विहिंपचे स्वयंसेवक घरोघरी श्रीराम मंदिराचे निमंत्रण देणार

Marathi News

Marathi News : अयोध्येत प्रभू श्री रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा २२ जानेवारी २०२४ रोजी होत आहे. या अभियानाचा प्रारंभ ५ नोव्हेंबर रोजी अयोध्येत झाला. गर्भ गृहात अक्षताचे पूजन व अभिमंत्रित करण्यात आले.

दि.२६ नोव्हेंबर रोजी पुणे येथून नगरला संध्याकाळी ७.३० वा विशाल गणपती मंदिर माळीवाडा येथे कलशाचे पूजन श्री विशाल गणपती मंदिराचे महंत संगमनाथजी महाराज यांच्या हस्ते करण्यात आले. श्री विशाल गणेशाची महाआरती करण्यात आली.

याप्रसंगी रा.स्व. संघाचे पश्चिम महाराष्ट्र प्रांत संघचालक नाना जाधव, विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष अँड. जय भोसले, विभाग मंत्री सुनील खिस्ती, जिल्हा मंत्री गजेंद्र सोनवणे, पश्चिम महाराष्ट्र प्रांत प्रिंट मीडिया प्रमुख अमोल भांबरकर, जिल्हा कार्यवाह वाल्मीक कुलकर्णी,

शहर कार्यवाह हिराकांत रामदासी, शहर मंत्री श्रीकांत नांदापूरकर, महेंद्र जाखेटे, मठ मंदिर समितीचे जिल्हाप्रमुख हरिभाऊ डोळसे, बाबासाहेब साठे, सचिन लोखंडे,मुकुल गंधे, बाली जोशी, भारत थोरात, ओम पांडे, राजेंद्र चुंबळकर, अजित देशमुख, प्रा. अनुरीता झगडे, रा.स्व.संघाचे अनिल रामदासी, राधेश्याम कुलकर्णी, माधव देशमुख, अभय आगरकर, अनंत देसाई, अनिल निकम, नरेंद्र सोनवणे, लवेश गोंधळे, निलेश चिपाडे, सचिन पावले, सुरेंद्र सोनवणे, मयुर बोचुघोळ, प्रशांत मुथा,

अनिल मोहिते, कुंडलिक गदादे आदी उपस्थित होते. अयोध्येत श्रीराम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण देण्यासाठी तांदूळ कलशाचे विधिवत पुजन करुन श्री विशाल गणपती मंदिरात आणण्यात आले आहे. एक जानेवारी ते १५ जानेवारी या कालावधीत नगर जिल्ह्यात हे अभियान राबविण्यात येणार आहे.

घरोघरी, जिल्ह्यातील सर्व गावांमध्ये निमत्रण देण्यासाठी कलशातील तांदुळाचे वाटप करण्यात येणार आहे. श्रीराम मंदिराच्या दर्शनासाठी भाविकांनी अयोध्या येथे यावे. यासाठी निमंत्रण म्हणून १ ते १५ जानेवारी २०२४ या कालावधीत कलशातील तांदुळाचे वाटप विश्वहिंदू परिषदेचे स्वयंसेवक घरोघरी जाणार आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe