं गणित आहे. त्यामुळे स्वयंपाक करता तुम्ही जास्तीत जास्त प्रमाणामध्ये जर प्रेशर कुकरचा वापर केला तर यामुळे फायदा होतो. कारण प्रेशर कुकरमध्ये अन्न लवकर शिजते व त्यामुळे गॅस जास्त वेळ चालवावा लागत नाही व गॅसची बचत होते.

तसेच तुम्ही जर स्वयंपाक करतांना गॅसवर जे भांडे ठेवतात त्यावर तुम्ही झाकण ठेवणे गरजेचे आहे आणि त्यानंतरच अन्न शिजवावे. ही ट्रिक वापरल्याने देखील अन्न लवकर शिजण्यास मदत होते व गॅसचा वापर कमी होतो.

2- थंड पदार्थ फ्रीजमधून काढून लगेच गरम करायला गॅसवर ठेवू नये बऱ्याचदा आपल्याला एखादा फ्रिजमध्ये ठेवलेला पदार्थ गरम करायचा असतो व त्याला आपण फ्रीजमधून थंड झालेला पदार्थ काढतो व लगेच गॅसवर ठेवतो. त्यामुळे असा पदार्थ किंवा वस्तू गरम होण्यासाठी जास्त कालावधी लागतो.

साहजिकच त्यामुळे गॅस जास्त वापरला जातो. त्याकरिता गॅसवर काहीही गरम करण्यासाठी ठेवण्यापूर्वी  एखादी वस्तू फ्रीजमधून काढून काही मिनिटांपर्यंत ती बाहेर ठेवावी व नंतर तिला गॅसवर ठेवून गरम करावी. साधारणपणे तुमच्या खोलीच्या तापमानावर त्या वस्तूचे तापमान आल्यानंतर ते गॅसवर ठेवावे किंवा गॅसवर शिजवावे.

3- गॅसवर ओले भांडे ठेवू नये बऱ्याचदा स्वयंपाकासाठी आपण ज्या भांड्यांचा वापर करतो ती ओली असतात व असेच ओले भांडे आपण गॅसवर ठेवतो.अशाप्रकारचे ओले भांडे वाळवण्याकरिता बऱ्याच प्रमाणात गॅस वाया जातो. त्यामुळे तुम्ही जे भांडे गॅसवर ठेवाल त्याआधी ते चांगले कापडाने पुसून कोरडे करावे व तरच गॅसवर ठेवावे.

4- गॅसचे बर्नर स्वच्छ करावे कित्येक दिवस आपण गॅसची साफसफाई करत नाही व त्यामुळे गॅस बर्नर मध्ये मोठ्या प्रमाणावर धूळ किंवा घाण साचते. यामुळे देखील गॅस व्यवस्थित जळत नाही आणि मोठ्या प्रमाणावर वाया जातो. त्यामुळे दर सहा महिन्यांनी गॅसचे बर्नर स्वच्छ करून घेणे गरजेचे आहे.

5- तसेच जेव्हा तुम्ही अन्न शिजवाल तेव्हा ते मध्यम आचेवर शिजवावे. मोठ्या आचेवर जर तुम्ही स्वयंपाक केला तर जास्त प्रमाणामध्ये गॅस वाया जाण्याची शक्यता असते व त्यामुळे एखाद्या वेळेस अन्न करपू देखील शकते.

6- गॅसची नियमित देखभाल जर तुम्हाला वाटत असेल गॅस नळी मधून गॅसची गळती होत आहे तर वेळ न घालवता ताबडतोब सिलेंडरची तपासणी करून घ्यावी. ज्यामुळे तुम्हाला होणारा धोका टाळता येऊ शकतो.

अशाप्रकारे तुम्ही या छोट्या टिप्स वापरल्या तरी तुम्ही गॅस सिलेंडर नेहमीच्या वेळेपेक्षा जास्त कालावधी करिता वापरू शकाल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe