बऱ्याचदा आपण बाजारातून अनेक प्रकारचा भाजीपाला किंवा फळे आणतो. परंतु जर त्यांची व्यवस्थितपणे काळजी घेतली नाही तर अगदी एक ते दोन दिवसांमध्ये ते खराब होतात व खाण्यालायक राहत नाहीत. तसे पाहायला गेले तर आपण अशा प्रकारचा भाजीपाला किंवा फळे खराब होऊ नये म्हणून अनेक प्रकारच्या उपाययोजना करतो.
परंतु तरीदेखील आपल्याला हवा तसा अपेक्षित परिणाम या माध्यमातून होताना दिसून येत नाही. ही समस्या केळींमध्ये प्रामुख्याने आपल्याला दिसून येते. बऱ्याचदा आपण बाजारातून केळी आणतो तेव्हा एका रात्रीत ती काळी दिसायला लागतात व खराब व्हायला सुरुवात होते. हे प्रमाण आपल्याला पावसाच्या कालावधीमध्ये खूप जास्त प्रमाणात दिसून येते.
तसे पाहायला गेले तर केळी हे फळ असे आहे की ते लवकर खराब होते व जास्त वेळ टिकू शकत नाही. ते खराब होऊ नये म्हणून आपण बऱ्याचदा केळीला फ्रीजमध्ये ठेवतो. परंतु फ्रीजमध्ये देखील ते काळपट होतात. त्यामुळे आपण या लेखात असे साधे आणि सोपे घरगुती उपाय बघणार आहोत जे केल्यामुळे दहा दिवसांपर्यंत केळी ताजेतवाने राहू शकतात.
या गोष्टींचा वापर करा आणि केळी जास्त दिवस फ्रेश ठेवा
1- सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे जेव्हा तुम्ही बाजारातून केळी खरेदी करून आणतात तेव्हा त्यांच्या देठावर पेपर किंवा प्लास्टिक रॅप करावे. असं केल्याने केळी जास्त दिवस टिकून राहतात.
2- केळी जास्त दिवस राहते तेव्हा खालचा जो काही भाग असतो त्याकडून ती खराब व्हायला लागते. तसेच केळी जर खाली ठेवली तर ती पटकन पिकते. तसेच खालच्या भागावर काळे डाग पडायला लागतात. याकरिता तुम्ही हँगर चा वापर करू शकतात. केळी ठेवण्यासाठी हँगर चा वापर केल्यामुळे ती जास्त दिवस चांगले राहतात.
3- बाजारातून केळी आणल्यानंतर ती जर वॅक्स पेपरमध्ये गुंडाळून व्यवस्थित झाकून ठेवले तर ती लवकर खराब होत नाही.
4- विटामिन सी ची टॅबलेट देखील तुम्हाला केळी खराब होऊ नये यासाठी मदत करू शकते. याकरिता विटामिन सी ची एक गोळी कमी पाण्यामध्ये विरघळून घ्यावी आणि त्या पाण्यातून केळी काढावी किंवा ते पाणी केळीवर शिंपडावे. असं केल्याने देखील केळी जास्त काळ टिकून राहते.
5- तसेच केळ्यांचे देठ पॉलिथिनमध्ये लपेटून ठेवू शकतात व यामुळे देखील केळी फ्रेश राहण्यास मदत होते. तसेच यामुळे ती लवकर काळी पडत नाही.
6- तसेच केळी फ्रिजमध्ये कधीच ठेवू नये. तिला रूम टेंपरेचर मध्येच ठेवावे. फ्रिजपेक्षा केळी बाहेर जास्त कालावधी करिता टिकते. फ्रिजमध्ये केळी मऊ पडतात आणि लवकर काळी होतात.