Credit Card Bill Pay Tips: क्रेडिट कार्डचे बिल भरणे अशक्य होत आहे का? वापरा ‘या’ टिप्स, होऊ शकतात क्रेडिट क्रेडिट कार्डच्या बिल भरण्यापासून मुक्त

Ajay Patil
Published:
credit cards pay bill tips

Credit Card Bill Pay Tips:- क्रेडिट कार्डचा वापर दिवसेंदिवस वाढताना आपल्याला दिसून येत आहे. क्रेडिट कार्डच्या माध्यमातून पेट्रोल किंवा डिझेल भरणे तसेच ऑनलाइन बिले भरणे किंवा खरेदी इत्यादी आर्थिक व्यवहार क्रेडिट कार्डच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर केले जातात.

परंतु काही अहवाल पाहिले तर त्यानुसार क्रेडिट कार्ड डिफॉल्टमध्ये देखील मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याचे दिसून येते. म्हणजेच क्रेडिट कार्डचा वापर वाढला आहे परंतु त्या पद्धतीने परतफेड मात्र होत नाही.

क्रेडिट कार्डचे बिल भरले नाही तर मात्र त्याचे बिल आपल्यासाठी डोकेदुखी ठरू शकते.क्रेडिट कार्डचे बिल आपल्यावर एक कर्जाचे ओझे बनवू नये किंवा क्रेडिट कार्डच्या बिल भरण्यापासून आपल्याला मुक्तता मिळावी त्याकरिता तुम्ही या छोट्याशा टिप्स वापरू शकतात व क्रेडिट कार्डचे बिल भरू शकतात.

 या पद्धती वापरा आणि क्रेडिट कार्डचे बिल भरा

1- बॅलन्स ट्रान्सफर करणे ही एक उत्तम पद्धत आहे. परंतु याकरिता तुमच्याकडे एकापेक्षा जास्त क्रेडिट कार्ड असणे गरजेचे आहे. अशाप्रकारे तुमच्याकडे जर एकापेक्षा जास्त क्रेडिट कार्ड असतील तर तुम्ही एका क्रेडिट कार्डचे बिल भरण्यासाठी एका क्रेडिट कार्ड मधून दुसऱ्या क्रेडिट कार्ड मध्ये बॅलन्स ट्रान्सफर करू शकता.

आजकाल बऱ्याच क्रेडिट कार्ड जारी करणाऱ्या बँका आणि वित्तीय संस्थांच्या माध्यमातून ग्राहकांना ही सुविधा देण्यात येत आहे. यामध्ये तुम्ही ज्या क्रेडिट कार्डने बिल भरता त्याची क्रेडिट लिमिट इतर क्रेडिट कार्ड पेक्षा मात्र जास्त असणे गरजेचे असते.

2- क्रेडिट कार्ड बिल थकबाकी रक्कमेचे हप्त्यामध्ये रुपांतर करणे हा एक बेस्ट आणि सोपा आणि सरळ पर्याय आहे. समजा तुमचे क्रेडिट कार्डचे जे काही बिल आहेत ते भरण्यासाठी तुमच्याकडे एकरकमी पैशांची व्यवस्था होऊ शकत नसेल तर तुमचे जे काही क्रेडिट कार्ड बिल थकबाकी असेल त्या रकमेचे तुम्ही ईएमआयमध्ये रूपांतर करू शकतात व हा पर्याय देखील उपलब्ध आहे.

हा पर्याय वापरून तुम्ही क्रेडिट कार्डचे बिल सोपे हप्त्यांमध्ये रूपांतरित करून आरामात भरू शकतात व क्रेडिट कार्डच्या बिल भरण्याची समस्येपासून स्वतःची मुक्तता करू शकतात.

 क्रेडिट कार्डचा वापर का वाढत आहे?

सध्या क्रेडिट कार्ड यूजरच्या संख्येमध्ये झपाट्याने वाढ होत आहे व त्याच प्रमाणात डिफॉल्ट वाढण्याचे प्रकरणे देखील वाढत आहेत. यामागे जर प्रमुख कारणे पाहिले तर राहणीमानाचा वाढलेला खर्च तसेच नोकरी  हातातून जाणे आणि आर्थिक मंदी यासारखी कारणे यामागे असू शकतात.

तसेच ऑनलाईन पद्धतीने ट्रांजेक्शनमध्ये खूप वाढ झाल्यामुळे ग्राहकांना खरेदी करणे आणि कर्ज घेणे या गोष्टी खूप सोप्या झाल्या आहेत. त्यामुळे पैशांची काळजी किंवा पर्वा न करता तो जास्त प्रमाणात खर्च करण्याकडे सध्या कल दिसून येतो व  जेव्हा मात्र क्रेडिट कार्डचे बिल भरण्याची वेळ येते तेव्हा आपल्याकडे पुरेसा पैसा नसतो व बिल भरण्याची डोकेदुखी वाढते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe